कोळंबी शेती

कटला, गहू, म्रुगळ, सायप्रितस, गवत्या, चंदेर्‍या या माश्यांची मिश्र शेतीसह कोळंबी बिजाची साठवणूक करुन वाढ करता येते. गोड्या पाण्यातील कोळंबीचे लहान आकाराची पिल्ले ठाणे जिल्ह्यातील खाडी व नदीच्या क्षेत्रात ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात मिळतात.

कोळंबी शेती
कोळंबी शेती

प्रती हेक्टरी १००० कोळंबी पिल्लांची साठवणूक करावी. कोळंबीचे संवर्धन करता येतं मात्र त्यासाठी प्रती हेक्टरी सोडणं आवश्यक असते. कोळंबीस प्रथिनयुक्त खाद्य द्यावे लागते. परिणामी आवर्ती खर्चात वाढ होते. मात्र कोळंबीस चांगला बाजारभाव मिळत असल्याने आर्थिक उत्पादनातही वाढ होते.

नमुद करण्यात आलेली भुजल मत्स्यसंवर्धनाची मार्गदर्शक मुलतत्त्वे आहेत. मत्स्यसंवर्धनाचे तंत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन संवर्धनात निश्चित यश मिळू शकते. मात्र मत्स्यशेतीचे यश हे जागेची निवड, पाण्याची उपलब्धता, खतांचा उपयोग, योग्य बिजांची साठवणूक, पाण्यातील प्राणवायु, आम्लता निर्देशांक यामुळे निर्माण होणारी अन्न साखळी या सर्व बाबींवर अवलंबून असते. म्हणुन हा व्यवसाय करताना प्रामुख्याने पुढील दक्षता घ्यावी.

  • पाण्याचा पा़झर होणार्‍या जमिनीची निवड करु नये.
  • बारमाही पाणी उपलब्ध असणारे क्षेत्र संवर्धनासाठी निवडावे.
  • खात्रिलायक जातीच्या मत्स्यबिजांची योग्य प्रमाणात साठवणूक करावी.
  • मासे वाहुन जाणार नाहीत तसेच चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी.

विशेषत: सकाळच्यावेळी पाण्यातील प्राणवायु कमी झाल्यास मासे पाण्याच्या प्रूष्ठ्भागावर येवून श्वसन करतात. त्यासाठी एअर कोम्प्रेसरने हवेचा पुरवठा करावा व ताजे पाणी मोठ्या प्रमाणात घ्यावे.

रायगड जिल्ह्यात भुजल मत्स्यसंवर्धन करण्यासाठी वाव असून या उद्दयोगाद्वारे अधिक रोजगाराची निर्मिती तसेच मत्स्यसंवर्धकांच्या आर्थिक लाभातही वाढ व्हावी, म्हणून मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणा रायगड-अलिबाग येथे कार्यालय स्थापन केले आहे.

सौजन्य

मुख्य कार्यकारी अधिकारी
निमखारेपाणी मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणा, रायगड-अलिबाग