अडुळसा वनस्पतीचे औषधी उपयोग

अतिशय उपयुक्त व औषधी वनस्पती म्हणून अडुळसा प्राचीन काळापासून प्रख्यात आहे. संस्कृत साधनांत अडुळसा वनस्पतीचा उल्लेख अटरुष या नावाने येतो.

अडुळसा वनस्पतीचे औषधी उपयोग

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

अतिशय उपयुक्त व औषधी वनस्पती म्हणून अडुळसा प्राचीन काळापासून प्रख्यात आहे. संस्कृत साधनांत अडुळसा वनस्पतीचा उल्लेख अटरुष या नावाने येतो. हिंदी भाषिक तिला अरुसा अथवा अडसा या नावाने ओळखतात.

ही वनस्पती अनेक ठिकाणी आढळते. अडुळसा वनस्पतीच्या दोन प्रमुख जाती आहेत ज्यांना काळा अडुळसा व पांढरा अडुळसा अशी नावे आहेत.

यातील पांढऱ्या आडुळशाचा रंग पांढराच असला तरी काळ्या अडुळशाचा रंग हिरवट असतो व पाने मऊ असतात. काळा अडुळसा पांढऱ्या अडुळशापेक्षा अधिक उष्ण व कफकारक असतो. पांढऱ्या अडुळशाच्या पानांचा रंग हिरवा असून त्यावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात. यांची फुले पांढऱ्या रंगाची असतात.

अडुळशाचे झाड हे जास्तीत जास्त १२ फूट उंच वाढू शकते. झाडाचे लाकूड मऊ असते. अडुळसा थंड, तिखट व कडू आहे. खोकला, कावीळ, ज्वर, कफ, क्षयरोग, कुष्ठरोग इत्यादींवर गुणकारी औषध म्हणून अडुळशा वापरले जाते.

दमा व खोकल्याचा जुना विकार असेल तर अडुळशाच्या पानांचा व फुलांचा रस तयार करून तो मधासोबत घेतल्यास कफक्षय दूर होतो. काविळीवरही हा उपाय गुणकारी ठरतो मात्र मधासोबत साखरही घेणे योग्य. 

श्वसनरोगवार अडुळशा रस आणि लोणी एकत्र कालवून त्रिफळाचूर्ण त्यात घालून दयावे. खरूज झाली असल्यास अडुळशाची पाने व आंबेहळद गोमूत्रात मिश्रित करून खरुजेच्या ठिकाणी लेप लावावा. 

अडुळशा वनस्पतीचे शास्त्रीय नाव आधा टोडा वासिका असे असून पित्तजनित प्रदर, श्वेत प्रदर, मुलांचे कफ विकार, कास श्वास, विंचूचे विष, देवीचा आजार, त्रिदोष, मुखरोग, मूत्राघात अशा अनेक विकारांवर अडुळसा वनस्पती रामबाण इलाज म्हणून वापरली जाते.