मराठवाड्याची खाद्यसंस्कृती

मराठवाड्यातील भोजनात अनेक व्यंजने असतील त्यातील एक म्हणजे "पंचामृत" हे एक होय. पश्चिम महाराष्ट्रात पंचामृत हे पुजाविधिच्या वेळी प्रसादापूर्वी देण्याचा देण्याचा, दही, दुध, मध इत्यादींनी बनविलेल्या पेय पदार्थ. - सुरेश नारायण शिंदे (भोर)

मराठवाड्याची खाद्यसंस्कृती

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

गेल्या व या महिन्यात मराठवाड्यातील भुईकोट किल्ले पाहावयास जाण्याचा योग जुळून आला. सोलापूर, बीड, लातूर, अहमदनगर जिल्ह्यातील किल्ले भ्रमंती दरम्यान तेथील अल्पकाळ का होईना खाद्यपदार्थांचा अनोखा स्वाद घेता आला. मराठवाड्यातील काही स्थानिकांशी जुजबी संवाद साधताना त्याच्या लकबी व भाषेची शैलीचा अल्प परिचय झाला.

लातूरकरांना आठवड्यातून एकदा नळाचे पाणी मिळते पण तरीहि ते पाण्याची कमतरता आहे हे मान्य करीत नाहीत. लातूरमधे घरे बांधताना पहिला विचार ते घरात पाणी साठवण हौद किती क्षमतेचा व कुठे बांधायचा ह्याचा पहिला विचार करीत असावेत. काही वर्षापूर्वी लातूरकरांना रेल्वेने पाणी नेण्यात आले होते, हीच गोष्ट पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना सांगताना," रेल्वेने पाणी नेता येते हे लातूरकरांनी हिंदुस्थानाला दाखवून दिले." असे अभिमानस्पद विधान करतात.

निसर्गाच्या अवकृपेला दोन हात करण्यात ते नक्कीच यशस्वी झालेले आहेत. शिक्षणात लातूर पॕटर्न सर्वांना परिचित व मान्य आहे पण कमी शब्दात जास्त आशय मांडणारे म्हणून पुणेकर सुपरिचित असतील पण कमकुवतपणा पण बलस्थान म्हणून गौरवणारे लातूरकरच.

मराठवाड्यातील भोजनात अनेक व्यंजने असतील त्यातील एक म्हणजे "पंचामृत" हे एक होय. पश्चिम महाराष्ट्रात पंचामृत हे पुजाविधिच्या वेळी प्रसादापूर्वी देण्याचा देण्याचा, दही, दुध, मध इत्यादींनी बनविलेल्या पेय पदार्थ. भोजनपात्रात लोणची, पापड किंवा विविध चटण्या असतात, तसाच मराठवाड्यात पंचामृत हा पदार्थ. हिरव्या मिरच्या, दहीदुध, साखर गुळ, तिळकुट, तील, जिरे मोहरी इत्यादींनी बनविलेला असतो. भोजनस्वाद वाढविण्यासाठी हिरव्यागार झणझणीत तिखट मिरच्यांना गोड स्वरूपात आणून त्यांना पंचामृत हे नाव देणारे मराठवाड्यातील समाजमन समजून घ्यावे लागेल.

येथील बालुशाही ही केशरी रंगाची असून चवीतील वेगळेपणा दाखविणारी आहे. हाॕटेलमधे वडापाव ऐवजीगरमागर स्वादिष्ठ पोहे मिळतात पण पोह्याप्रमाणेच असणारा " सुशिला" हा पदार्थ मिळतो त्याचाहि स्वाद घ्या.

हिंदुस्थानात पाण्यानंतर बहुधा सर्वात जास्त पिले जाणारे चहा हे पेय असावे. महाराष्ट्रात तर वेगवेगळ्या भागात चहाचे सुप्रसिद्ध नावे आहेत. इराणी चहा, मातीच्या भांड्यातील चहा, लेमन चहा इत्यादींची लोकप्रियता सर्वज्ञात आहेच पण तुम्ही कधी तुळजापूरहून लातूरला जात असाल तर तुम्हाला एका अफलातून चहा विक्रेत्यास भेटून चहाचा मनमुराद आनंद घेता येईल.

तुळजापूरहून औसाकडे जाताना ताकविकीच्या पुढे बासुंदीचे उजणी गावानंतर औसा हे लातूर जिल्ह्यातील हे शहर आहे. औसा हे येथील प्राचीन किल्ल्यामुळे सर्वदूर परिचित आहे. औसा गावातील नविन उड्डाण पुल लागतो व हा उड्डाणपुल जिथे संपतो, तिथे लातूरला जाणाऱ्या रस्त्याच्या (डाव्या बाजूस) गुरू अमृततुल्य नावाचा फलक असलेला दिसेल. ह्या गुरू अमृततुल्यमधे १९ फेब्रुवारी २०२२ रोजी औसा किल्ला पाहून आल्यावर चहाकरिता थांबलो होतो. तेथील व्यक्तिने चहा दिल्यावर कपातील चहाच्या रंगाने आकर्षित केले. पहिला चहाचा घोट घेताच दिवसभराचा क्षीण नाहीसा होऊन उत्साह संचारला. अनेक ठिकाणी चविष्ठ चहाचा घेतल्याचा अनुभव पाठीशी असताना पहिल्यांदा औसा येथील गुरू अमृततुल्यच्या चहाविषयी लिहावे ही भावना झाली म्हणजे तुम्ही सहजपणे समजू शकता की प्रेमात पाडणारा हा चहा आहे. सलग दोन चहा घेऊन बाहेर पडलो.

त्यानंतर परवा लातूरला जाताना दोन कप व परत येताना दोन कप चहा घेऊन नंतर ही प्रकाशचित्रे घेतली. ज्यांनी चहा बनविला त्या श्री.अरबाज बरोबर प्रकाशचित्र घेण्याचा मोह झाला. मला वाटते आपण कधी औसा येथे गेला तर नक्कीच गुरू अमृततुल्यमधे चहाचा आनंद घ्यावा म्हणून हा लेखनप्रपंच.

- सुरेश नारायण शिंदे (भोर)