कलिंगड - गुणधर्म व फायदे

कलिंगडाच्या रसाने पोटातील अनेक व्याधींमध्ये आराम मिळतो आणि पोटातील दाह कमी होतो. या फळात मूत्रगामी गुण असल्याने मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या रोगांमध्ये हे फळ गुणकारी आहे.

कलिंगड - गुणधर्म व फायदे

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

आफ्रिका हे कलिंगडाचे मूळ स्थान आहे. जगातील सर्वच देशांत ते लोकप्रिय झाड आहे. वेलीवर तयार होणारे हे फळ आकाराने गोल आणि वजनामध्ये एक-दीड किलोपासून दहा-बारा किलो इतके मोठे असते. या फळाच्या आतील गर लाल रंगाचा असतो आणि तो खाण्यास अत्यंत मधुर असतो. या गरामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात.

गुणधर्म :- आयुर्वेदाच्या मते कलिंगड मधुर, मूत्रगामी, शीतकारक, बलवर्धक, तृप्तिकारक, पौष्टिक व पित्तहारक आहे.

कलिंगडामधील घटक : -
१) पाणी - ९५.७ टक्के
२) प्रोटीन - ०.१ टक्के
३) चरबी - ०.२ टक्के
४) कार्वोदित पदार्थ - ३.८ टक्के
५) कॅलशियम - ०.१ टक्के
६) फॉस्फरस - ०.०१ टक्के
७) लोह - ०.२ मि. ग्रॅम /१०० ग्रॅम.
८) नियासिन - ०.२ मि. ग्रॅम / १०० ग्रॅम
९) जीवनसत्त्व 'बी', २.० माइक्रो ग्रॅम / १०० ग्रॅम
१०) जीवनसत्त्व 'इ' - १ मि. ग्रॅम / १०० ग्रॅम

फायदे :- कलिंगडाच्या रसाने पोटातील अनेक व्याधींमध्ये आराम मिळतो आणि पोटातील दाह कमी होतो. या फळात मूत्रगामी गुण असल्याने मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या रोगांमध्ये हे फळ गुणकारी आहे. या फळाचा मुख्य उपयोग शरीराला व मनाला थंडावा व सुस्थिरता प्राप्त करून देण्यासाठी होतो. कलिंगडाच्या रसाने शरीरामध्ये चालू असणाऱ्या नवनिर्मितीच्या क्रियेला गती प्राप्त होते.

कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात.

कलिंगड नियमीत सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

गॅस ही एक मोठी समस्या आहे. प्रत्येक माणूस यामुळे त्रस्त आहे. कलिंगडचे नियमीत सेवन केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतापासून मुक्तता मिळू शकते. याच्या सेवनाने तुमचे पोट स्वच्छ राहते, पाचन तंत्रही ठीक राहते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

कलिंगडमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे. 

कलिंगडाच्या सेवनामुळे शरीरात अनेक पोषक घटक पोहोचतात. मूत्रपिंडाच्या समस्यांपासून ते कर्करोगापर्यंतच्या समस्यांमधून आराम मिळतो आणि शरीराला ताजेतवाने वाटते. कलिंगडाच्या रसात काळे मीठ आणि मिरपूड मिसळले, तर ते अधिक फायदेशीर ठरते.

कलिंगडामध्ये लायकोपीन अँटीऑक्सिडेंट असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कर्करोगाचा धोका कमी करते. 

आयुर्वेद तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर कर्करोगाच्या रुग्णांनी काळी मिरी मिसळलेला कलिंगडाचा रस प्यायला, तर कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत मिळते.

कलिंगडामध्ये रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या फोलेटचे प्रमाण जास्त असते.

साधारणपणे लठ्ठपणा हे सर्व रोगांचे मूळ आहे. जर आपल्याला आपले वजन कमी करायचे असेल, तर आहारात कलिंगडाचा रस प्या. हे आपल्याला ऊर्जा देखील देईल आणि वजनही कमी करेल.

कलिंगडामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी १, बी २, बी ३, बी ५ आणि बी ६ असे पोषक घटक असतात.

कलिंगडाचा रस शरीरातील विषारी घटक काढून टाकतो. ज्या लोकांना किडनीची समस्या आहे, त्यांनी कलिंगडाचा रस प्यायला पाहिजे.

कलिंगडामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. त्यामुळे त्वचा बर्‍याच काळासाठी चमकदार आणि ताजीतवानी होते. अकाली वृद्धत्व टाळते.

कलिंगडामध्ये जो पांढरा भाग आहे तो देखिल खाल्ला पाहिजे. तसेच त्यातील बिया या चावुन खायला हव्यात. लहान मुलांना सक्तीने द्यायला लागला तरी चालेल पण रोज रस तरी प्यायला लावा.

- डॉ. समीर पंडित