नेपच्यून - सूर्यमालेतील अखेरचा ग्रह

नेपच्यून ग्रहाची जी अनेक वैशिट्ये आहेत त्यापैकी एक म्हणजे त्यावरील ग्रेट डार्क स्पॉट.

नेपच्यून - सूर्यमालेतील अखेरचा ग्रह
नेपच्यून

आपल्या सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह म्हणून प्रसिद्ध असलेला नेपच्यून सर्व ग्रहांमधील एक रहस्यमयी असा ग्रह आहे. नेपच्यून नामक रोमन समुद्र देवतेच्या नावावरून या ग्रहाचे नामकरण करण्यात आले आहे व भारतात यास वरुण या नावाने ओळखले जाते. खऱ्या अर्थी नेपच्यून हा वायुग्रह असल्याने यास वरुण हे नाव शोभते.

नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा ग्रह असून त्याच्या आकर्षक निळ्या रंगाने आणि इतर गूढ वैशिट्यांमुळे हा ग्रह अनेक दशकांपासून खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाशप्रेमींना मोहित करत आला आहे.

नेपच्यून ग्रहाच्या शोधामागील कथा सुद्धा मनोरंजक आहे. युरेनस या ग्रहाचा जेव्हा शोध लागला त्यानंतर त्या ग्रहाबद्दल काही सिद्धांत ठरवताना खगोलशास्त्रज्ञांना असे जाणवले की युरेनस च्या पलीकडे सुद्धा एखादा ग्रह असला पाहिजे. मात्र १८४६ सालापर्यंत या शोधात कुठलेच यश लाभले नाही पण याच वर्षी प्रोफेसर अॅडम्स आणि लिव्हरीअर नामक एका फ्रेंच ज्योतिषाने या ग्रहाचा शोध लावला.

नेपच्यून हा ग्रह पृथ्वीच्या वस्तुमानाच्या अंदाजे सतरा पटीने मोठा असून पृथ्वीच्या आकारमानाच्या चार पट मोठा आहे. या ग्रहावर हायड्रोजन आणि हेलियमचे प्रमाण जास्त असून ग्रहावरील मिथेन वायूमुळे त्यास निळा रंग प्राप्त झाला आहे. नेपच्यून या ग्रहावरील मिथेन तेथील वातावरणात प्रचंड प्रमाणात ढगांची निर्मिती करते आणि त्यामुळे मोठी वादळे आणि शक्तिशाली वारे या ग्रहाच्या वातावरणात कायमच सुरु असतात.

नेपच्यून ग्रहाची जी अनेक वैशिट्ये आहेत त्यापैकी एक म्हणजे त्यावरील ग्रेट डार्क स्पॉट. गुरु या ग्रहाच्या ग्रेट रेड स्पॉट प्रमाणे नेपच्यून वरील ग्रेट डार्क स्पॉट हे ग्रहाच्या वातावरणात फिरणारा एक प्रचंड मोठा भोवरा आहे. या ग्रेट डार्क स्पॉट वर अनेक वर्षे संशोधन सुरु असताना हे लक्षात आले आहे की याच्या आकारात आणि तीव्रतेत अनेकदा बदल झाला आहे मात्र या ग्रेट डार्क स्पॉट ची निर्मिती आणि हा भोवरा नक्की कुठल्या कारणामुळे फिरत आहे हा कायमच वैज्ञानिकांच्या औत्सुकतेचा विषय राहिला आहे.

पृथ्वीस फक्त एक चंद्र आहे मात्र नेपच्यून ग्रहास तब्बल चौदा ज्ञात चंद्र असून त्यामध्ये टायटन हा उपग्रह सर्वात मोठा आहे. टायटनचे एक वेगळे वैशिट्य म्हणजे हा उपग्रह नेपच्यून ग्रहाच्या प्रदक्षिणा मार्गाने न जात विरुद्ध मार्गाने फिरतो. खगोल शास्त्रज्ञांच्या मतानुसार टायटन हा नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणाने पकडला गेल्यामुळे त्याच्यात ही अद्वितीय कक्षीय वैशिट्ये आली असावीत.

गेल्या काही वर्षांत नेपच्यूनचा शोध घेत असताना अनेक रहस्ये समोर आली आहेत. व्हॉयेजर २ सारख्या अंतरिक्ष यानाने या ग्रहाची रचना, वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राबद्दल मोलाची माहिती मानवजातीस दिली आहे तरीही नेपच्यून व पृथ्वीमधील एक प्रचंड अंतर संशोधकांसाठी कायमच एक आव्हान बनले आहे.

नेपच्यूनची अनेक रहस्ये आजही शास्त्रज्ञ आणि संशोधकांना आपल्याकडे खुणावत आहेत. सूर्यमालेतील या सर्वात दूरच्या वायू ग्रहाच्या अभ्यास करता आल्यास सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीची रहस्ये आणखी उलगडतील आणि जसजसे विज्ञान अधिक प्रगत होत जाईल मानव सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधाच्या दिशेने आणखी प्रगती करेल यात शंका नाही.