जुन्नर तालुक्यातील तुळजा लेणी

महाराष्ट्रात सातवाहनांच्या राजवटीत लेणी निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. इ.पू पहिल्या शतकात लोणावळ्या जवळ भाजे लेणे कोरले गेले. पुढे नाणेघाटाची निर्मिती झाली. कल्याण, सोपारा, चौल सारख्या बंदराशी जुन्नर बाजारपेठ जोडली गेली.

Apr 26, 2024 - 12:39
 273
जुन्नर तालुक्यातील तुळजा लेणी

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.

पैठण, तेर, भोकरदन, उजैन अश्या मोठ्या शहराशी जुन्नर व्यापारी मार्गाने जोडले गेले.

धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बौध्द भिक्षू या व्यापारी मार्गावरून प्रवास करू लागले. आणि मग त्याच्या निवासासाठी, पर्जन्यकाळी आसरा अश्या उद्देशाने या व्यापारी मार्गावर डोंगरात, कातळ खोदून लेण्यांची निर्मिती झाली.

एकट्या जुन्नर परिसरात दोनशेहून जास्त लेणी आहेत. स्थानिक, परकीय व्यापाऱ्यांनी यासाठी दान, सहाय्य दिल्याचे शिलालेख लेण्यावर कोरलेले आढळतात. त्यापैकी जुन्नर भागातील सर्वात आद्य लेणे म्हणजे ह्या तुळजा लेणी...

तुळजा लेणी समूह १३ लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे, यापैकी आपण महत्वाच्या लेण्यांची आता माहिती घेऊ...

लेणे क्र २, हा विहार, चौरस मंडप असून आत बौध्द भिक्षूंच्या निवासासाठी ५ खोल्या आढळतात.

लेणे क्र ३, हे चैत्यगृह असून, त्याचा आलेख वर्तुळाकार असून मध्यभागी स्तूप व त्याचे भोवती उभे अष्टकोनी स्तंभ आहेत, त्याचा खालील भाग रुंद असून वर निमुळता आहे. स्तूपात मेढि, अंड हेच भाग सध्या शिल्लक आहेत, मात्र येथील हर्मिका नष्ट झाली आहे, स्तुपाकर घुमटाकार छत असून, हे जुन्नर भागातील सर्वात पहिले लेणे समजले जाते, नीट लक्ष देऊन अभ्यासले असता याच्या छतावर पूर्वीचे रंगकाम आढळते, इतिहास अभ्यासक याचा निर्मिती काळ इ.पू पहिल्या शतकातला असण्याचा दाखला देतात.

लेणे क्र ४, बाहेरून खोलीत सारख्या दिसणाऱ्या लेण्यात बाहेर दगडी पादुका आहेत, तर आतमध्ये तुळजा देवीची मूर्तीची स्थापना केलेली आहे. या तुळजादेवी वरून हा लेणी समूह, तुळजा लेणी समूह म्हणून ओळखला जातो.

लेणी क्र ६ ते १२ या लेण्यात सुंदर कोरीवकाम असणाऱ्या चैत्य कमानी काही प्रमाणात शाबूत आहे, सोबत जुना फोटोही जोडला आहे.

लेणी क्र १३, येथे मोठा चौरस मंडप असून , तिन्ही बाजूस बसण्यासाठी दगडी बाक कोरलेले आहेत, तर या लेण्याच्या खालच्या बाजूस पाण्याची कुंडे कोरलेली आहेत.

या लेणी समूहातून दिसणारे किल्ले शिवनेरीचे विहंगम दृश्य, लेण्याबाहेर फुललेले चाफ्याचे झाड, नीरव शांतता, आणि मूर्ती व लेणी अभ्यासक सदानंद आपटे काकांनी सांगीतलेली अभ्यासपूर्ण माहिती!!! एक ना अनेक कारणांनी ही लॉकडाऊन मधील (JSS) जुन्नर भेट, अविस्मरणीय ठरली हे मात्र खरं...

संदर्भ -

  • जुन्नर परिसरातील बौद्ध लेणी - सदानंद आपटे
  • जुन्नर शिवनेरी परिसर - सुरेश वसंत जाधव
  • लेणी महाराष्ट्राची - दाऊद दळवी
  • प्राचीन महाराष्ट्र - डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर (प्र आ १९३५)(दु आ १९८९)

- ऍड. हेमंत वडके

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा