भारतीय कालगणना पद्धती

भारतीय कालगणनेतही दोन प्रकार आहेत व ते म्हणजे चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष तसेच चंद्राच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना चांद्रमास व सूर्याच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना सौरमास म्हणतात.

भारतीय कालगणना पद्धती

भारतीय कालगणना ही इंग्रजी कालगणनेतून भिन्न आहे. जागतिकीकरणामुळे आपण दैनंदिन व्यवहारांत इंग्रजी कालगणनेचाच वापर करीत असलो तरी आपले सण हे आजही भारतीय कालगणेनुसारच साजरे केले जातात.

भारतीय कालगणनेतही दोन प्रकार आहेत व ते म्हणजे चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष तसेच चंद्राच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना चांद्रमास व सूर्याच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना सौरमास म्हणतात. शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल पौर्णिमेचा काळ हा एक चांद्रमास असतो तर सूर्य एका राशीत जेवढा काळ असतो तो म्हणजे सूर्यमास.

सौरमासात प्रत्येक महिन्याचे दिवस सारखे नसून कमी अधिक असतात त्यामुळे एका महिन्यात ३० तर दुसऱ्या महिन्यात ३१ दिवस व फेब्रुवारी महिन्यात कधी २८ तर कधी २९ दिवस पाहायला मिळतात. चांद्रमासात मात्र सर्व दिवस सारखे असतात. 

बारा सौरमास म्हणजे एक वर्ष आणि एका सौरमासात ३६५ दिवस असतात आणि एका चांद्रमासात ३५४ दिवस असतात. सूर्यमास आणि चांद्रमासात हा जो दिवसांचा फरक असल्याने सरासरी ३३ महिन्यांनी १ महिना जास्त धरावा लागतो ज्यास आपल्याकडे अधिकमास म्हणतात. अधिकमास ज्यावेळी असतो त्यावेळी एकूण वर्षात १३ चांद्रमास असतात.

इंग्रजी कालगणनेत जसे एकूण सात वार आहेत तसेच भारतीय कालगणनेतही आहेत व ते पुढीलप्रमाणे आहेत. 

  1. आदित्यवार अथवा रविवार
  2. सोमवार अथवा इंदुवार
  3. मंगळवार अथवा भौमवार
  4. बुधवार अथवा सौम्यवार
  5. गुरुवार अथवा बृहस्पतीवार
  6. शुक्रवार अथवा भृगुवार
  7. शनिवार अथवा मंदवार

भारतीय कालगणनेत जे १२ महिने आहेत ते पुढील प्रमाणे 

  1. चैत्र
  2. वैशाख
  3. ज्येष्ठ
  4. आषाढ
  5. श्रावण
  6. भाद्रपद
  7. अश्विन
  8. कार्तिक
  9. मार्गशीर्ष
  10. पौष
  11. माघ
  12. फाल्गुन

भारतीय कालगणनेत जे १२ महिने आहेत ते एकूण सहा ऋतूंमध्ये विभागले गेले आहेत व ते ऋतू पुढीलप्रमाणे

  1. वसंत ऋतू (चैत्र व वैशाख)
  2. ग्रीष्म ऋतु (ज्येष्ठ व आषाढ)
  3. वर्षा ऋतू (श्रावण व भाद्रपद)
  4. शरद ऋतू (अश्विन व कार्तिक)
  5. हेमंत ऋतु (मार्गशीर्ष व पौष)
  6. शिशिर ऋतु (माघ व फाल्गुन)

भारतीय कालगणनेत एकूण सहा ऋतु असले तरी सध्या आपण ढोबळमानाने एकूण तीन ऋतूच मानतो व ते तीन ऋतू पुढीलप्रमाणे 

  1. उन्हाळा - फाल्गुन महिन्यापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत 
  2. पावसाळा - आषाढ महिन्यापासून अश्विन महिन्यापर्यंत
  3. हिवाळा - कार्तिक महिन्यापासून माघ महिन्यापर्यंत

तर ही आहे आपल्या भारताची कालगणना पद्धती. आधुनिक युगात या पद्धतीचा वापर व्यावहारिक जगात फार कमी केला जात असला तरी आपल्या पूर्वजांनी अतिशय अभ्यास करून ही कालगणना पद्धती निर्माण केली आहे व ती अत्यंत श्रेष्ठ अशीच आहे.