पुस्तक परिचय - डोंगरयात्रा

डोंगर बघण्याचे, डोंगरात राहण्याचे वेड असलेल्या लोकांना आनंद पाळंदे हे नाव माहित नसणं म्हणजे दुर्मिळच. अशा या डोंगरमय झालेल्या आनंद पाळंदे यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड डोंगरयात्रा केलेल्या आहेत आणि आजही करत आहेत.

पुस्तक परिचय - डोंगरयात्रा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

सह्याद्रीत अशी एकही कडेकपारी नसेल जिथे आनंद पाळंदे पोहोचले नसतील. या त्यांच्या भटकंतीबद्दल त्यांनी केलेले विपूल लिखाण सर्वश्रुत आहे. मात्र डोंगरयात्रा या पुस्तकाच्या निमित्ताने आनंद पाळंदे यांनी डोंगरवेड्यांसाठी एक डोंगरयात्रांचा एक खजिनाच आणि तो ही नकाशासह उपलब्ध करुन दिला आहे. डोंगरयात्रा पुस्तक म्हणजे डोंगरयात्रींचा धर्मग्रंथ आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

या चारशे पानी पुस्तकात डोंगरयात्रा या क्रिडाप्रकाराविषयी शास्त्रशुध्द आणि तांत्रिक स्वरुपाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर पर्वतरांगांविषयी भौगोलिक माहिती देऊन डोंगरयात्र करण्यास आवश्यक अशा काही गोष्टींचा सविस्तर विचार केला आहे. डोंगरयात्रा करताना उपयुक्त ठरेल अशी आणि कदाचित स्वतंत्र छंदाचा विषय होऊ शकेल अशी निसर्गविषयक माहितीही परिशिष्टात दिली आहे. आणि त्यानंतर सह्याद्रीतील १०५ डोंगरयात्रांचे ११४ नकाशांच्या वर्णनांच्या आधारे विवरण केले आहे.

सह्याद्रीत भटकंती करणार्‍या आणि भटकंती करण्याची मात्र योग्य ति माहिती नसणार्‍या नवोदितांना डोंगरयात्रा हे पुस्तक एखाद्या दिपस्तंभासारखे ठरेल. आनंद पाळंदे यांनी अतिशय परिश्रम करुन हि 'गुरुकिल्ली' तुमच्या हाती दिली आहे, तेव्हा हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवे.

पुस्तकाचे नाव - डोंगरयात्रा
लेखक - आनंद पाळंदे
प्रकाशक - प्रफुल्लता प्रकाशन
पृष्ठे - चारशे पाने