चविष्ट व औषधी आंब्याचे लोणचे

भारतीयांनी विकसित केलेली लोणचे तयार करण्याच्या कृती हळूहळू जगातील अनेक देशांमध्ये प्रचलित झाली व पाहता पाहता लोणचे हा प्रकार जगभरातील खवैय्यांचा आवडता खाद्यप्रकार बनला.

चविष्ट व औषधी आंब्याचे लोणचे
आंब्याचे लोणचे

भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाची लज्जत वाढवण्यासाठी जे पदार्थ पूर्वापार वापरले जातात त्यामधील एक पदार्थ म्हणजे लोणचे. लोणच्यांमध्ये सुद्धा आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे, मिरचीचे लोणचे, आल्याचे लोणचे असे नानाविध प्रकार आढळून येतात. या लेखात आपण लोणच्यांमधील लोकप्रिय प्रकार असलेल्या आंब्याच्या लोणच्याविषयी जाणून घेऊ.

आंब्याचे लोणचे हा लोणच्याचा असा प्रकार आहे ज्याचे सेवन जागतिक स्तरावर केले जाते. आंब्याचे लोणचे बनवण्यासाठी प्रामुख्याने कच्च्या अर्थात हिरव्या आंब्याचा वापर केला जात असल्याने त्यास कैरीचे लोणचे असेही म्हणतात.

आंब्याचे लोणचे हे आंब्याच्या कैरीच्या कापांना मीठ, तेल आणि मसाल्याच्या मिश्रणात जतन करून बनवण्यात येते. आंब्याचे लोणचे हे त्याच्या तिखट, आंबट आणि मसालेदार चवीसाठीही ओळखले जाते. आपल्या तिखट, आंबट आणि मसालेदार चवीमुळे आंब्याचे लोणचे हे भोजनात एक विशेष घटक म्हणून विशेष लोकप्रिय झाले आहे.

आंब्याचे लोणचे हे प्राचीन काळापासून भोजनात सेवन केले जात असे व तसे उल्लेख जुन्या साधनांत आढळतात. आंब्याच्या लोणच्यात बरेच औषधी गुणधर्मही असल्याचे सिद्ध झाले आहे.

आंब्याच्या लोणच्याचा शोध हा प्रामुख्याने भारतात लागला. न पिकलेले आंबे कापून त्यात मीठ, तेल आणि मसाले मिसळून त्याचे एक मिश्रण बनवून ते अनेक दिवस बरणी अथवा भांड्यामधे साठवले की या मिश्रणास एक अनोखी चव प्राप्त होते व हे लोणचे अनेक दिवस टिकते सुद्धा.

भारतीयांनी विकसित केलेली लोणचे तयार करण्याच्या कृती हळूहळू जगातील अनेक देशांमध्ये प्रचलित झाली व पाहता पाहता लोणचे हा प्रकार जगभरातील खवैय्यांचा आवडता खाद्यप्रकार बनला.

आंब्याचे लोणचे तयार करण्याची सामान्य कृती एकसारखी असली तरी त्यामध्ये वापरण्यात येणारे घटक हे प्रदेश आणि त्या त्या प्रदेशातील पाक संस्कृतीनुसार बदलतात त्यामुळे विविध भागातील लोणच्याची चव ही वेगळी लागते.

सर्वसामान्यपणे आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी लागणारे प्रमुख घटक म्हणजे कच्चा आंबा, मीठ, तिखट, मोहरी, मेथी, हळद आणि तेल हे आहेत मात्र आंब्याच्या लोणच्याची चव अधिक वाढवण्यासाठी या लोणच्यांमध्ये लसूण, आले आणि इतर मसाल्यांचा समावेश सुद्धा केला जातो.

आधी सांगितल्याप्रमाणे आंब्याच्या लोणच्यात आरोग्यदायी गुणधर्मही आहेत कारण आंबे हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्रोत आहेत ज्याचा फायदा त्वचा निरोगी राखण्याकरिता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो. 

आंब्याच्या लोणच्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोहरी आणि मेथी आदी पदार्थांमध्ये दाहकता विरोधी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे कर्करोग आणि हृदयविकार आदी गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय आंब्याच्या लोणच्याच्या किण्वन प्रक्रियेदरम्यान उत्पादित होणारे प्रोबायोटिक्स पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

खऱ्या अर्थी आंब्याचे लोणचे हा खाद्याचा फक्त रुचकरच नव्हे तर एक आरोग्यदायी प्रकार आहे आणि याचा आस्वाद तुम्ही दुकानात तयार मिळणारे लोणचे अथवा स्वतः घरी तयार करून सुद्धा घेऊ शकता.