शिवमुद्रा निर्मिती - शिवकार्यातून समाजकार्य

शिवछत्रपतींच्या राजमुद्रेची प्रचलित प्रतिकृती अल्प किमतीत घराराघरात पोहचवावी व या उद्योगाचं उत्पन्न सामाजिक कार्याला लाऊन देऊन शिवछत्रपतींचाच पायंडा पुढे चालू ठेवावा ही कल्पना सुचली.

शिवमुद्रा निर्मिती - शिवकार्यातून समाजकार्य
शिवमुद्रा निर्मिती - शिवकार्यातून समाजकार्य

पहिला लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिला महिना तसा ओके गेला. पण दुसरा लाॅकडाऊन चालू झाल्यानंतर मात्र हातावरील पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ ओढवली. कष्टकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला. ही परिस्थिती पाहून सामाजिक संस्थानी व समाजाप्रती आपलं काही देणं आहे असा विचार करणार्‍या व्यक्तींनी वैयक्तिक किंवा समुह करून स्थानिक पातळीवर अन्नधान्य वाटप, जेवणाची पाकिटं वाटप आदी उपक्रम सुरू केले. सुरवातीला या उपक्रमाला समाजातील लोकांचीही भरभरून मदत होत होती. पण हळूहळू ही मदत ओसरली. कारण मदत करणाऱ्यांनाही स्वतःचं कुटुंब होतं. जे मदत न घेता उपक्रम राबवत होते त्यांनीही साधारण दोन महिने पुरेल इतकी तजवीज करून ठेवली होती. परंतु लाॅकडाऊनचा कालावधी जस जसा वाढत गेला आणि केलेली तजवीज संपू लागली. दरम्यान अन्नधान्याचे भावही आसमंतात पोहोचले होते. "आता या उपक्रमाचं काय? लोकांना अन्न कसं पुरवायचं? हा प्रश्न जवळपास सगळ्यांसमोरच उभा ठाकला होता.

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे "इतिहासात खासकरून शिवचरित्रात" सापडतं. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. एक दिवस सकाळी छत्रपतींचं एक आज्ञापत्र वाचताना लक्षात आलं की.. अरेच्या.. आपल्या समोरील या समस्येचं उत्तर तर शिवछत्रपतींनी साडेतिनशे वर्षांपूर्वीच देऊन ठेवलं आहे. शिवकाळापासून "एखाद्या सामाजिक उपक्रमाला गावं लाऊन दिलं जात असे." अर्थात दरसालचे नेमून दिलेल्या गावचा महसूल हा त्या उपक्रमासाठी दिला जात असे. मग विचार केला आता आपल्याला गाव लाऊन देणं हे काही शक्य नाही पण.. एखादा उद्योग लाऊन देणं सहज शक्य आहे.. ना कोणाकडे देणगी मागायची गरज ना त्या उपक्रमाचा खोळंबा..

लाॅकडाऊन सुरू असताना अर्थातच हे शक्य नव्हतं. पण लाॅकडाऊन उठला की लगेच हे काम लगेचच करायचं असं पक्क ठरवलं होतं. लाॅकडाऊन काळात भरपूर वेळ असल्यामुळे काय व कसं करायचं व प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी बराच वेळ मिळाला. शिवछत्रपतींच्या राजमुद्रेची प्रचलित प्रतिकृती अल्प किमतीत घराराघरात पोहचवावी व या उद्योगाचं उत्पन्न सामाजिक कार्याला लाऊन देऊन शिवछत्रपतींचाच पायंडा पुढे चालू ठेवावा ही कल्पना सुचली. त्यानुसार आपला अभिमान असलेली राजमुद्रा सगळ्यांना घरपोच मिळवता येईल अशा किंमतीत म्हणजेच ₹१९९/- रूपयांत उपलब्ध करून द्यायची हे निश्चित झालं. राजमुद्रा ही मजबूत टिकाऊ असावी म्हणून फायबर + मेटलची तयार केली.

स्वराज्य एन्टरप्रायझेसच्या या उपक्रमामुळे सामाजिक कार्यास आता ना निधीची चणचण ना देणगीची.. देणगी घेऊन काम करणं निश्चितच वाईट नाही.. उलट ते तर अधिक जास्त जोखीमीचं कार्य आहे.. म्हणुनच कोणाकडून देणगी घेऊन मी कधीच काही करत नाही. कारण मला ते जमतच नाही.

सामाजिक कार्याचा डोलारा कुणा एकाच्या आधारावर असण्यापेक्षा स्वतंत्र उत्पन्न असलेले व स्वायत्त असणे असणे अधिक आवश्यक आहे. मी काय आज आहे.. उद्या नाही.. पण उद्योग स्वावलंबी असल्याने कार्य मात्र आता अव्याहत सुरू राहील..

तब्बल साडेतीनशे वर्षानंतरही शिवछत्रपतींचेच विचार अडल्या नडल्यांसाठी दोन वेळेचं अन्न देऊ शकत आहेत. स्वराज्य एन्टरप्रायझेस या उद्योगामुळे लाॅकडाऊन काळात काम गमावलेल्या दहा जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ज्यांना ज्यांना हा उपक्रम समजत आहे ते राजमुद्रा विकत घेऊन सहकार्य करत आहेत. यातून येत असलेल्या उत्पन्नातून विविध ठिकाणी छोटी छोटी का होईना पण सामाजिक कार्य पार पडत आहेत. जसजसा उद्योग वाढेल तसतसा सामाजिक कार्याचा विस्तारही आपोआपच होईल. शिवछत्रपतींना "जाणता राजा" का म्हणतात याचा प्रत्यय या अशा अनेक प्रसंगातून येत असतो.. ज्यांना शिवछत्रपतींच्या प्रचलित राजमुद्रेची प्रतिकृती हवी असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

स्वराज्य एन्टरप्रायझेस (9769 013 444 / 9769 093 222)

- श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press