भवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीच्या इतिहासास अधिक व्यापक रूप मिळावे म्हणून ऐतिहासिक बखरी व किमान शंभर वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांच्या आधारे इतिहास भवानी तलवारीचा हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे.

भवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार म्हणजे समस्त मराठी जनांचे भावनिक नाते जुळलेले इतिहासातील एक पात्रच होय. जसे शंकराचे त्रिशूळ, जसे श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र, जसे इंद्राचे वज्र, जसे रामाचे व अर्जुनाचे धनुष्य, जशी हनुमानाची-भीमाची गदा तशीच शिवरायांची भवानी तलवार इतके महत्वाचे स्थान या तलवारीस इतिहासात आहे. 

भवानी तलवारीचे महत्व एवढे की अनेक जण साक्षात तिला शिवरायांची कुलदेवता भवानी मातेचा आशीर्वाद मानतात व तत्कालीन साधनांत यासंदर्भात उल्लेखही आढळतात.  कवींद्र परमानंद या शिवाजी महाराजांच्या समकालीन कवींनी रचलेल्या श्री शिवभारत या संस्कृत ग्रंथात अफजलखान वधाच्या वेळी साक्षात भवानी मातेने शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन त्यांच्या तलवारीत प्रवेश केल्याचे लिहिले आहे. 

मात्र या तलवारीचा इतिहास, स्वरूप व सद्यस्थिती या संबंधाने अभ्यासकांत विविध मतमतांतरे असल्याने भवानी तलवार आजही एक रहस्य बनून राहिली आहे. भवानी तलवारीच्या मूळ स्वरूपाविषयी दस्तऐवजीकरण उपलब्ध नसल्याने भवानी तलवारीचे स्वरूप कसे होते या विषयावर ठोस लिखाण करणे आजही शक्य झालेले नाही मात्र भवानी तलवारीचा इतिहास ऐतिहासिक संदर्भांच्या आधारावर मांडणे हे आपल्या हाती नक्कीच आहे. 

भवानी तलवारीच्या इतिहासास अधिक व्यापक रूप मिळावे म्हणून ऐतिहासिक बखरी व किमान शंभर वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांच्या आधारे इतिहास भवानी तलवारीचा हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. 

नवचैतन्य प्रकाशनामार्फत प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचे लेखन सिद्धार्थ सोष्टे यांनी केले असून पुस्तकाच्या निर्मितीची जबाबदारी मराठी बझ इंफोटेंमेंट व ल्युक्रेटिव्ह हाऊसच्या संयुक्त विद्यमाने मयूर विजयराज खुळे यांनी उचलली आहे.

हे पुस्तक भवानी तलवारीचा इतिहास हाच विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आले असून भवानी तलवारीचे वर्णन, उगमस्थान, इतिहास आणि ऐतिहासिक उल्लेख असे चित्तवेधक विषय या पुस्तकात मांडण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खाजगी शस्त्रागारात ज्या तलवारी होत्या त्यापैकी भवानी, तुळजा व जगदंबा या प्रमुख होत्या व या तलवारी धोप प्रकारातील होत्या. धोप अथवा फिरंग तलवारींची पाती ही कुठे बनवली जात असत याची माहिती जुन्या इतिहास अभ्यासकांनी दिली आहे ती सुद्धा पुस्तकात उद्धृत करण्यात आली आहे. 

याशिवाय भवानी तलवारीच्या इतिहासाचे जे संदर्भ ऐतिहासिक साधनांत आहेत ते सर्व उल्लेख एका स्वतंत्र अशा प्रकरणात देण्यात आले आहेत ज्यामुळे वाचकांना  सर्व ऐतिहासिक संदर्भ एकाच ठिकाणी मिळू शकतील.

महाराष्ट्र सरकार आणि पुरातत्व विभाग या माहितीपूर्ण पुस्तकाची दखल घेऊन भवानी तलवारीच्या मूळ इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी महत्वाची पाऊले उचलतील अशी आशा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीच्या इतिहासावर पूर्णपणे ऐतिहासिक संदर्भांवर आधारित असे हे पुस्तक शिवकालीन इतिहासावर प्रेम असणाऱ्या वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास मराठी बझ इंफोटेंमेंट व ल्युक्रेटिव्ह हाऊसचे मयूर विजयराज खुळे यांनी व्यक्त केला आहे.

  • 'इतिहास भवानी तलवारीचा' हे पुस्तक घरपोच मिळवण्याकरिता 9970010030 या क्रमांकावर Google Pay, Paytm अथवा Phone Pe करा.
  • प्रकाशनपूर्व नोंदणीवर १५% सवलत!
  • प्रकाशनपूर्व किंमत फक्त ६० रुपये + ५० रुपये पोस्ट चार्जेस (एकूण - रुपये ११० फक्त)
  • दिनांक १५ ऑगस्टनंतर पुस्तक आपल्या पत्त्यावर पाठवले जाईल.
  • आपले पूर्ण नाव, पत्ता व पैसे पाठवल्याचा स्क्रिनशॉट 7841081516 या नंबरवर व्हाट्सअप करणे.