मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग १

मुंबई बेटाच्या निर्मितीचा काळ खर तर प्रागैतिहासिक काळापर्यंत जातो, या काळात - झालेल्या भुगर्भिय उलथापालथींमूळे या बेटांची निर्मिती झाली मात्र या उलथापालथी चालू असताना मुळ जे एकच बेट होते त्यांची एकुण पाच बेटे तयार झाली व भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी अधिक प्रमाणात शिरुन हि बेटे सात दिसायची त्यामुळे या बेटांना सप्तद्विप असेही म्हटले जात असे.

मुंबईचा प्राचीन इतिहास - भाग १
मुंबईचा एक जुना नकाशा

प्रागैतिहासिक काळातील येथील भूभागांच्या उलथापालथीचे निदर्शक असे बेडूक, खैर वृक्ष इत्यादींचे अवशेष येथे सापडले आहेत. सध्याच्या बॅक बेच्याकिनाऱ्यावर प्राचीन काळी मानवी वस्ती असावी, असे तेथे सापडलेल्या दगडी अवजारांच्या अवशेषांवरून दिसते.

मुंबईच्या या बेटास सात वेगवेगळी बेटे म्हणून गृहीत धरणे योग्य नव्हते मात्र एकाच बेटावरील जमिनीच्या कमी अधिक सपाटीमुळे समुद्राच्या भरतीचे पाणीशिरुन खाजणांचा एक प्रदेश तयार होऊन जी जमिन समुद्रपातळीच्या वर सुरक्षित होती त्या जमिनीस एक बेट म्हणुनच गृहित धरले जाऊ लागले. ब्रिटीशांनीत्यांच्या काळात समुद्रात भराव घातला व तो बुजवुन हे एक बेट तयार केले असे जे म्हटले जाते ते शब्दशः तसे नसुन फक्त पाण्याखाली गेलेली नादुरुस्त जमिनहोती तिच मातीच्या भरावाने भरुन काढली व हे बेट एकसंघ केले कारण सदर बेटाच्या दुरुस्ती संदर्भातील सतराव्या शतकातील अनेक पत्रे उपलब्ध आहेतज्यामध्ये पाण्याखाली गेलेली नादुरुस्त जमिन भरुन काढण्याविषयीचे उल्लेख आढळतात.

मुंबईच प्राचीन कोकणाची राजधानी?

इसवी सन १५० मध्ये ग्रिक भुगोलतज्ञ टॉलेमी याने जगाचा नकाशा तयार करण्याच्या निमित्ताने भारतास भेट दिली तेव्हा त्याने मुंबई द्विपसमुहाचा उल्लेखसप्तद्विप (HeptanesiaIsle) असा केला आहे. टॉलेमी ज्या काळात कोकणात आला तेव्हा कोकणावर सातवाहनांचे राज्य असून त्यांच्या राजधान्या पैठण(प्रतिष्ठान) व जुन्नर (जिर्णनगर) या होत्या. मौर्य सत्तेच्या पतनानंतर भारतीय सामर्थ्याचे केंद्र सातवाहनांनी दक्षिणापथात व तेही महाराष्ट्रात प्रस्थापित केल्यानंतरत्यांच्या राज्याला सोयीस्कर अशी सोपारा, कल्याण, पुरी व चौल ही पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील बंदरें भरभराटली. सोपाऱ्याच्या उत्तरेस वैतरणा व दक्षिणेसउल्हास या नद्यांची मुखे आहेत. चौलच्या उत्तरेस अंबा व दक्षिणेस कुण्डलिका या नद्यांची मुखे आहेत. सोपाऱ्यापासून कल्याण मुरबाडवरुन नाणे घाटांतून जुन्नरव नाशिकपर्यंत आणि चौलपासून व नागोठण्यापासून कार्ल्यावरून तगर व पैठणपर्यंत व्यापारी रहदारी सुरु झाली. कान्हेरी, नाशिक व कार्ले येथील लेणी व यालेण्यांतील लेख या प्रदेशाच्या समृद्धीला व या भागांतून होणाऱ्या व्यापाराच्या साक्षीदार आहेत.

सातवाहनांनी या स्थानांची निवड किती दूरदृष्टीने केली हेमुंबईच्या सध्याच्या भरभराटीवरून आपणांस आतां सहज पटते. सुमारे दोन हजार वर्षापूर्वी प्राचिन राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या बंदरांतून सुमारे दीड हजारवर्षे व्यापार सुरळीत चालला होता. पुरीस त्याकाळी मुख्य राजकिय महत्त्व नसले तरी एक व्यापारी बंदर म्हणुन तिची महती नक्कीच असावी. कालांतराने हेबेट कोकण मौर्यांनी कोकणच्या राजधानीचे ठिकाण केल्याने त्यास राजकिय महत्त्वही प्राप्त झाले.

पुरीवरील सातवाहन सत्तेचा शेवट अभिरांनी इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यास केला. सातवाहन सत्तेचा शेवटचा सम्राट म्हणजे यज्ञश्री सातकर्णी याचापराभव करुन अभिर ईश्वरसेनाचे राज्य कोकणात स्थापन झाले. त्याची काही नाणीही कोकणात सापडली आहेत. अभिरसत्तेनंतर त्रैकुटक वंशाने आपला अंमलकोकणावर बसवला. सुरुवातीस त्रैकुटक हे अभिर राजांचे मांडलिक असावेत मात्र कालांतराने त्यांनी स्वतःस स्वतंत्र घोषित केले असावे. त्रैकुटक हि कलचुरीवंशाचीच एक शाखा असून त्यांचे मुळ स्थान कसारा (कासार) प्रांतातील त्रैकुटक नामक पर्वतावर होते. हा त्रैकुटक म्हणजेच सध्याचा माहुली किल्ला असेशेजवलकरांनी सुचविले आहे व तेच संयुक्तिक वाटते कारण त्यांच्या मते महाकवी कालिदासाने लिहिलेल्या रघुवंशात जो त्रिकुटपर्वताचा उल्लेख व वर्णन आलेआहे तो माहुलीशी तंतोतंत जुळते.

रघुवंशात कालिदास म्हणतो, ‘अपरान्तमहीपालव्याजेन रघवे करमद्य मत्तेभरदनोत्कीर्व्यक्तविक्रमलक्षणद्य त्रिकुटमेवतत्रोच्चैर्जयस्तंभ चकार सः’ अर्थात रघुने उत्तर कोकणातील राजांकडून कर घेऊन आपल्या हत्तीच्या दातांनी कोरलेल्या त्रिकूट पर्वताचाच जयस्तंभ स्थापिला. अशीच तिन शिखरे माहुलीस आहेत व दुरुन पाहिल्यास त्यावरिल शिखरे ही रघुने कोरलेल्या जयस्तंभांसारखीच दिसुन येतात.

याशिवाय इसवी सनाच्या आठव्या शतकातील हरिश्चंद्रवंशिय राजा भोगशक्तीच्या आंजणेरी ताम्रपटात पूर्वत्रिकुट नामक विषयाचा उल्लेख आहे या ताम्रपटातपुरीचाही उल्लेख आहे. या पुर्वत्रिकुट विषयात महागिरी हा आहार आला आहे तसेच शिलाहार अपराजिताच्या ताम्रपटातही महागिरी आहार आला आहे यामहागिरीलाच पुढे माहूली असे म्हटले जाऊ लागले असावे.  तर हा त्रिकुट राजवंशही कलचुरींप्रमाणेच स्वतःला महिष्मती वंशातील हैह्य म्हणवून घेत असत. याच वंशात प्रख्यात राजा सहस्त्रार्जुन उर्फ कार्तविर्यचा जन्म झाला होता. 

त्रैकुटक राजवंशाचे पाच राजे इतिहासास ज्ञात आहेत ते म्हणजे इंद्रसेन, दर्‍हसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन व विक्रमसेन. यांचे राज्य गुजरातच्या दक्षिण भाग ते कोकणचा दक्षिण प्रदेश एवढे असावे असे विक्रमसेनाच्या माटवण (रत्नागिरी) येथेसापडलेल्या ताम्रपटावरुन लक्षात येते. याच ताम्रपटात 'त्रैकुटकनाम कलचुरीनाम' असा उल्लेख आढळल्याने त्रैकुटक व कलचुरी हे एकच असावेत असेवाटते. त्रैकुटकांचे मुख्यस्थान माहुली जरी असले तरी त्यांची राजगादी अनिरुद्धपुर ही होती व हे अनिरुद्धपुर म्हणजेच उत्तर कोकणातील साष्टी बेटातीलसध्याचे अंधेरी असावे. त्रैकुटकांचा काळ ही पुरीच्या अर्थात मुंबईच्या राजकिय महत्त्वाची नांदी होती कारण याच पुरी द्विपसमुहातील घारापुरी नामक एकाबेटावर उभारण्यात आलेला अद्भुत शैव लेणीसमुह हा त्रैकुटकांनी उभारण्यास सुरुवात केली असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. 

क्रमशः