कवडी - एक नामशेष झालेले चलन

कवडीस संस्कृत भाषेत कपर्दिका असे नाव असून इंग्रजी भाषेत तीस Cowry या नावाने ओळखले जाते. कवडी ही समुद्रातुनच प्राप्त होते कारण कवडी हे शिंपल्यांसारखेच समुद्रात आढळणारे सायप्रिईडी कुळातील सायप्रिया वंशाच्या गोगलगायीचे शंख अथवा कवच आहे.

कवडी - एक नामशेष झालेले चलन
कवडीचे विविध प्रकार

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

आपल्याकडे पूर्वापार काही म्हणी किंवा उपमा प्रचलित आहेत ज्यामध्ये कवडी कवडी साठवणे, कवडी कवडी माया जोडी, मिळवी कवडी कवडी एकदम रुपया दवडी इत्यादी म्हणी व माझ्या जवळ फुटकी कवडीही नाही, कवडीमोल, कवडी चुंबक, कवडीच्या भावात इत्यादी उपमा आजही वापरण्यात येतात.

आधुनिक युगात सहसा या म्हणी वा उपमा खूप बचत करून पैसे साठवले की अथवा एखादी वस्तू अत्यंत कमी किमतीत विकली गेली की वापरल्या जातात मात्र यामध्ये ज्या कवडी या शब्दाचा प्रयोग केला जातो त्याबद्दल आजच्या युगात अनेकांना फारशी माहिती नसते मात्र कवडी हे त्याकाळी एक चलन म्हणून प्रसिद्ध होते व भारतात अनेक ठिकाणी कवडीचा वापर नाण्यांना पर्याय म्हणून केला जात असे.

कवडीस संस्कृत भाषेत कपर्दिका असे नाव असून इंग्रजी भाषेत तीस Cowry या नावाने ओळखले जाते. कवडी ही समुद्रातुनच प्राप्त होते कारण कवडी हे शिंपल्यांसारखेच समुद्रात आढळणारे सायप्रिईडी कुळातील सायप्रिया वंशाच्या गोगलगायीचे शंख अथवा कवच आहे. कवडी गोगलगायीच्या १६५ हुन अधिक जाती असून त्यांच्यापासून विविध आकाराच्या व रंगांच्या कवड्या प्राप्त होतात.

कवडी ही चलनात वापरात होतीच मात्र धार्मिक दृष्ट्याही तिला महत्व होते कारण तुळजा भवानी देवीस कवड्या अत्यंत प्रिय असल्याने तुळजा भवानीचे भक्त कवड्यांची माळ परिधान करीत याशिवाय कवड्यांच्या वापर सारीपाट व त्याच प्रकारचे इतर खेळ खेळताना डाव टाकण्यासाठी केला जात असे.

महाराष्ट्रात पूर्वी कवड्यांचे तीन प्रकार प्रसिद्ध होते यामध्ये साधारण कवडीस भवानी कवडी असे नाव होते, आकाराने थोडी मोठी, भरीव आणि चकचकीत कवडीस सगुणी कवडी असे नाव होते व रंगाने सफेद आणि खडबडीत असल्यास त्या कवडीस दही कवडी म्हणत. आकाराने लहान कवडी ही कवडी म्हणूनच ओळखली जात असली तरी मोठ्या कवडीस टग्या असे नाव होते. आजही विद्यार्थ्यांमध्ये जो शरीराने मोठा व द्वाड असतो त्यास टग्या म्हटले जाते ते यावरूनच. मोठ्या कवडीस कवडा असेही म्हटले जात असे.

कवडीचा आकार अथवा रंगावरून काही प्राण्यांना, झाडांना अथवा पदार्थाना सुद्धा काही विशिष्ट नावे प्राप्त झाली यामध्ये कवडीचे झाड, कवड्या जातीचा गहू, कवड्या उद, कवड्या साप, कवड्या घोणस अशी काही नावे प्रसिद्ध आहेत. पूर्वी विटीदांडूचा खेळ जेव्हा खेळला जात असे त्यावेळी मुले पळत असताना 'कवडी कवडी' असा उच्चार करीत.

आता कवडीचे चलन पद्धतीतील महत्व पाहू. त्याकाळी कवडी, गंडा, टोली, दमडी, अधेला, पैसा, आणा, चवली, पावली आणि रुपया इत्यादी चलने प्रचलित होती. चार कवड्या म्हणजे एक गंडा असे परिमाण असे व एका दिडकीस बारा किंवा सोळा गंडे मिळत. हे परिमाण तपासल्यास एक कवडी म्हणजे एका दिडकीचा ऐंशीवा भाग होते त्यामुळे कवडी हे त्याकाळी गरिबांचे चलन मानले जाई आणि गरीब लोक एक एक कवडी जोडून त्यातून एक दोन पैसे मिळवून आपला चरितार्थ चालवीत असत. कवडी देऊन मिळणारी वस्तू ही त्याकाळी सर्वात स्वस्त वस्तू असे व यावरूनच कवडी मोल हा शब्द प्रचलित झाला.

यावरून सध्या भारतात एक रुपयाचे स्थान आहे तेच पूर्वी कवडीचे होते हे आपल्या लक्षात येईल कारण सध्या एक रुपयांहून कमी किमतीचे नाणे बाजारात उपलब्धच नाही अथवा एखादे जुने पंचवीस-पन्नास पैशांचे नाणे कुणाला दिले तरी ते कुणीच घेतही नाही. आधुनिक युगात कवडीचे चलनातील महत्व नामशेष झाले असले तरी तिचे धार्मिक महत्व आजही अबाधित आहे.