श्री पाटणेश्वर मंदिर - पाटणोली पेण

पाटणेश्वर मंदिराजवळ आल्यावर आपल्याला प्रथम दिसून येते ते मंदिरासमोरील भव्य असे तळे. बाराही महिने पाण्याने भरलेले हे तळे व त्याच्या आजूबाजूची निसर्गराजी प्रथमदर्शनी मन मोहून घेते. 

Apr 16, 2024 - 20:43
 361
श्री पाटणेश्वर मंदिर - पाटणोली पेण
श्री पाटणेश्वर मंदिर - पाटणोली पेण

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.

रायगड जिल्ह्याच्या पेण शहराच्या पंचक्रोशीत जी प्रख्यात शिवमंदिरे आहेत त्यांमध्ये श्री रामेश्वर, श्री गोटेश्वर, श्री गौतमेश्वर, श्री विश्वेश्वर, श्री व्याघ्रेश्वर व श्री पाटणेश्वर या शिवमंदिरांचा समावेश होतो.

या मंदिरांमधील श्री पाटणेश्वर हे शिवमंदिरही बाकी सर्व मंदिरांसारखे पुरातन असून निसर्गाचा वरदहस्त लाभलेले आहे. पाटणेश्वर हे मंदिर पेण शहराच्या पश्चिमेकडील पाटणोली या गावी स्थित असून मंदिराचा परिसर अतिशय भव्य दिव्य आहे.

पाटणेश्वर मंदिराजवळ आल्यावर आपल्याला प्रथम दिसून येते ते मंदिरासमोरील भव्य असे तळे. बाराही महिने पाण्याने भरलेले हे तळे व त्याच्या आजूबाजूची निसर्गराजी प्रथमदर्शनी मन मोहून घेते. 

तळ्याच्या मागे पाटणेश्वर मंदिर दृष्टीस पडते. मंदिर प्राचीन असले तरी गेल्या काही वर्षात मंदिराचा जीर्णोद्धार झाला असल्याने मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. 

पाटणेश्वर मंदिराच्या समोरील प्रांगणात दोन छोटी मंदिरे असून यातील पहिले हनुमानाचे, दुसरे गणपतीचे आहे व यानंतर पाटणेश्वराचे मंदिर आहे. 

मंदिरात प्रवेश केल्यावर भव्य आणि दुमजली असे सभागृह आणि त्यासमोर तेवढेच भव्य गर्भगृह दिसून येते. गर्भगृहात श्री पाटणेश्वराचे भव्य लिंग स्थापित आहे. 

मंदिराच्या प्राचीनत्वाची प्रचिती देणारी काही नक्षीकाम केलेली शिल्प आपल्याला मंदिरासमोर असलेल्या तळ्याच्या पायऱ्यांशेजारी पाहावयास मिळतात.

पाटणेश्वर हे देवस्थान पेणच्या पंचक्रोशीतील अनेकांचे श्रद्धास्थान असल्याने सोमवार, महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात परिसरात भक्तांचा समुदाय मोठा असतो. महाशिवरात्रीस मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते व यावेळी पंचक्रोशी व कामानिमित्त इतर शहरात गेलेले स्थानिक मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमतात.

आधुनिक युगात आपले प्राचीन निसर्ग सौंदर्य जपणाऱ्या मंदिरांपैकी पाटणेश्वर हे मंदिर खऱ्या अर्थी अद्भुत अनुभव देते.

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा