कोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन

'भार्गवराम मंदिर, कातळशिल्प, निसर्ग चमत्कार' देवाचे गोठणे ता. राजापूर जि. रत्नागिरी परिसर लोकसहभागातून वारसा संवर्धन व पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे.

कोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

राजापूर तालुक्यातही देवाचे गोठणे हे एक नितांत सुंदर असे गाव. या गावातील देऊळ वाडी परिसर.

कोंकण भूमीचा निर्माता म्हणून ज्याकडे पाहिले जाते त्या 'भार्गवरामाचे' म्हणजे 'भगवान परशुरामाचे' सुमारे 300 वर्ष जुने मध्ययुगीन कालखंडातील मंदिर.

  • मंदिरापासून जवळील सड्यावर जाणारी प्राचीन चिरेबंदी पाखडी
  • सड्यावर अश्मयुगीन कातळशिल्प.
  • कातळशिल्प परिसरात जांभा दगडातील चुंबकीय विस्थापन हा निसर्गातील एक आगळावेगळा निसर्ग चमत्कार .
  • जगाच्या पाठीवर स्वतःचे वेगळेपण जपणारी सड्यावरील जैवविविधता 
  • परिसरात आढळणारे विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, दुर्मिळ वृक्षसंपदा या सर्व बाबींनी हा परिसर परिपूर्ण आहे.

आम्ही निसर्गयात्री संस्था 2015 सालापासून या परिसरात काम करीत आहोत. कातळशिल्प रचना व निसर्ग चमत्काराचा शोध संशोधन, परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी या सोबत आपल्या वारसा बाबींचे संरक्षण संवर्धन होणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांच्या जोरावर सदर कातळशिल्प परिसराला 'राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा' मिळणे तसेच 'युनेस्को जागतिक वारसा स्थळात' तसेच 'जैवविविधता वारसा स्थळ म्हणून'  हा परिसर समाविष्ट होणे बाबतचे प्रस्ताव शासन स्तरावरून पुढील कारवाई साठी प्रस्तावित आहेत. 

एकंदरीत या परिसराला अनन्य साधारण महत्व आहे. या परिसराला सुयोग्य बाबींची जोड दिल्यास एक उत्तम वारसा पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर पुढे येऊ शकतो. ज्या जागेत कातळशिल्प व निसर्ग चमत्कार पहावयास मिळतो ती जागा श्री निलेश आपटे आणि परिवाराची आहे. या कुटूंबियांनी आपला वारसा जतनासाठी आश्वासक पाऊल उचललेले आहे. या कुटूंबियांच्या सहकार्याने व लोकसहभागातून परिसर विकास ही संकल्पना हाती घेऊन काम सुरू केले आहे. 

या कामात पुढील प्राथमिक बाबींचा समावेश आहे 

  • भार्गवराम मंदिर ते कातळशिल्प या मार्गावर मार्गदर्शक तसेच माहिती फलक उभारणे ( परिसरातील जैवविविधता माहिती फलकांच्या माध्यमातून उलगडणे)
  • पाखाडीची मार्गावर क्षणभर विश्रांतीसाठी व्यवस्था निर्माण करणे. 
  • नैसर्गिक संसाधनांचा वापर करून कातळशिल्प परिसरात लहानसे माहिती केंद्र उभे करणे. 
  • गावातील तरुणांना मार्गरदर्शक म्हणून तयार करणे.
  • भार्गवराम मंदिरात लहानसे संग्रहालय तयार करणे. 
  • परिसरातील महिला वर्गाला खाद्य निर्मितीचे प्रशिक्षण देणे. 
  • विविध कार्यशाळांचे आयोजन करणे. 
  • ग्रामपंचायतच्या माध्यमातून सड्यावर जाणेसाठी गाडी रस्ता तयार करणे. 
  • जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंदिराच्या शेजारील नदीतील गाळ उपसणे. 

अशा प्रकारची कामे प्रस्तावित आहेत. 

सदर कामाचा प्राथमिक टप्यातील अंदाजीत खर्च रु 7 लाख अपेक्षित आहे. श्री निलेश आपटे आणि परिवाराच्या मदतीने या कामांची मुहूर्तमेढ करण्यात आली आहे. कार्यसिद्धीस जाण्यास आपणा सर्वांना आर्थिक मदतीचे आवाहन करीत आहोत. 

आपल्या मदतीने या परिसरातील समृद्ध वारशाचे जतन होईलच त्याच बरोबर परिसरात आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदतगार देखील होईल. 
तरी कृपया आपण सढळ हस्ते आर्थिक मदत करावी ही विनंती . आपली मदत खाली नमूद केलेल्या ठिकाणी पाठवू शकाल.

धन्यवाद 
निसर्गयात्री संस्था , रत्नागिरी 
नोंदणी क्र. F- 0005950( RTN)
Nisargyatri Sanstha, Ratangiri 
Bank of Maharashtra, Ratnagiri city branch
Ratnagiri 415612
A/c 60305798245
IFSCode MAHB0000008
अधिक माहिती साठी संपर्क क्र
सुधीर रिसबुड  9422372020
निलेश आपटे   7498089312
धनंजय मराठे  9423297736
ऋत्विज आपटे  7507134624

निसर्गयात्री संस्था बँक अकाउंट व्यतिरिक्त वर नमूद केलेल्या श्री धनंजय मराठे , श्री ऋत्विज आपटे यांच्या जि, पे नंबर वर देखील आपण आपली मदत पाठवू शकाल.
( वि. वि. आपण केलेल्या मदतीचे स्वरूप कृपा करवून वरील कोणाच्याही व्हॉट्सऍप वर कळवावी म्हणजे आपल्याशी संपर्क साधणें सोयीचे जाईल ) 
धन्यवाद