हवेतील विविध घटक
पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनास अत्यंत महत्वाचा असणारा घटक म्हणजे हवा. मनुष्य पाण्याशिवाय काही काळ जिवंत राहू शकेल मात्र हवेशिवाय काही क्षणही नाही. अशा या डोळ्यास न दिसणाऱ्या मात्र जीवनासाठी सर्वात महत्वपूर्ण असलेल्या हवेतील विविध घटक काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनास अत्यंत महत्वाचा असणारा घटक म्हणजे हवा. मनुष्य पाण्याशिवाय काही काळ जिवंत राहू शकेल मात्र हवेशिवाय काही क्षणही नाही. अशा या डोळ्यास न दिसणाऱ्या मात्र जीवनासाठी सर्वात महत्वपूर्ण असलेल्या हवेतील विविध घटक काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
नायट्रोजन - नायट्रोजन हा वायू रंग व वास रहित असतो व हवेतील एका भागात चार पंचमांश भाग हा नायट्रोजन या वायूचा असतो. हवेतील प्रमुख तत्व नायट्रोजन असून हा वातावरणातच नव्हे तर शरीरातही व्यापलेला असतो. नायट्रोजन हा वायू नसेल तर पृथीवरील वातावरण टिकू शकणार नाही. वातावरणास पोषक असूनही निर्गुणी असल्याने फक्त याच वायूच्या उपयोगाने एखादा जीव जगू शकणार नाही हे सुद्धा तितकेच खरे. फक्त नायट्रोजन वायू असेल तर या वायूच्या सानिध्यात पदार्थ जळू शकत नाही. नायट्रोजन चा प्रमुख उपयोग म्हणजे या वायूमुळेच स्निग्ध पदार्थ तयार होतात आणि हवेतील पातळपणा संतुलित राहण्यास नायट्रोजनाचा उपयोग होतो.
ऑक्सिजन - या वायूस आपण प्राणवायू म्हणून सुद्धा ओळखतो. हवेतील एका भागात ऑक्सिजनचे प्रमाण एक पंचमांश असते. ऑक्सिजन वायूस सुद्धा वास अथवा रंग नसतो मात्र पृथ्वीवरील सजीवांची जी हालचाल सुरु आहे ती ऑक्सिजन वायूमुळेच सुरु आहे. एखादा पदार्थ जाळण्यासाठी हवेतील ऑक्सिजनचा मुख्य उपयोग होतो. सजीवसृष्टीचे श्वास सुरु राहण्यासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे यासाठी हवेत एक पंचमांश अस्तित्व असूनही ऑक्सिजन वायुसारखा महत्वाचा घटक दुसरा नाही.
कार्बन डाय ऑक्साईड - हा वायू हवेत अत्यंत कमी प्रमाणात असून हवेचे दहा हजार भाग केले असता ३-४ भागांतच हा वायू सापडतो. या वायुलाही रंग नसून हा स्वच्छ असतो. पृथ्वीवरील सजीवांच्या उच्छवासातून, जळालेल्या पदार्थातून, कुबट जागेतून अथवा पदार्थातून हा वायू तयार होत असतो. फक्त कार्बन डाय ऑक्साईड या वायूत जीव जगणे अशक्य असून फक्त हा वायू असेल तर एखादा पदार्थ जळणे सुद्धा अशक्य असते. एखादी मेणबत्ती पेटवली व त्यानंतर तिच्यावर ग्लास ठेवला तर ग्लासातील मेणबत्तीला ऑक्सिजन न मिळता ती जळत असल्याने कार्बनडाय ऑक्साईड तयार होतो व मेणबत्ती लगेच विझते हे उदाहरण आपण पाहिलेच असेल.
बाष्प (वाफ) - वाफ जमीन व पाणी तसेच प्राण्याच्या श्वसनातून वातावरणात जाते. वातावरणातील थंडपणा व उष्णपणा हा हवेतील वाफेवर अवलंबून असतो. हवेतील वाफ जरी बऱ्याचदा अदृश्य स्थितीत असली तरी बऱ्याचदा ही धुक्याच्या रूपात डोळ्यांना दिसू शकते. हवेतील उष्णतेच्या प्रमाणानुसार त्यातील वाफेचे प्रमाण सुद्धा कमी अथवा जास्त होत असते. हवेत उष्णता जेवढी जास्त तेवढी वाफ तयार होऊन जास्त प्रमाणात बाष्पीभवन होऊन ती वातावरणात मिळते. हवेत बाष्प जास्त असल्यास वातावरण दमट असते आणि कमी असल्यास वातावरण कोरडे असते. हवेत वाफ नसेल तर हवा पूर्ण कोरडी होऊन सजीव सृष्टी जगणे अत्यंत कठीण होऊ शकते.
ओझोन - पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूच्या थराबद्दल आपण अनेकदा वाचतो अथवा ऐकतो. वातावरणातील विद्युत प्रवाहामुळे ऑक्सिजन वायूचा जो भाग दाट होतो त्यालाच ओझोन असे म्हणतात. ओझोन वायूचे अस्तित्व हे सहसा समुद्र अथवा पर्वतांतील प्रदेशात असतो कारण येथे जास्त लोकवस्ती नसल्याने इतर वायू वातावरणात शिरून ओझोन च्या थराची निर्मिती होणे कठीण असते.
तर हे झाले हवेतील अतिशय महत्वाचे घटक. या घटकांव्यतिरिक्तही हवेत नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायॉक्साइड हे वायू तसेच अरगॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू असतात.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |