आमच्या विषयी

महाराष्ट्र राज्यास फार पुरातन अशी ऐतिहासीक, भौगोलीक, नैसर्गीक व सांस्कृतीक परंपरा लाभली आहे. सरासरी ३००० फुट उंची असलेला दुर्गम सह्याद्री पर्वत व सुमारे ७०० कि.मी. पसरलेला अथांग समुद्रकिनारा व या दोहोंच्या मध्ये वसलेले निसर्गसंपन्न कोकण, उत्तरेस सह्याद्रीशी काटकोन करणारा सातपुडा. वर्‍हाड, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ इत्यादी भौगोलीक दृष्ट्या वैविध्य असणारे प्रांत. भारताची आर्थिक राजधानी मुंबई व शैक्षणीक तथा सांस्कृतीक राजधानी पुणे, कोल्हापुर, सातारा नागपूर सारखी महत्वाची शहरे. प्राचिन दुर्ग, लेण्या, मंदिरे तसेच कृष्णा, गोदावरी सारख्या महानद्या आणि अगणीत निसर्गरम्य स्थळे या सर्व गोष्टींनी महाराष्ट्र राज्यास एक सर्वगुणसंपन्न राज्य म्हणून ओळख दिली आहे.

महाराष्ट्राचे हे नयनरम्य रुप जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्यासाठी आम्ही मराठी बझ हे संपुर्णतः मराठीतील माहिति विषयक संकेतस्थळ प्रकाशीत करत आहोत. विवीध पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.  आमच्या या संकेतस्थळाला भारतासहीत तब्बल अठ्ठेचाळीस देशांतील वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

आज शिक्षण, नोकरी तथा व्यवसायाच्या कारणास्तव इतर राज्यांत तसेच परदेशात राहणार्‍या महाराष्ट्रीय नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या राज्याशी त्यांची नाळ ते कायम जोडून आहेत . इंटरनेट हे एकाच वेळी जगाच्या कानाकोपर्‍यातून हाताळता येणारे माध्यम असल्याने लोकांना हवी असलेली माहिती शोधून काढणे सोपे जाते. कामधंद्यानिमित्त परराज्यांमध्ये तसेच परदेशांमध्ये राहणारे मराठी नागरिक आपल्या भाषेत असलेल्या आमच्या वेबसाईटवरुन आपल्या भाषेत अनेक विषयांचे वाचन करुन मराठी मातीशी व महाराष्ट्राशी असलेली आपली नाळ जोडू पाहत आहेत व हेच आमचे यश आहे व आगामी ध्येय आहे असे आम्ही समजतो.

आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]

लेख पाठविण्याचे नियम व अटी - https://www.marathibuzz.com/send-your-articles