कै. गोपाळराव भोंडे - विस्मरणात गेलेले एक प्रतिभावंत कलाकार

कला व प्रतिभा हि कोणाचा हि मालकीची नसते ती कुठं कोणाच्या घरी जन्मेल ह्याचा नेम नाही, कला ना  व्यक्ती बघते, ना स्त्री पुरुष भेद करते, ना तिला गरीब किंवा श्रीमंत काही जाणवते.

कै. गोपाळराव भोंडे - विस्मरणात गेलेले एक प्रतिभावंत कलाकार

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आपल्या मोठ्या मित्र परिवारामधले एक समवयस्क जुने स्नेही ह्यांचे आमंत्रण आले मुलीचा लग्नाला उपस्थित रहावे म्हणून, पण त्यास जाणं जमलं नाही, काही दिवसांनी त्याच घरातून अजून पत्र आले "नानासाहेब ह्यांना अर्धांग वायू चा झटका आल्याने ते अंथरुणास खिळून आहेत ,त्यांनी हाय खाल्ली व तुमचा ध्यास धरला आहे ", तब्बेत बरी नसताना, पाय दुखत असताना हि पहिली गाडी गाठून ते तत्परतेने निघाले ....

लांब फाटका पासूनच घोगऱ्या व लवचिक आवाजात ,मोठ्यांदा मारलेली "नाना साहे ss ब....." अशी हाक ऐकू आली व हा आवाज ऐकताच नानासाहेबांचा चेहरा प्रफुल्लित झाला , काना मंत्र सांगितल्या प्रमाणे मनाला उभारी आली, गोपाळरावांचाच तो आवाज होता, लांबवरून हाक मारत यायची हि त्यांची पद्धत होती !

गोपाळराव ह्यांचा येण्याने कुटुंबात आनंदी वातावरण झाले, नानासाहेबांच्या प्राकृतीत आश्चर्यकारक प्रगती दिसून आली ,गोपाळराव ह्यांचा कोट्या विनोद नकला ह्यातून नानासाहेब चार महिन्यात न हसलेले नानासाहेब भरभरून हसले ,चेहरा काही दिवसात टवटवीत दिसू लागला, औषधोपचारा पेक्षा जास्त ह्या भेटीने नानासाहेब सुखावले व सुधारणा झाली ती इतकी कि ४ महिने अंथरुणावर असलेले नानासाहेब गोपाळराव पुण्याला निघाले तेव्हा चालत दरवाजा पर्यंत आले सोडवायला, हसतमुख व आनंदी !!!

रंजल्या गांजलेल्यांना सहाय्य, दुःखी कष्टी जीवाना धीर देणे,आणि आपत्तीतल्या मित्रांचा करता धावत जाणे हा त्यांचा गुण, कारण, "ते मनाचे डॉक्टर होते ".नकला विनोद कोट्या ह्यातून हसवत ठवणे हे ह्या गुणवंताचे भरजरी गुण !!

 " नकलेला कलेचा उच्चासनावर बसवणारे विख्यात नकलाकार कै गोपाळ भोंडे " ह्या वाक्या मधून मला ह्या महान कलाकारा चा गौरव व प्रथम परिचय करून दिला तो गुरुवर्य आदरणीय पद्मविभूषण,महाराष्ट्र भूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी, एके दिवशी दुपारी इतिहास चर्चा झाल्या वर आठवणी चा  खजिन्यातून बाबासाहेब ह्यांनी काही मोठ्या लोकांचा नकला व आवाजाची ढब बसल्या बसल्या करून दाखवले व तद्नंतर नकालां वरून त्यांना स्मरण झाले व म्हणाले एक खूप खूप मोठा कलाकार होऊन गेले , त्यांचा सारखे नकलाकार आधी झाले नाही व नंतर हि कदाचित होतील," नकलाकार कै गोपाळराव भोंडे ", पु ल देशपांडे ह्यांचा शेजारी बसून आम्ही गोपाळराव ह्यांचा नकला पाहून मी व  पु ल देशपांडे खूप खूप म्हणजे प्रचंड हसलो आहे, त्यांचा कलेतील शक्ती व गुण अलौकिक आहे , भोंडे ह्यांनी नकालां मधून हजारो लोकांना आनंद दिला, दिवंगतांचे दुर्लभ दर्शन घडवले, लोकरंजना बरोबर लोकप्रबोधन हि साधले , आपल्या कलेची माला समाजाला वाहिली हिच त्यांची खरी थोरवी, त्यांचे लौकिक व लोकप्रियता हि त्यांचा समाजसेवा व सुस्वभावी वृत्तीमुळेच !!

बाबासाहेब ह्यांनी कौतुक केलेल्या ह्या मनस्वी उच्च कोटींचा कलाकाराचा पंचाहत्तरी चा गौरव माला प्रचंड स्फूर्ती देणारे संगीत कला इतिहास अश्या अनंत विविध विषयांवर अभ्यास व्यासंग असलेले कै गंगाधर उर्फ आबासाहेब मुजुमदार ह्यांनी केला,हे जाणून मला अति आनंद झाला !!    

३१ऑक्टोबर १८८१ ला पुण्यात जन्मलेले गोपाळराव "केसरी व मी एकाच दिवशी जन्मलो" असा विनोद करत , त्यांचे वडील वडगाव मावळ जवळ पाले ह्या गावी राहत नोकरी निमित्त जे पुण्यात येऊन स्थायिक झाले, गोपाळराव हे नू म वि मधून शिकून ,शिक्षण संपवून ,डिफेन्स अकाउंट मधे नोकरीस लागले, शालेय वया पासून विलक्षण निरीक्षण व व्यक्तित्व अभ्यास हा त्यांचा हातखंडा ! निरीक्षण, अभिनय, अंगविक्षेप, आवाज,मुद्रा ह्या अनुकरणकलेचे सर्वांग अभ्यास त्यांचा मधे मुरलेला होता.

फर्ग्युसन कॉलेज चे माजी विद्वान प्रिंसिपॉल वै का राजवाडे हे अतिशय गंभीर वृत्तीचे त्यांन त्यांचा कारकिर्दीत कोणी हसताना पाहिलेलं नव्हते, कोलेज मधे शिवताना विनोदी उतारा आला कि " तुम्ही इथं हसला पाहिजे" असं म्हणणारे राजवाडे होते.

कॉलेज मधे राजवाडे हसले तर आपण ५ रु चे पेढे वाटू अशी पैज एका विद्यार्थ्यांने लावली, त्याच वेळी कॉलेज चा अध्यापकांचा मेळाव्यात भोंडे ह्यांनी नक्कल केली ती गोविंद चिमणाजी भाटे ह्या अध्यापक गृहस्थाची  डोक्याला रुमाल बांधण्याची तर्हा, कपाळावर आठ्या अरशीची ठेवण ,आवाजातील लकब, चढ उतार, बघण्याची पद्धत , as it were, हा अनावश्यकपणे वारंवार उच्चरला जाणारा शब्द प्रयोग ह्या सर्व बारकावे भाट्यांचा इतक्या बेमालूम पणे केल्या कि स्वतः भाटे व वै का राजवाडे ह्यांना किती वेळ हसू आवरेना , आयुष्यात राजवाडे हसताना पाहून लोकांना आनंद तर झालाच पण भोंड्या करता विशेष टाळी पडली !! असे एक ना अनेक अनंत किस्से हसू आनंद लुटणारे भरभरून त्यांनी दिले,त्यांचा कडे दीडशे ते दोनशे नकलांचा भरणा होता , लहान मुला पासून वृद्ध व्यक्ती पर्यंत अनेकांचे हुबेहुब नक्कल अगदी सहज ते करीत, ह्याचा त्यांनी कधी गैरवापर केला नाही , पैसा अकारण कमावला नाही,लोकांना दुःख त्रासातून काही काळ आनंद व स्वच्छनदी हसता यावे हा प्रयत्न केला ! 

भोंडे हे निगर्वी व बुद्धिवान होते ,मार्मिकपणे लोकांना नकलां मधून चांगले संदेश हा त्यांचा अट्टहास होता, बौद्धिक आनंद सात्विक व श्रेष्ठ मानत त्यांनी सर्वांना सर्वत्र दिला,बौद्धिक आनंद व तो ही हुकमी निर्माण करणाऱ्या भोंड्यांची प्रशंसा करावी तेवढी कमी ,कारण  ते बुद्धी ला खाद्य पुरवीत, वेडे वाकडे अंगविक्षेप व माकडचाळे करून हसवणे सोपे पण तो मार्ग त्यांनी निवडला नाही , मार्मिक कोट्या भेदक अनुकरण हे त्यांचे भांडवल, फाजील अभिनय न करता, माफक व समर्पक अभिनय हा त्यांच्या कलेचा व विनोदनिर्मितीचा आत्मा !! त्यांच्या नकला बघून कष्टी व गंभीर माणसांचा चेहऱ्यावर ही हास्य व आनंद फुले हेच त्यांचा कलेचे यश !!

बालगंधर्व ह्यांचा बरोबर रंगमंचावर " एकच प्याला " प्रयोगात वैद्याचा  उत्तम अभिनय करून लोकांना भरभरून हसवलेले आहे ते इतकं की त्या काळच्या तळीराम भूमिका करणारे भांडारकर ह्यांना मृत्यू शैयेवर अभिनय करताना हसू आवरेना !!! प्रयोग संपताच बालगंधर्व ह्यांनी त्यांना कडाडून मारलेली मिठी हि शाबासकी होती कारण एकूण तीन भूमिका त्यांनी केल्या पण लोकांना समजलं ही  नाही एकच व्यक्ती ह्या भूमिका करत आहे !!

 त्यांनी केलेल्या मोठ्या लोकांच्या नकलांचा हा तपशील बघा 

 •  - लोकमान्य टिळक
 • - भालाकार भोपटकर
 • - शिवरामपंत परांजपे
 • - रँग्लर परांजपे
 • - स्वा सावरकर
 • - जमनादास मेहता
 • - ह भ प पांगारकर
 •  - लोकनायक आणे
 • - न ची केळकर
 • - चिंतामणराव वैद्य
 • - गो चिं भाटे
 • - महात्मा गांधी
 • - शंकरराव मुजुमदार
 • - लेलेशस्त्री
 • -ले कर्नल मॅक्डोनाल्ड 

व अजून अनंत  दिग्गज अक्षरशः समोर उभे केलेले त्यांनी. कै गोपाळराव भोंडे ह्यांचे दुःखद निधन ५ एप्रिल १९६४ साली पुण्यात झालं , त्यांच्या नावाचा पुण्यात रस्ता हि आहे. आज नकलाकार गोपाळराव भोंडे ह्यांचा १३९ वा जन्मदिवस, आज विस्मरणात गेलेल्या व पु लं सारख्या अनेक दिग्गजांना हि हसवणारे थोर कलाकार ह्यांचे स्मरण व आजचा पिढीला त्यांचा बद्दल माहिती झाली तरी माझे हे त्यांचा बद्दल चे अल्प लेखन केल्याचे मनापासून समाधान मला लाभेल निश्चितच ! 

नकलाकार कै गोपाळराव भोंडे ह्यांना विनम्र अभिवादन !

 - नंदन वांद्रे , बाणेर