अमृतपुरा येथील अमृतेश्वर मंदिर

कर्नाटकात चिकमंगळूर जिल्ह्यामध्ये एक सुंदर शिवालय वसले आहे. अमृतपुरा हे त्याचे नाव. इ.स. ११९६ मध्ये होयसळ राजा वीरबल्लाळ दुसरा याचा सेनापती असलेल्या ‘अमृतेश्वर दंडनायक’ याने हे मंदिर बांधले. होयसळ शैलीमध्ये असलेले हे मंदिर नितांत सुंदर आहे. लेथवर घडवल्यासारखे गुळगुळीत खांब या मंदिराच्या सभामंडपाची शोभा वाढवतात.

अमृतपुरा येथील अमृतेश्वर मंदिर

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

तसेच या मंदिरावर विविध मूर्तींची रेलचेल पाहायला मिळते. गणेश, कार्तिकेय, नृत्यशिव यांच्या अतिशय सुंदर मूर्ती इथे आहेत. सभागृहाच्या छतावर कोरलेली नृत्यशिवाची मूर्ती तर निव्वळ देखणी आहे.याचबरोबर सप्तमातृकांचा एक सुरेख शिल्पपट इथे पाहता येतो. शिवाय रामायण, महाभारतातले विविध प्रसंग या मंदिरावर कोरलेले आहेत.

विशेष करून श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या आयुष्यातील विविध प्रसंग २५ शिल्पपटातून या मंदिरावर शिल्पांकित केलेले आहेत. ज्यात कृष्णजन्म, कृष्णाने विविध राक्षसांचे केलेले निर्दालन अशी विविध शिल्पं या मंदिरावर बघायला मिळतात.

‘रुवारी मल्लीतम्म’ नावाच्या शिल्पकाराने इथले बरेचसे शिल्पकाम केल्याचे सांगितले जाते. शिमोग्यापासून जेमतेम ५० कि. मी. अंतरावर असलेले हे देखणे देवालय निव्वळ प्रेक्षणीय आहे. मंदिरांनी बहरलेल्या कर्नाटकाचे हे मंदिर म्हणजे नक्कीच एक भूषण म्हणावे लागेल.

- आशुतोष बापट