बुधादित्य मुखर्जी - बुद्धी व प्रतिभेचा मिलाप
पं भालचंदर हे दक्षिण भारतातील उच्च कोटीचे वीणा वादक, त्यांनी रेडियो लावला आकाशवाणी संगीत सम्मेलन ऐकण्या करता, त्यात एका तरुणाचे अप्रतीम अस सतार वादन ऐकून ते मुग्ध झाले व म्हणाले "हा तरुण कलाकार ऐकून मला अस वाटत की ह्या शतकातील सरवोत्कृष्ट सतार वादकास मि ऐकत आहे " पं भालचंदर ह्यांनी हि पावती दिली ति अतिशय दुर्मिळ प्रतिभे च्या पं बुधादित्य मुखर्जी ( मुखोपाध्याय) ह्यांना.
बुद्धिजीवी,गायकी अंगाच वादन, वादनातील बारकावे, डावा व उजवा हाताचे अनन्य साधारण काम आणी त्यातील बैलेंस,मींड काम, राग विस्तार,द्रुत अति द्रुत सहज वादन व त्यात स्पष्टता, ताना, गोडवा, रागदारी ते ठुमरी, टप्पा वादन कौशल्य, अतिशय सुरेल घराणेदार वादन ह्या सर्व गुणांचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे पं बुधादित्य मुखर्जी, हे सर्व करण्या करता कष्ट किती अपार, तर स्वतः IIT खरगपुर इथे BTech करत असताना, ह्यांचा वडिलांनी ह्यांचा करता ७० च्या दशकात एक बंगला भाड़े देऊन घेतला ज्यात एक खोली फक्त अभ्यासा करता व एक रियाज़ा करता होती, कॉलेज वरुन आल्यावर अभ्यास करून जेवण झाले की रात्री ३ तास रियाझ , परत पहाटे ३ वाजता उठून २ तास रियाझ, मग अभ्यास, मग पुन्हा कॉलेज, शनिवार रविवार, दिवस भर अभ्यास व रात्र भर रियाझ एखाद तास झोप विश्रांती असा अविरत श्रम ज्यांनी अनेक वर्ष केले ते बुधादित्य जी, विशेष म्हणजे BTech मधे Metallurgy ह्या विषयात ते प्रथम आले आणी त्यांना सुवर्ण पदक मिळाले व तसेच ह्याच काळात त्यांना राष्ट्रीय पातळी वरील स्पर्धेत हि ते पहिले आले व त्यांना सुवर्ण पदक मिळाले.
पुढे ह्यांनी doctorate हि केले Metallurgy मधून, खरगपुर इथून, एकूण २ वेळा राष्ट्रीय पातळी वर प्रथम आलेले, तरीही शिक्षणा कड़े अजीबात दुर्लक्ष्य न केलेले, अफाट बुद्धि व कष्टा मधून तयार झालेले पं बुधादित्यजी, हे सर्व होण्या करता ज्यांचे अथक परिश्रम होते, ते म्हणजे पं बिमेलेन्दु मुखर्जी , बुधादित्य ह्यांचे वडील ज्यांच्या तालमीत सर्व शास्त्रीय संगीताचे शिक्षण सतार, सुरबहार,तबला व गायन ह्यातून सुरु होते, जरी सतार , सुरबहार जरी मुख्य वाद्य तरी हि गाणे व तबला हे गरजेचे !
आता घराणेदार तालमी कड़े वळुयात, बुधादित्य ह्यांचा वादनात इमदादखानी बाज ऐकण्यास मिळतो अगदी पारंपरिक सतारी , सुरबहार वरील बंदिशी हि ज्या खुप दुर्मिळ आहेत, वादन शैली हि इमदादखानीच, तरीही ज्या प्रतिभे व प्रगलभतेनी ख्याल अंगाची रागदारी वाजवतात त्यांच तोड़ीत, उपशास्त्रीय अंगाचे ठुमरी ,टप्पा हा प्रकर हि अगदी सुंदर सहज ते पेश करतात, सतारी वर हे वादन करणारे अतिशय कमी कलाकार आहेत, ह्या सर्व गोष्टि चे मुळ म्हणजे हे सर्व त्यांच्या रक्तात आहे, असाधारण प्रतिभेच्या वडिलां कडून त्यांना मिळालेले आहे, वया च्या ५ व्या वर्षी पासून वडिलांनी तालीम दिली, वडील पं बिमेलेन्दु हे उस्ताद इनायत खान ( उ विलायत खान साहेबांचे वडील) साहेबांचे गंडाबंध शिष्य अनेक वर्षाची तालीम , तसेच पं बलरण पाठक ह्यांचा कडूनही सतारी ची तालीम, गाण्याची तालीम किराणा घराण्या चे पं बदरी प्रसाद व पतियाळा घराण्याचे पं जयचंद भट ह्यांचा कडून आणी सारंगी इसराज वादक पं हलकिराम भट ( मैहर घराण), पं चंद्रिकाप्रसाद दुबे (गया घराणे) आणि रामपुर घराण्यातील बीनकार पं ज्योतिषचंद्र चौधरी ह्यांचा कडून घेतली होती, तसेच पखवाज तालीम पं माधवराव आलकुटकर ह्यांचा कडून घेतली होती, पं बिमेलेन्दु ह्यांनी बुधादित्य ह्यांना सुरबहार ची जी विशेष तालीम दिली ना ते सर्व त्यांनी आत्मसात केले होते त्यांच्या आजुन एका मोठ्या प्रतिभावंत कलाकार पं आचार्य बीरेंद्र किशोर रॉय चौधरी ज्यांनी सुरसिंगार ची तालीम ह्यांना दिली !!
वडिलां कडून इतका श्रीमंत ज्ञानाचा वारसा पुढे समर्थपणा नी पं बुधादित्य चालवत आहेत, ह्या प्रतिभेस अनेक मान सन्मानानी प्रदान झालेत, मध्य प्रदेश येथील दुर्ग इथे १९५५ साली जन्मलेले पं बुधादित्य हे आज ६४ वर्षाचे झाले, त्यांच्या दिसण्यात किवा वादनात आजही वय कुठेच दिसत नाही ,जे कौतुक २० व्या वर्षी पहिल्या जाहिर कारेक्रमात पं सत्यजीत रे ह्यांनी केले ते ६४ वर्षात वृद्धिंगत होत आलेल आहे हे निर्विवाद, पं बुधादित्य ह्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन !!
- नंदन वांद्रे