पृथ्वीवरील दिवस व रात्र

पृथ्वी ही सतत फिरत असल्याने तिचा ठराविक भाग क्रमाक्रमाने सूर्याच्या समोर येतो व ठराविक भाग हा मागील बाजूस जातो व त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर दिवस व रात्र हे वेगवेगळ्या वेळी अनुभवायास मिळतात.

पृथ्वीवरील दिवस व रात्र
दिवस व रात्र

पृथ्वीवर वास्तव्य करणाऱ्या समस्त जीवसृष्टीस दिवस व रात्र या दोन स्थिती अनुभवायला लागतात. आपल्या सूर्यमालेत सूर्य हा स्थिर असून त्याच्या भोवताली सूर्यमालेतील सर्व ग्रह फिरतात व यामध्ये पृथ्वीचा सुद्धा समावेश होतो.

सूर्याच्या भोवताली फिरताना पृथ्वीला स्वतःच्या कक्षेत देखील फिरावे लागते व हा काळ चोवीस तासांचा असतो. पृथ्वी ही गोलाकार असल्याने ज्यावेळी ती स्वतःच्या भोवती फिरत असते त्यावेळी तिचा अर्धा भाग सूर्याच्या समोर तर अर्धा भाग मागील बाजूस असतो त्यामुळे सूर्याच्या दिशेस जो भाग असतो त्या भागावर सूर्याचा प्रकाश पडून त्या भागावर दिवस असतो व मागील भागावर सूर्याचा प्रकाश पडत नसल्याने त्या बाजूस रात्र असते.

अर्थात पृथ्वी ही सतत फिरत असल्याने तिचा ठराविक भाग क्रमाक्रमाने सूर्याच्या समोर येतो व ठराविक भाग हा मागील बाजूस जातो व त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर दिवस व रात्र हे वेगवेगळ्या वेळी अनुभवायास मिळतात.

पृथ्वी ही चोवीस तासात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते म्हणजे तिचे एक चक्र होते आणि पृथ्वी ही गोलाकार असल्यानं तिच्या चक्राचे ३६० भाग करून त्यांना अंश असे नाव दिले आहे.

जर चोवीस तासात पृथ्वी ३६० अंश फिरते त्याप्रमाणे प्रत्येक तासाला पृथ्वी १५ अंश फिरते हे प्रमाण मिळते. पृथ्वीवर एक अंश म्हणजे एक रेखांश म्हणजे एका तासाला एकूण पंधरा रेखांश होतात.

या रेखांशांवरून कुठल्या स्थळी कुठली वेळ आहे याचा अंदाज लावला जातो त्याचप्रमाणे एखाद्या दोन ठिकाणांच्या वेळांवरून त्या त्या ठिकाणांचे रेखांश काढणे सुद्धा शक्य होते.

उदाहरणार्थ काशी येथे सकाळचे सहा वाजले असतात त्याचवेळी आपल्याला लंडन येथे किती वाजले आहेत हे पाहायचे असल्याने लंडन चे रेखांश काढणे गरजेचे असते आणि काशी हे लंडनच्या पूर्व दिशेला ८२ अंश - ३०' रेखांशावर आहे. पंधरा अंशास एक तास या प्रमाणे या दोन ठिकाणांच्या अंशाचे परिमाण काढल्यास लंडन येथे रात्रीचे साडे बारा वाजले असल्याचे समजून येते.

त्याचप्रमाणे मुंबई येथे बारा वाजले असतील त्यावेळी म्यानमारमधील रंगून येथे दोन वाजले असतात त्यावरून मुंबई आणि रंगून यांच्यांत ३० रेखांशाचे अंतर आहे हे लक्षात येते. पृथ्वीवरील दिवस व रात्रीचा खेळ हा असा मनोरंजक व ज्ञानरंजक आहे.