जैन धर्मातील २४ तीर्थंकर
जैन धर्मात एकूण चोवीस तीर्थंकर असून त्यांचे अर्चन करणे आणि अहिंसा धर्माने वागून आत्मास निर्वाणप्राप्ती करून देणे ही जैन धर्माची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. जैन धर्मांत प्रामुख्याने श्वेतांबर व दिगंबर हे दोन पंथ असून श्वेतांबर पंथाच्या मूर्ती वस्त्राच्छादित असून त्यांच्या नेत्रांत हिरे माणके बसवलेली असतात आणि दिगंबर पंथाच्या मूर्ती वस्त्रहीन असून त्यांच्या डोळ्यात रत्ने जडवलेली नसतात.
भारतातील एक प्राचीन धर्म म्हणून जैन धर्म ओळखला जातो. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या पंचमहाव्रतांचे पालन करणारा धर्म म्हणजे जैन धर्म. जैन शब्दाची उत्पत्ती ही जिन या शब्दापासून झाली आहे. अहिंसा परमो धर्म हे जैन धर्माचे मुख्य तत्व असून जीव हा आद्यन्त विरहित असून सूक्ष्म व चैतन्यमय आहे व तो अणोरणियान महतो महियान याप्रमाणे आहे. जीवाला सुख दुःखातीत स्थिती प्राप्त झाली म्हणजे तो मोक्षपदास जातो.
जैन धर्मात एकूण चोवीस तीर्थंकर असून त्यांचे अर्चन करणे आणि अहिंसा धर्माने वागून आत्मास निर्वाणप्राप्ती करून देणे ही जैन धर्माची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. जैन धर्मांत प्रामुख्याने श्वेतांबर व दिगंबर हे दोन पंथ असून श्वेतांबर पंथाच्या मूर्ती वस्त्राच्छादित असून त्यांच्या नेत्रांत हिरे माणके बसवलेली असतात आणि दिगंबर पंथाच्या मूर्ती वस्त्रहीन असून त्यांच्या डोळ्यात रत्ने जडवलेली नसतात.
जैन धर्मातील २४ तीर्थंकर कोण आहेत हे या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जैन धर्मातील प्रत्येक तीर्थांकाराचे एक पृथक असे चिन्ह आहे जे त्यांच्या मूर्तीच्या सिंहासनाखाली पाहावयास मिळते ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
- जैन धर्माचे पहिले तीर्थंकर हे आदिनाथ असून त्यांना ऋषभदेव या नावाने सुद्धा ओळखले जाते. आदिनाथांचे चिन्ह नंदी आहे.
- जैन धर्माचे दुसरे तीर्थंकर हे अजितनाथ असून त्यांचे चिन्ह हत्ती आहे.
- जैन धर्माचे तिसरे तीर्थंकर हे संभवनाथ असून त्यांचे चिन्ह घोडा आहे.
- जैन धर्माचे चौथे तीर्थंकर अभिनंदनाथ हे असून त्यांचे चिन्ह माकड आहे.
- जैन धर्माचे पाचवे तीर्थंकर सुमतिनाथ असून त्यांचे चिन्ह चक्रवाक आहे.
- जैन धर्माचे सहावे तीर्थंकर सुपद्मनाथ असून त्यांचे चिन्ह कमळ आहे.
- जैन धर्माचे सातवे तीर्थंकर सुपार्श्वनाथ असून त्यांचे चिन्ह स्वस्तिक आहे.
- जैन धर्माचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभ हे असून त्यांचे चिन्ह चंद्राची कोर आहे.
- जैन धर्माचे नववे तीर्थंकर हे पुष्पदंत असून त्यांचे चिन्ह नक्र आहे.
- जैन धर्माचे दहावे तीर्थंकर शीतलनाथ असून त्यांचे चिन्ह कल्पवृक्ष आहे.
- जैन धर्माचे अकरावे तीर्थंकर श्रेयान हे असून त्यांचे चिन्ह गेंडा आहे.
- जैन धर्माचे बारावे तीर्थंकर वासुपूज्य हे असून त्यांचे चिन्ह महिष आहे.
- जैन धर्माचे तेरावे तीर्थंकर विमलनाथ हे असून त्यांचे चिन्ह वराह आहे.
- जैन धर्माचे चौदावे तीर्थंकर अनंतनाथ हे असून त्यांचे चिन्ह शाळ आहे.
- जैन धर्माचे पंधरावे तीर्थंकर धर्मनाथ हे असून त्यांचे चिन्ह वज्र आहे.
- जैन धर्माचे सोळावे तीर्थंकर शांतीनाथ हे असून त्यांचे चिन्ह हरीण आहे.
- जैन धर्माचे सतरावे तीर्थंकर कुंथूनाथ हे असून त्यांचे चिन्ह बकरे आहे.
- जैन धर्माचे अठरावे तीर्थंकर अरनाथ हे असून त्यांचे चिन्ह मासा आहे.
- जैन धर्माचे एकोणिसावे तीर्थंकर मल्लिनाथ हे असून त्यांचे चिन्ह कुंभ आहे.
- जैन धर्माचे विसावे तीर्थंकर मुनिसुवृत्त हे असून त्यांचे चिन्ह कासवं आहे.
- जैन धर्माचे एकविसावे तीर्थंकर नमिनाथ हे असून त्यांचे चिन्ह कमळ आहे.
- जैन धर्माचे बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ हे असून त्यांचे चिन्ह शंख आहे.
- जैन धर्माचे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ हे असून त्यांचे चिन्ह सर्प आहे.
- जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर महावीर अथवा वर्धमान हे असून त्यांचे चिन्ह सिंह आहे.