इतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रसिद्ध अशा भवानी तलवारीचा ससंदर्भ इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आला असून भवानी तलवारीचे वर्णन, उगमस्थान, इतिहास व ऐतिहासिक उल्लेख इत्यादी वैविध्यपुर्ण प्रकरणे या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आली आहेत.

इतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिव्हाळ्याच्या भवानी तलवारीचा इतिहास कथन करणाऱ्या 'इतिहास भवानी तलवारीचा' या पुस्तकाचे अनावरण पुणे येथे फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड व शेर शिवराज या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक व अभिनेते दिगपाल लांजेकर यांच्या हस्ते संपन्न झाले झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा प्रमुख विजयराज खुळे, स्मिता लांजेकर, संगीत दिग्दर्शक केदार दिवेकर, साऊंड इंजिनिअर व अभिनेते निखिल लांजेकर, साऊंड डिझायनर जमीर तांबोळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश पोटफोडे, विकास वडके, शब्द माधुरी संस्थेच्या चेतना वडके, ल्युक्रेटिव्ह हाऊसचे संस्थापक व पुस्तकाचे प्रकाशक मयूर विजयराज खुळे, अशोक अग्रवाल व राहुल दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रसिद्ध अशा भवानी तलवारीचा ससंदर्भ इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आला असून भवानी तलवारीचे वर्णन, उगमस्थान, इतिहास व ऐतिहासिक उल्लेख इत्यादी वैविध्यपुर्ण प्रकरणे या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आली आहेत.

बखरी, काव्ये इत्यादी ऐतिहासिक साधने व तत्कालीन भारतीय व विदेशी लेखकांनी तलवारीच्या इतिहासाविषयी केलेल्या लिखाणाचा सूक्ष्म अभ्यास करून हे पुस्तक लिहिण्यात आले असून पुस्तकास इतिहास संशोधक व लेखक महेश तेंडुलकर यांची प्रस्तावना लाभली असून नवचैतन्य प्रकाशन व ल्युक्रेटिव्ह हाऊस यांच्या सयुंक्त विद्यमाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

पुस्तकाचे लेखन इतिहास अभ्यासक सिद्धार्थ नवीन सोष्टे यांनी केले असून सोष्टे यांची यापूर्वी स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट, नागस्थान ते नागोठणे, मुंबईचा अज्ञात इतिहास (हिंदी व इंग्रजी भाषांतरासहित), रुळलेल्या वाटा सोडून ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

पुस्तकास प्रकाशनापूर्वीच वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या पुस्तकाच्या निमित्ताने भवानी तलवारीच्या इतिहासावरील गूढ वलय दूर होण्यास निश्चित हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.