चंदन गंध
चंदनाचे प्रकार व त्याचा गंधाशी असलेला शात्रीय परात्पर संबंध. - डॉ. दिलीप कुलकर्णी
आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
सध्या विठुरायाच्या गजराने पुणे दुमदुमले मूर्ती आहे. या विठूरायाची मूर्ती डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची व वारकऱ्यांची लगबग सुरू आहे. पण तुम्हाला माहित आहे का या विठोबाला चंदनाचा गंध /टिळा लावलेला असतो व त्यामुळे तो आणखीन आकर्षक दिसतो.
आज आपण चंदनाच्या टिळ्याचे वेगवेगळे प्रकार जे सामान्य लोकांना सहसा माहित नसतात त्याची माहिती घेणार आहोत. तसेच वेगवेगळ्या पंथाचे लोक वेगवेगळ्या प्रकारे टिळे कशाप्रकारे व का लावतात ते बघणार आहोत.
चंदन उगाळून याचा लेप शरीराला लावण्याची पद्धत आहे. माणसांना व देवाच्या मूर्तीला चंदनाच्या खोडाचा तुकडा उगाळून बनलेले गंध लावतात.
वैष्णव पंथातील लोक या चंदनाला अत्यंत पवित्र मानतात. स्कंद पुराणानुसार भक्त भगवान श्रीकृष्णाला पूजा करतेवेळी गोपी चंदन अर्पण करतात आणि नंतर भक्त त्यांच्या कपाळावर ते लावतात. हा तिलक लावल्याने केलेल्या दानाचं फळं मिळत. तसचं सर्व पाप दूर होतात अशी धारणा आहे.
आयुर्वेदाप्रमाणाचे हिंदू धर्मात धार्मिक पूजाविधीमध्येही चंदनाला अनन्य साधारण महत्व आहे. पुजा विधीमध्ये चंदनाचा टिळा लावला जातो. तसचं भगवान श्रीहरी विष्णूला चंदन हे अत्यंत प्रिय होतं. यासाठीच चंदनाचा तिलक लावला जातो. तसचं जप करण्यासाठी चंदनाची जप माळ वापरली जाते.
अनेक मंदिरांमध्येही काही खास मूहूर्तांना देवतांची यथासांग पूजा करण्यापूर्वी त्यांना चंदनाचा लेप लावून त्यांना स्नान घातलं जातं. पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चंदनाचे अनेक प्रकार आहेत. यात लाल चंदन, पिवळं चंदन, सफेद चंदन, गोपी चंदन आणि हरि चंदन असे प्रकार आहेत. या प्रत्येत चंदाचे वेगवेगळे फायदे आहेत. याचा संबध तुमच्या श्रद्धेसोबतच तुमच्या मनोकामनेशी देखील आहे.
लाल चंदनाचं महत्व:
• ज्योतिषशास्त्रानुसार शक्तीची साधना म्हणजेच देवीच्या भक्तीसाठी चंदनाच्या लाकडाचा खास उपयोग होतो. लाल चंदनाच्या जपमाळेने दुर्गादेवीच्या मंत्राचा जप केल्यास दुर्गादेवी प्रसन्न होवून तुमची इच्छा पूर्ण करते. तसचं यामुळे मंगळ दोष दूर होण्यासही मदत होते.सुर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी लाल चंदनाचा वापर केल्यास तुमच्या समस्या दूर होवू शकतात. यासाठी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन, लाल फुलं आणि तांदूळ टाकून, प्रसन्न मनाने सूर्यमंत्राचा जप करून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.
• या अर्घ्यदानाने सुर्यदेवता प्रसन्न होवून चांगलं आरोग्य, दिर्घायुष्य, धन-धान्य, संपत्ती, वैभव, किर्ती तसचं पूत्र, मित्र आणि सौभाग्य प्रदान करतात.
गोपी चंदनाचे फायदे:
• गोपी चंदन हे द्वारकेतील गोपी तलावातील मातीपासून तयार करण्यात येते. वैष्णव पंथातील लोक या चंदनाला अत्यंत पवित्र मानतात.
• स्कंद पुराणानुसार भक्त भगवान श्रीकृष्णाला पूजा करतेवेळी गोपी चंदन अर्पण करतात आणि नंतर भक्त त्यांच्या कपाळावर ते लावतात.
• हा तिलक लावल्याने केलेल्या दानाचं फळं मिळत. तसचं सर्व पाप दूर होतात असं म्हटलं जातं.
• आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी देखील ज्योतिष्यशास्त्रात गोपी चंदनाला महत्वाचं स्थान आहे.
हरि चंदनाचे फायदे:
• हिंदू धर्मातील शास्त्रांनुसार भगवान विष्णू आणि त्याच्या इतर अवतारांना हरि चंदनाचा टिळा लावून तो आपल्या कपाळावरही लावावा. यामुळे मन आणि मेंदू दोन्ही शांत होण्यास मदत होते.
• हरि तिलक लावल्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होतं. तसचं समाजात मान सन्मान वाढतो.
• हरि तिलकामुळे विष्णूची कृपादृष्टी सदैव राहते आणि आजार आणि दु:ख दूर होतात.
• हरि तिलक हे तुळशीच्या फांद्या, हळद आणि गंगाजलापासून तयार केलं जातं.
चंदनाचे इतर अध्यात्मिक फायदे
हिंदू धर्मामध्ये चंदनाच्या तिलकाला अध्यात्म आणि भक्तीचं प्रतिक मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार चंदनाचा टिळा लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. चंदनाच्या तिळा लावल्याने शारिरीक आणि अध्यात्मिक लाभ होतात. यामुळे मानसिक ताण कमी होवून परमेश्वराशी एकरूप होण्यास मदत होते.
चंदनाचे काय फायदे आहेत?
मन शांत करण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठी, वृद्धत्वाची चिन्हे आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी चंदनाचा वापर हजारो वर्षांपासून केला जात आहे. याचे अध्यात्मिक महत्त्व आहे आणि असे म्हटले जाते की ते भक्तांना देवाच्या जवळ आणते, आणि सुगंधांमध्ये फिक्सेटिव्ह म्हणून कार्य करते, ते त्वचेवर जास्त काळ टिकेल याची खात्री करते.
“कपाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद”, लहानपणी या आरतीपासून आपल्याला लहानपणीच कपाळी गंध किंवा चंदनाचा टिळा असावा असे संस्कार दिले जातात. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण हा चंदनाचा टिळा मागे सोडला असाल तरीही चंदन भाळी असणं याला शास्त्रात खूप वरच स्थान दिलं गेलं आहे. आपल्या देवतांच्या कपाळीही चंदनाचा टिळा असलेला पाहायला मिळतो. प्रत्येक सण समारंभाला आपल्याकडे कपाळाला चंदन लावण्याची प्रथा आहे. देवळातही पुजारी प्रथम कपाळी टिळा लावतात. मग या चंदनाचा टिळा लावण्याचे काय फायदे आहेत?.
मुळात चंदनाचा स्थायी भाव हा थंड आहे. अशात आपल्या दोन भुवयांच्या मधोमध चंदन लावलं आणि मग आपल्या कार्यात व्यक्त झाल्यास ऑफिसमध्ये मन शांत राहातं आणि चित्त एकाग्र होतं. योग साधनेतही चंदनाच्या टिळ्याला महत्व दिलं आहे. योग साधनेमध्ये मस्तकाच्या समोरून ब्रह्मरंध्राकडे जाणारी सुशुम्रा नाडी शांत आणि बलवान असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. चंदनाचा टिळा लावल्याने वरील मार्ग मोकळा होण्यास मदत होते.
काय आहेत चंदनाचा टिळा लावण्याचे सर्वसामान्य फायदे ?
चंदनाने मन शांत होते. मन शांत झाल्याने व्यक्ती शांततेने आणि संयमाने समस्यांना तोंड देऊ शकते. शांत मन वाईट गोष्टींना थारा देत नाहीत. मानसिक एकाग्रतेसोबतच चंदनाचा टिळा इच्छाशक्तीला बळ देतो. निद्रानाश, तणाव, डोकेदुखी आणि ताप यांसारख्या आजारांवर चंदनाचा टिळा अत्यंत उपयुक्त मानला जातो. चंदनामुळे माणसात सकारात्मक शक्तीचा संचार होतो अशी धार्मिक धारणा आहे.
चंदनाचा टिळा लावण्याची योग्य पद्धत कोणती?
टिळा किंवा तिलक ही धार्मिक संस्कृतीमध्ये अशी एक खूण आहे जी सामान्यत: कपाळावर लावली जाते, जिथे शरीरातील सर्वात महत्त्वाचे असलेले आज्ञा चक्र असते. टिळा कधीकधी शरीराच्या इतर भागांवर जसे की मान, हात, छाती आणि हातावर लावला जातो. प्रादेशिक रीतिरिवाजांनुसार टिळा दररोज किंवा विधी तसेच विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक प्रसंगी लावला जातो.
उर्ध्वपुंडू आणि त्रिपुंड या दोन्ही ठिकाणी चंदनाचा टिळा लावता येतो. कपाळावर लावलेले भस्माला त्रिपुंड असे म्हणतात. शैव म्हणजे शिवाचे (महादेव) भक्त हे लावतात. उर्ध्व पुंड्र (संस्कृत: ऊर्ध्वपुण्ड्र,) हा एक तिलक आहे जो वैष्णवांनी विष्णूशी असलेल्या त्यांच्या संबंधाचे सूचक म्हणून परिधान केला आहे. हे सामान्यतः कपाळावर घातले जाते, परंतु शरीराच्या इतर भागांवर देखील घातले जाऊ शकते जसे की खांद्यावर. याशिवाय भुवयांच्या मध्ये चंदनाचा टिळा लावणे देखील खूप फायदेशीर आहे असं सांगितले जातं.
चंदनाचे प्रकार:
लाल चंदन:
रक्त चंदन हे त्याचे दुसरे नाव. हे दक्षिण भारतातील पूर्व घाटांमध्ये आढळू शकते. हे झाड लाकडाच्या सुंदर लाल रंगासाठी प्रसिद्ध आहे. या झाडाच्या भव्य लाकडाला मात्र सुगंध नाही. ही एक लहान वनस्पती आहे जी १०-२५ फूट उंचीवर पोहोचू शकते. लाल चंदनामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
पांढरा चंदन:
हे एक सदाहरित वृक्ष आहे ज्यामध्ये अनेक उपचारात्मक गुणधर्म आहेत. चंदन, पांढरे आणि पिवळे दोन्ही एकाच झाडापासून येते. पांढऱ्या चंदनाच्या झाडाचा वापर आवश्यक तेले, साबण, सुगंध आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो.
मलयगिरीचे चंदन:
हे चंदन सर्वात चांगले, मऊसर असते. ह्याचा देवादिकांना प्रभात समयी लेप लावून पूजा करतात. ह्याचा सुंगध पण छान असतो. मराठी साहित्यात याचा बरेच ठिकाणी उल्लेख आहे. कुमार गंधर्व व वाणी जयराम यांनी गायिलेली खालील भूपाळी फारचं प्रसिद्ध आहे.
मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता , उठी उठी गोपाळा
हे दक्षिण भारतातील म्हैसूर, कुर्ग, हैदराबाद, निलगिरी आणि पश्चिम घाट येथे आढळू शकते. मलयगिरी चंदन, ज्याला श्रीखंड म्हणूनही ओळखले जाते, हे सर्व चंदन प्रकारांपैकी सर्वात गोड आणि सर्वात अस्सल आहे. या झाडांच्या लाकडापासून सुंदर पेटी, पोस्ट्स आणि पेडेस्टल्स बनवल्या जातात.
(लेखात व्यक्त केलेली मते ही धार्मिक मान्यतेनुसार आहेत.)
- डॉ. दिलीप कुलकर्णी
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |