मुंबई या नावाचा इतिहास

प्राचिन काळात पुरी म्हणुन प्रख्यात असलेल्या या शहरास सध्या प्रचलित असलेला मुंबई शब्द कसा प्रचलित झाला असावा याची या लेखात शहनिशा करु.

मुंबई या नावाचा इतिहास

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

मुंबई या नावाबद्दल अनेक मतांतरे असली तरी मुंबादेवी अथवा मुंबाई या मुंबईच्या ग्राम देवतेवरुन या बेटास मुंबई हे नाव मिळाले असा प्रचलित निष्कर्ष आहे

मुंबादेवीची स्थापना मध्ययुगातील असून मुंबापुरी माहात्म्यात खिलजीच्या जुलुमास जेव्हा जनता कंटाळली तेव्हा त्यांच्यासाठी मुंबादेवीने प्रकट होऊन मुंबारक या दैत्याचा नाश केला असे म्हटले आहे. याच वेळी मुंबादेवीची स्थापना मुंबईत झाली असल्याचा उल्लेख मिळतो.

मृण्मयी - मुमई - मुंबई अशी व्युत्पत्ती अ. द. पुसाळकर व वि. गो. दिघे या इतिहास संशोधकांनी दिली आहे. मोमाई ही सौराष्ट्रातील देवता एके काळी मुंबईत पूजली जात होती, याच मोमाईवरून मुंबई हे नाव आले असावे, असेही म्हटले जाते.

महाअंबाबाई - मुंबई अशीही एक व्युत्पत्ती पुढे केली जाते. महिबिंब या नावाचाही मुंबई नावाच्या उत्पत्तीशी संबंध असावा असा तर्क आहे. याशिवाय शिलाहार राजवटीत मुम्मणी नामक राजा होऊन गेला. जयकेशीच्या नरेंद्र शिलालेखात त्याचा उल्लेख

“कवडीद्विपा मुम्मादीयागेपलवम”

असा आला आहे यातील मुम्मादी व मुम्मणी या शब्दाचा तर मुंबई या शब्दाशी काही संबंध नसावा?

याचा अर्थ मौर्य काळ ते शिलाहार काळापर्यंत पुरी, बिंब काळात महिकावती अथवा बिंबस्थान, भिमराजाच्या काळात भिमपुरी, खिलजीच्या मानबाई, पोर्तुगिज व ब्रिटीश काळात बॉम्बे, मुंबै अथवा मुंबई तर आता स्वातंत्र्य काळात परत मुंबई असा हा नामांतराचा चमत्कारिक प्रवास आहे.