इस्रायलची मोसाद आणि ऑपरेशन थंडरबोल्ट
इस्त्रायलची मोसाद ही संस्था त्यांच्या कारनाम्यासाठी जगप्रसिद्ध आहे. अनेक कारनाम्यातील असेच एक ऑपरेशन थंडरबोल्ट १९७६.
इस्त्रायल हा आकाराने जरी खुपच छोटा देश असला तरी तरी त्याचे कारनामे थक्क करणारे आहेत. जेरुसलेम हि इस्त्रायलची राजधानी आहे. हिब्रु व अरबी या दोन अधिकृत भाषा आहेत. १४ मे १९४८ साली या देशाला स्वतंत्र घोषित केले गेले. इस्त्रायल हे जगातील एकमेव ज्यु राष्ट्र आहे. इस्त्रायलची मोसाद ही संस्था त्यांच्या कारनाम्यासाठी जगप्रसिद्ध आहे. अनेक कारनाम्यातील असेच एक ऑपरेशन थंडरबोल्ट १९७६.
२७ जुन १९७६ ची ही घटना आहे. तेल अवीव येथील बेनगुरीयन इंटरनॅशनल एअरपोर्ट येथुन फ्रांन्सची एअरबस A300V4-203 ने ग्रिसची राजधानी एथेंससाठी विमानाने उड्डाण घेतले. या एअरबसमध्ये २४६ प्रवासी व १२ क्रु मेंबर होते.
फ्रांसची राजधानी पॅरीसला विमान चालले होते. हे विमान इथेंस येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. यावेळी एअरबसमध्ये ५८ प्रवासी बसले ज्यामध्ये ४ आतंकवादी देखिल होते. या ४ पैकि २ फिलीस्थिनी लिबरेशन आर्मीचे होते व २ जर्मनीच्या रिवोल्युशव ब्रिगेडचे होते. येथुन उड्डाण घेतले त्याचवेळी हे विमान हायजैक केले गेले. हायजैकरांनी हे विमान लिबीया येथील बेनगाजी या ठिकाणी नेले. येथे हायजैकरांनी पेट्रोल टाकी फुल करण्याची पहिली मागणी केली. त्यांची मागणी पुर्ण केली गेली. ७ तास त्यांनी विमान तेथेच थांबवले होते. यादरम्यान एक महिलेला आजारी असल्यामुळे त्यांनी सोडुन दिले. नंतर हायजैकरांनी कोणत्याही अरब देशात विमान नेण्याची मागणी केली. याला कारण असे होते की अरब देशांचे व इस्त्रायलचे संबंध आधीच तणावाचे होते. हायजैकरांना याचा फायदा घ्यायचा होता. मात्र आंतरराष्ट्रीय नियमांना घाबरून कोणीही तशी परवानगी दिली नाही.
सगळीकडुन मदत न मिळाल्यामुळे विमान येथे न ठेवता त्यांनी ४००० किलोमीटर लांब युगांडा येथे घेऊन गेले. याचे कारण युगांडा आफ्रिकेच्या मधोमध आहे व त्याच्या आसपासचे सगळे देश इस्त्रायलचे शत्रु होते. त्यामुळे इस्त्रायला आजुबाजुच्या देशांकडुन मदत मिळणे शक्य नव्हते. त्यातच भर म्हणुन युगांडाचा त्यावेळचा तानाशाह इदी अमीन होता जो इस्त्रायला आपला शत्रु मानत होता. यांनी विमान युगांडाच्या एंतबे एअरपोर्टवर ठेवले गेले.
इदी अमीन याने हायजैकर यांची भेट घेऊन त्यांना हवे असलेल्या सगळ्या सेवा त्यांना पुरवल्या व त्याचे काही सैनिक त्यांच्या मदतीला दिले. इदी अमीन यानंतर मॉरीशस येथे होणाऱ्या कॉन्फरन्स साठी निघुन गेला होता. यामध्ये जे ४ आतंकवादी होते ज्यात २ फिलिस्तीनी होते व २ जर्मन होते. नंतर अजुन ५ आतंकवादी येवुन त्यांच्यात सामिल झाले. इदी अमीनच्या मदतीमुळे आतंकवाद्यांनी इस्त्रायला धमकी द्यायला सुरवात केली. आम्हाला ५ मिलियन अमेरिकन डॉलर द्यावे व तुमच्या जेलमध्ये जे फिलिस्तीनी कैदि आहे त्यांना सोडुन द्यावे. तसेच इतर देशात जे फिलीस्तीना अटक आहेत त्यांना देखिल सोडण्यासाठी इस्त्राएलने प्रयत्न करावे. मागण्यापुर्ण करण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला गेला. इस्त्रायला इथे एक संधी मिळाली. त्यांनी एक यशस्वी चाल खेळली व इतर देशातील कैद्यांना सोडवण्यासाठी थोडा वेळ मिळावा कारण आमच्या देशातील कैद्यांना आम्ही सोडु पण बाकी देशांसोबत बोलणी कराव्या लागतील त्यांना मनवावे लागेल यासाठी वेळ वाढवुन मिळावा. २७ जुनला यांनी विमान हायजैक केले व ४ जुलैपर्यंत मागण्या पुर्ण करण्यासाठी वेळ दिली होती. एवढा वेळ इस्त्रायलसाठी पुरेसा होता.
यात आतंकवाद्यांकडुन एक मोठी चुक झाली ती अशी की यांनी यहुदी प्रवाश्यांना एअरपोर्टपासुन २ किमी अंतरावर असलेल्या वेगळ्या इमारतीत ठेवले व बाकीच्या प्रवाश्यांना सोडुन दिले. आतंकवाद्याना ही भीती होती की जर बाकी देशांनी त्यांच्या प्रवाशांना वाचविण्यासाठी आपल्यावर हल्ला केलाच तर ते महागात पडु शकते. यात इस्त्रायला अजुन एक मोठा सहारा भेटला तो म्हणजे ज्या एंतबे विमानतळावर या प्रवाशांना बंदि बनवले होते त्या विमानतळाचे बांधकाम एका इस्त्रायली कंपनीने केले होते. त्यामुळे आता मोसादच्या हातात विमानतळाचा पुर्ण नकाशा होता.
इस्त्रायलने ३ जुलै १९७६ हा दिवस हल्ला करण्यासाठी निवडला. ज्या प्रवाशांना आतंकवाद्यानी सोडले होते त्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष घडामोडींचा आढावा घेतला. त्यात त्यांना असे कळले की सगळ्या यहुद्यांना रनवेपासुन २ किलोमीटर दुर असलेल्या एकाच इमारतीमध्ये बंदि बनवुन ठेवले आहे. आतंकवादी किती आहेत, त्यांच्याकडे कोणकोणती हत्यारे आहेत याची मोसादच्या कमांडरांनी माहीती घेतली.
मोसादने या हल्ल्यासाठी ५ विमानांची यातील ३ विमाने ही (सी १३० सुपर हरकुलिस) व २ विमाने (बोइंग ७०७) होती. पहिल्या ३ विमानांमध्ये कमांडो बसलेले होते. ४ थे विमान खाली होते. बंदी बनवलेल्या प्रवाशांना त्यात बसवुन परत आणायचे होते. ५ व्या विमानात मेडिकल सोई होत्या. ३ जुलैला रात्री १ वाजता हल्ला करण्याचे ठरले. ४००० किलोमीटर जाणे व परत येणे शक्य नव्हते. त्यामध्ये मध्ये कुठेतरी पेट्रोल भरण्यासाठी थांबावे लागणार होते. यामध्ये केनियाने इस्त्रायला मदत केली होती. ४००० किलोमीटरचे अंतर कापताना कोणाच्या तरी रडारवर जर विमान आले तर यांच्या हल्ल्याची कल्पना युगांडाला मिळेल. रडारवर पकडले जाऊ नये म्हणुन यांची ५ विमाने समुद्रसपाटीपासुन फक्त १०० मीटरवरून उडवत होते. येवढ्या खालुन जर विमान गेले तर रडारला देखिल याची माहीती मिळु शकत नाही.
पुर्वी रात्री शक्यतो विमानांचे उड्डाण होत नसे. त्यामुळे रनवेवरील लाईट बंद करून ठेवत असत.
युगांडामध्ये एंतबे एअरपोर्टवर पोहोचल्यावर जर रनवे वरील लाईट बंद असतील तर विमान लँडिंग करणे शक्य नव्हते, किंवा धोकादायक देखिल ठरु शकत होते. अशा परिस्थितीत जर लँडिंग करावी लागली तर काय करावे त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग दिली होती. काही कमांडर रनवेवर जाऊन टॉर्चने विमानांना रनवेचा आंदाज देतील. त्याप्रमाणे त्यांनी विमान लँड केले देखिल. मोसादने अजुन एक चाल खेळली ती अशी की इदी अमीन ज्याप्रमाणे गाड्यांचा ताफा घेवुन लँडिंग करतो त्याचप्रमाणे लँडींग केली. ज्यामुळे तेथिल सुरक्षा रक्षकांना हल्ला होत आहे याची लगेच जाणिव होणार नव्हती. पण यात मोसादकडुन एक चुक झाली. इदी अमीन काळ्या रंगाची मर्सिडीज वापरत असे पण काही दिवसांपुर्वीच त्याने काळ्या रंगाच्या ऐवजी सफेद रंगाची मर्सिडीज घेतली होता. ताफ्यात काळ्या रंगाची मर्सिडीज पाहुन एका कमांडरला शंका आली. त्याने काळ्या रंगाच्या मर्सिडीजवर गोळीबार करण्यास सुरवात केली. मोसादचे कमांडोदेखिल तयारच होते त्यांनी देखिल फायरींग सुरू केली व त्या कमांडोच्या डोक्यात ३ गोळ्या मारल्या. याच वेळात बरेच कमांडो विमानतळावर उतरले. मोसादच्या कमांडोनी अंदाधुंद गोळीबारी चालु केली. याचदरम्यान बाकी विमानांनीदेखिल लँडिंग केली.
गोळीबारीमुळे विमानतळावरील लाईट बंद केले गेले. काही कमांडोने टॉर्च दाखवुन वैमानिकांना लँडिंग करण्यास मदत मिळाली. मोसादच्या कमांडोनी काही वेळातच विमातळावर तैनात असलेल्या युगांडाच्या सैनिकांना मारून टाकले. बंदि बनवलेले प्रवासी विमानतळापासुन २ किमी दुर ज्या इमारतीत होते तेथे हल्ला करून त्यांनी हिब्रु भाषेत सांगितले की आम्ही तुम्हाला सोडवायला आलो आहोत. इस्त्रायलच्या बंदी बनवलेल्या सर्व प्रवाशांना सोडवुन आणले. त्या प्रवाशांना विमानात बसवताना मोसादच्या काही कमांडोची नजर विमानतळावर असलेेल्या मिग - २१ या विमानांवर पडली. त्यावेळी विमानतळावर एकुण ११ मिग विमाने होती. जर मिग विमानांच्या मदतीने युगांडाने हल्ला केला तर ऑपरेशन फेल होण्याची भिती होती. त्यामुळे काही कमांडोनी हँड ग्रानाईडने ११ मिग विमानांना उडवुन दिले.
ऑपरेशन सक्सेस झाले होते. यापुर्ण ऑपरेशनचा इनचार्ज होता योनाथन नेतन्याहु (आताचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहु यांचे थोरले बंधु). ऑपरेशनमध्ये योनाथन नेतन्याहुला गोळी लागली होती त्यामुळे परत जाताना त्यांचा मृत्यु झाला. एकुण १२० प्रवाशी वाचवण्यात आले होते.
हे ऑपरेशन येथेच संपलेले नव्हते. पहिले ४ व नंतरचे ५ आतंकवादी मारले गेले होते. युगांडाचे ५० कमांडो मारले गेले. पुढे जाऊन याचा मास्टर माईंड याला सौदीमध्ये विष देऊन मारले. हे विष मोसादच्या गुप्तहेरांनी दिलं अस जरी ते कबुल करीत नसले तरी आपण काय ते समजुन घ्या.
माझ्या या लेखनाचे मुळ कारण असे आहे की, १९७६ साली फक्त ६ दिवसात मोसादने जी माहीती गोळा केली व त्यावरून प्लान बनवुन हल्ला केला. त्यावेळी गुगल सर्च इंजिन नव्हते, गुगल मॅपची सुविधा नव्हती. मोबाईल नव्हते. अशा अनेक सुविधा नसताना मोसाद जर असं ऑपरेशन करू शकत होती तर आज मोसाद काय करू शकते याचा अंदाज लावता येणार नाही.
लेखन :- डॉ. समीर भाऊ पंडित