एस्बेस्टोस - एक उष्णता प्रतिरोधक धातू

एस्बेस्टोस हे सामान्यत: बांधकाम उद्योगाशी संबंधित असले तरी, ते लोह आणि पोलाद यासह काही धातूंच्या उत्पादनात देखील वापरले गेले आहे.

एस्बेस्टोस - एक उष्णता प्रतिरोधक धातू
एस्बेस्टोस

जगभरात जे विविध प्रकारचे धातू आहेत त्यामध्ये काही धातू आपल्या वेगळ्या वैशिट्यांसाठी प्रसिद्ध आहेत व या वैशिट्यपूर्ण धांतूंपैकी एक म्हणजे एस्बेस्टस नामक धातू.

एस्बेस्टोस हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे खनिज आहे जे त्याच्या उष्णता-प्रतिरोधक आणि इन्सुलेट गुणधर्मांमुळे विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. 

एस्बेस्टोस हे सामान्यत: बांधकाम उद्योगाशी संबंधित असले तरी, ते लोह आणि पोलाद यासह काही धातूंच्या उत्पादनात देखील वापरले गेले आहे.

एस्बेस्टस हा धातू तंतुमय धातू असून मऊ लाकडाचे तंतू जसे सहजपणे वेगळे करता येतात त्याचप्रमाणे एस्बेस्टस या धातूचे तंतू सुद्धा सहजपणे वेगळे करता येतात.

एस्बेस्टस हा धातू उत्तर अमेरिकेतील अतिशय जुन्या अशा जमिनीखालील खडकांमध्ये आढळतो व त्याच्या लवकर न झिजण्याच्या गुणधर्मामुळें तो मुबलक प्रमाणात आढळतो आणि त्याचा पुरवठा सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो.

एस्बेस्टस या धातूचे मुख्य वैशिट्य हे आहे की या धातूवर अग्नीचा प्रभाव पडत नाही अथवा आगीने हा धातू जळू शकत नाही त्यामुळे आगीपासून रक्षण करण्यासाठी जे कपडे तयार होतात त्यासाठी या धातूचा वापर पूर्वी केला जात असे.

एस्बेस्टस हा धातू आगीत जळत नाहीच मात्र तो आगीत साधा तापत सुद्धा नसल्याने ज्या लोकांचा कामानिमित्त विस्तवाशी अथवा आगीशी संबंध येतो असे लोक या धातूपासून तयार केलेले मोजे वापरत जेणेकरून त्यांना काम करताना आगीमुळे इजा होत नसे.

मोज्यांशिवाय एस्बेस्टस धातूचे मुखवटे सुद्धा तयार केले जात असत जेणेकरून आगीसमोर बसून काम करणाऱ्या कामगारांच्या चेहऱ्याचे आगीपासून रक्षण होत असे.

पूर्वी जेव्हा कपड्यांना इस्त्री करणाऱ्या यंत्राचा शोध नुकताच लागला होता त्यावेळी हातास चटका बसू नये या साठी या धातूच्या फडक्याने इस्त्री धरली जात असे.

अर्थात एस्बेस्टोस तंतूंच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसाचा कर्करोग आणि मेसोथेलियोमासह गंभीर श्वसनाचे आजार होऊ शकतात. परिणामी, औद्योगिक आणि बांधकाम सेटिंग्जमध्ये एस्बेस्टोसचा वापर मर्यादित करण्यासाठी आधुनिक काळात कठोर नियम लागू केले गेले आहेत.