मुंबईचे प्राचीन कुलदैवत महालक्ष्मी

मुंबईचे महालक्ष्मी मंदीर विख्यात आहे. तुर्तास आपण पहात असलेल्या मंदीराचे बांधकाम आधुनीक असले तरी या मंदिरासही प्राचिन इतिहास आहे. पुरी कोकणावर राज्य करणार्‍या शिलाहारराजवंशाची कुलदेवता महालक्ष्मी होती असे उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतात.

मुंबईचे प्राचीन कुलदैवत महालक्ष्मी
महालक्ष्मी मंदिराचे जुने छायाचित्र

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

इतिहास, पर्यटन व माहितीपर व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

जसे की शिलाहारांच्या ज्या तीन प्रमुख शाखा होत्या ज्या अनुक्रमे उत्तर कोकण, दक्षीण कोकण व कोल्हापुर इत्यादी प्रांतात नांदत होत्या. कोल्हापुर येथील शिलाहारांचे दैवत कोल्हापुर येथील महालक्ष्मी होते व यांच्या लेखांत ते आपणास महालक्ष्मीचा वरप्रसाद असल्याचा वारंवार उल्लेख करतात.

उल्लेखनिय गोष्ट अशी की कोल्हापुर येथील महालक्ष्मी मंदीरात तीन प्रमुख देवता आहेत त्या म्हणजे महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली. आणि योगायोगाने मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातही याच तीन देवतांच्या मुर्त्या स्थानापन्न आहेत यावरुन हे लगेच लक्षात येते की कोल्हापुरकर शिलाहारांप्रमाणे उत्तर कोकणच्या शिलाहारांनी देखील आपल्या कुलदेवतेची स्थापना पुरी अर्थात मुंबई येथे केली होती. मात्र परचक्रात हे मंदिर उध्वस्थ झाले.

पुढे ब्रिटीश काळात वरळीचा बांध बांधण्याचे कार्य जेव्हा हाती घेण्यात आले तेव्हा हे बांधकाम सारखे कोसळतं होते व अशावेळी या बांधकामाचा इंजिनिअर रामजी शिवजी नामक एक प्रभु होता.

त्यांच्या स्वप्नात या देवतांनी दर्शन देऊन त्यांना समुद्रातून काढून परत त्यांची स्थापना करण्यास सांगितले तेव्हा शोधमोहीम हाती घेऊन या तिनही मुर्त्या समुद्रातून बाहेर काढण्यात आल्या व यांचे मंदिर ज्या ठिकाणी बांधण्यात आले तेच सध्याचे महालक्ष्मी मंदीर. यानंतर वरळीच्या बांधाचे कार्यही निर्विघ्न पणे पार पाडले.

मुद्द्याची बाब ही की ज्या अर्थी या तिनही मुर्त्या समुद्रामध्ये विसर्जित अवस्थेत आढळल्या त्यार्थी यांचे एक प्राचिन मंदिर मुंबई अर्थात पुरी बेटावर अस्तित्वात होते व परकियांच्या चक्रात ते नष्ट झाले.

तसेच महालक्ष्मी चे हे मंदिर कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील मुर्त्यांसोबत साम्य दर्शविते व महालक्ष्मी ज्या अर्थी शिलाहारांची कुलदैवता होती त्यार्थी त्यांच्या पुरी या राजधानीच्या ठिकाणीच
या कुलदेवतेचे मंदीर असणे वास्तवास धरुन आहे कारण उत्तर कोकणातील इतर कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारचे मंदिर पाहण्यात नाही. तेव्हा उत्तर कोकणाची राजधानी पुरी ही मुंबईच हेच मानणे योग्य राहील.