मूत्रखताची माहिती व फायदे

मूत्रखत हे सुद्धा शेणखताप्रमाणे गाय, म्हैस, बैल व रेडा आदींच्या मूत्रापासून तयार केले जाते.

मूत्रखताची माहिती व फायदे
मूत्रखताची माहिती व फायदे

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ज्या खतांची निर्मिती करण्यात येते त्यांना सर्वसाधारण अथवा पारंपरिक खते या नावाने ओळखले जाते. या खतांमध्ये सोनखत, गांडूळखत, शेणखत व मूत्रखत इत्यादी खतांचा समावेश होतो. 

या लेखात आपण मूत्रखत या अतिशय उपयुक्त अशा खताची माहिती व ते तयार करण्याची प्रक्रिया काय असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

मूत्रखत हे सुद्धा शेणखताप्रमाणे गाय, म्हैस, बैल व रेडा आदींच्या मूत्रापासून तयार केले जाते. मूत्रखताचा वापर प्रामुख्याने कोबी, बीट आदी उत्पादनांसाठी उत्तम असतो मात्र ज्या पिकांवर मूत्रखताचा वापर केला जातो अशा पिंकाना भरपूर पाणी देणे सुद्धा आवश्यक असते.

मूत्रखताचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे ज्या पिकास मूत्रखत दिले जाते अशा पिकांना एखादा रोग अथवा कीड बिलकुल होत नाही त्यामुळे मूत्रखत हे अतिशय उत्तम असे खत मानले जाते.

मूत्रखत तयार करण्याची प्रक्रिया सोपी असून गुरांचे मूत्र ज्या ठिकाणी पडते अशा ठिकाणी बारीक माती ठेवावी आणि त्यावर मूत्र पडल्यावर ती भिजली की त्याचे मिश्रण बनवून जे तयार होते तेच मूत्रखत. मूत्र एका ठिकाणी जमा करून त्यात तेवढीच माती कालवून सुद्धा मूत्रखत तयार करता येते.

मूत्रखत वापरताना लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे झाडांवर फक्त मूत्रखताचाच वापर न करता त्यामध्ये थोडे पाणी घालून ते झाडास घालणे आवश्यक असते व तेव्हाच त्याचा खताप्रमाणे फायदा होतो. असे हे मूत्रखत खऱ्याअर्थी कृषीच्या अत्यंत कामास येणारे खत आहे.