भाऊ काटदरे - निसर्ग संवर्धन क्षेत्रातील आदर्श
श्री भाऊ काटदरे, सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था १९९२ साली स्थापन झाली असून गेली २९ वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचे काम करत आहेत.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
श्री भाऊ काटदरे, सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था १९९२ साली स्थापन झाली असून गेली २९ वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचे काम करत आहेत. स्थानिक लोकांना संवर्धनात सहभागी करून घेऊन प्रकल्प चिरकाल टिकेल असा त्यांचा प्रयत्न आहे.
२००२ साली त्यांनी लोकसहभागातून सागरी कासवांचे संरक्षणाचे काम चालू केले असून ते यशस्वी झाले आहे. भारतीय पाकोळी, पांढऱ्या पोटाचा सागरी गरुड, गिधाडे, खवले मांजर यांचे संरक्षण संवर्धन इत्यादी अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. काटदरे हे IUCN खवले मांजर तज्ञ कमिटी तथा महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ यांचे सदस्य आहेत.
भाऊ काटदरे यांनी इयत्ता सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात खवले मांजरावर आणि इयत्ता नववीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सागरी कासवांवर धडा लिहिला आहे. इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात बदलता भारत मध्ये भाऊ काटदरे व सह्याद्री निसर्ग मित्र यांची माहिती समाविष्ट केली आहे.
भाऊ काटदरे यांच्याविषयी पोलादी माणसे- पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान, निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन, खरेखुरे आयडॉल्स - युनिक फीचर्स, व्रतस्थ- चतुरंग प्रतिष्ठान प्रकाशन इत्यादी पुस्तकांमध्ये छापून आले आहे. कार्लझीस वन्यजीव पुरस्कार, RBS स्यांचुरी एशिया पुरस्कार, झी चौवीस तास अनन्या सन्मान, वसुंधरा मित्र पुरस्कार, इतरही राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
श्री भाऊ काटदरे यांनी स्थानिकांच्या व वनविभागाच्या सहभागातून कोकणाच्या संपूर्ण किनारपट्टीवर सागरी कासवाच्या संरक्षणाचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. २००२ ते २०१४ महाराष्ट्रात ८० ठिकाणी प्रकल्प चालू केला. पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी कासव महोत्सव व होमस्टे संकल्पना यशस्वीपणे राबवली. त्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण दिले.
२०१४ मध्ये प्रकल्प यशस्वी झाल्यावर वनविभाग व स्थानिकाकडे सुपूर्त केला. पांढऱ्या पाठीच्या गिधाडांच्या संवर्धनाचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला तसेच वेंगुर्ला रॉक्सवरील भारतीय पाकोळीच्या संवर्धन संरक्षणाचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला.सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्यातील समुद्री गरुडांच्या सर्वेक्षणाचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खवले मांजराच्या संरक्षण संवर्धनाचा प्रकल्प राबवला.
- पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य