राज्यातील पर्यटन विकासाला चालना - पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

राज्यावर आलेले कोरोनाचं संकट जगभर पसरलं आणि याचा सर्वांत जास्त परिणाम उद्योग,पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

राज्यातील पर्यटन विकासाला चालना  - पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

पर्यटन, उद्योग व्यावसाय आता पूर्ववत झाले. गोवा राज्यातील किंवा जगभरातील किनारे शॅकमुळे प्रसिद्ध आहेत. कोंकण पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण राबवून समुद्रकिनाऱ्यांचा क्षमतेनुसार विकास करण्यात येत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर यांचा समावेश आहे. आठ किणाऱ्यांवर हे सुरू करण्यात येत आहे. प्रत्येकी दहा शॅक उभारुन हा पायलट प्रोजेक्ट करण्यात येत आहे. यात ८० टक्के रोजगार निर्मीतीला प्राधान्य देण्यात येत आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून परिसरातील, किनाऱ्यावरील स्वच्छता व सौदर्य राखून पर्यटकांना सुविधा व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. भविष्यामध्ये इतर समुद्रकिनाऱ्यावर देखील हा नाविण्यपूर्ण उपक्रम शासनाने हाती घेतला आहे.

शीर्डी, पंढरपूर, अष्टविनायक प्रमाणेच राज्यातील धार्मीक स्थळांचा विकास, पायाभूत सोयी-सुविधा आणि अध्यात्मिक पर्यटन विषयक जनजागृती करण्यात येत आहे त्यानुसार पर्यटन व तीर्थक्षेत्र यांना संलग्न राहून योजना येत आहे त्याअनुषंगाने अष्टविनायक परिमंडळाच्या विकासासाठीचा आराखडा तयार केला आहे. स्वच्छतागृहे, चेंजींगरुम, भक्तनिवास किंवा वसतीगृहे, शिवाय तीर्थक्षेत्र परिसराचे सौदर्य वाढवून भाविकांना आध्यात्मसोबत पर्यटनचा आनंद देण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. फलोत्पादन योजनेला गती देण्यासाठी विकेल ते पिकेल’ ही महत्त्वकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना हमखास भाव मिळणे शक्य होणार आहे. बाजारपेठ, मागणी कमी झाली की, शेतकरी तोट्यात असतात. व्यावसाययिक आणि प्रायोगशील शेतकरी त्यांचे उत्पादन ग्राहकांना योग्यत्या भावात येत्या काळात विकू शकतील.

निसर्ग चक्रीवादळाने आंबा, काजू, नारळ, सुपारी आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना भरपाई बरोबरच त्यांना पुर्वपदावर येण्यासाठी बागायतदारांच्या मागणीनुसार 1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री काळातील जुनी रोजगार हमी योजना पुन्हा शासनाने सुरू केली आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटीका योजनेंतर्गत महिला बचतगटांना व महिला कृषि पदवीधारकांना दोन ते अडीच लाखांपर्यंतच अनुदानातून ग्रामिण भागातील महिलांना प्रोत्साहन व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

रायगड जिल्हा हा भौगोलिक, नैसर्गीक, औद्योगिकदृष्ट्या खूप सपन्न आहे. इथले समुद्रकिनारे, किल्ले रायगड, जंजिरा, अभयारण्य, प्राचीन लेणी, पाली-महड सारखी तीर्थक्षेत्रे, माथेरान सरखं हिलस्टेशन, घरापूरची लेणी आणि विविध पर्यटन स्थळे यांचा सर्वांगिण विकास करुन येथे येणाऱ्या पर्यटकांना राहण्याच्या योग्य, स्वच्छ सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न आहे. पर्यटकांना जिल्ह्यात आल्यावर 4 ते 5 दिवस राहता, फिरता यावे यादृष्टीने ‘टूरिस्ट हब’ या जिल्ह्यात व्हावा यासाठी पर्यटन विभाग व स्थानिक प्रशासन मिळून प्रयत्न करीत आहोत. खारघर येथे एम.टी.डी.सी. रेसिडेन्सीच सुरू करण्यात आले आहे..

समुद्र किनारी आलेला पर्यटक आजूबाजूला असलेल्या अनेक स्थळांना भेट देतील व वास्तव्य करतील या दिशेने विकास करून ‘रायगड जिल्हा पर्यटन पॅकेज’ म्हणून येणाऱ्या काही काळात पर्यटकांना देण्याचा आमचा प्रयास आहे. कुडा लेण्या विकास, एलिफंटा लेण्यांचा विकास, मुरूड जंजीरा इ. विकास करण्यासाठी ASI कडून परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. कर्नाळा, फणसाड या अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

राज्यातील उद्योग, पर्यटन, क्रीडा क्षेत्राताला चालना देण्याबरोबरच राज्यातील अलिबागचा पांढरा कांदा, रोटा सुपारी, काजू या पिकांना GI मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.