भूगोल सामान्य ज्ञान

आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची माहिती आपल्याला असावी म्हणून ज्या विद्येची निर्मिती करण्यात आली तिला भूगोलविद्या असे म्हणतात. नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण अनेक भौगोलिक संज्ञांची नावे ऐकत असतो अशावेळी त्या संज्ञांचा शास्त्रीय अर्थ काय ते सोप्या पद्धतीने समजून घेऊ.

भूगोल सामान्य ज्ञान

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पृथ्वीचा आकार कसा आहे?

पृथ्वीचा आकार हा गोल आहे.


पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे?

पृथ्वीवर ७१ टक्के म्हणजे दोन तृतीयांश इतके पाणी आहे.


पृथ्वीवर किती टक्के जमीन आहे?

पृथ्वीवर २९ टक्के म्हणजे एक तृतीयांश जमीन आहे.


द्वीप म्हणजे काय?

ज्या भूभागाच्या चारही बाजुंनी पाणी असते अशा भूमीस द्वीप अथवा बेट असे म्हणतात. 


पृथ्वीवरील महाद्वीपे कोणती?

पृथ्वीवर दोन महाद्वीपे आहेत त्यापैकी पहिल्या महाद्विपात युरोप, आशिया आणि आफ्रिका असे तीन खंड आहेत तर दुसऱ्या महाद्विपात अमेरिका हा खंड आहे.


द्वीपकल्प म्हणजे काय?

जमिनीचा जो प्रदेश तीन बाजुंनी पाण्याने वेढलेला असतो त्यास द्वीपकल्प असे म्हणतात. 


संयोगी भूमी म्हणजे काय?

जमिनीच्या अथवा भूमीच्या दोन भागांना जोडणाऱ्या अरुंद जमिनीस संयोगी भूमी असे म्हटले जाते.


भूशलाका म्हणजे काय?

ज्या जमिनीचे लांब टोक समुद्रात गेले असते त्या टोकास भूशलाका अथवा भूशीर असे म्हटले जाते. 


डोंगर आणि पर्वतांमध्ये काय फरक आहे?

भूमीवरील उंच अशा भागास डोंगर म्हणतात आणि उंच व लांब पसरलेल्या डोंगरांना पर्वत असे म्हणतात.


महासागर म्हणजे काय?

पृथ्वीवर ज्या ठिकाणी पाण्याचा सर्वात मोठा साठा आहे त्यास महासागर असे म्हणतात. आपल्या पृथ्वीवर एकूण पाच महासागर आहेत ज्यांची नावे अनुक्रमे प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर व दक्षिण महासागर अशी आहेत.


समुद्र म्हणजे काय?

ज्या महासागराचा ठराविक भाग भूमीने वेष्टित असतो अशा भागास समुद्र अथवा सागर या नावाने ओळखले जाते. 


आखात म्हणजे काय?

समुद्राचा जो फाटा भूमीवर बराच लांब गेलेला असतो त्यास आखात असे म्हणतात. 


उपसागर म्हणजे काय?

आखाताचे मुख रुंद असल्यास त्यास उपसागर असे म्हटले जाते.


सामुद्रधुनी म्हणजे काय?

दोन समुद्र जोडणारा जो जलयुक्त भाग असतो त्यास सामुद्रधुनी असे म्हणतात.


सरोवर म्हणजे काय?

चारही बाजूनी जो पाण्याचा साठा भूमीने वेढला गेलेला असतो त्यास सरोवर असे म्हणतात. 


नदी म्हणजे काय?

एखाद्या डोंगरातून अथवा पर्वतातून उगम पावलेला पाण्याचा प्रवाह जो भूमीवर येऊन समुद्राच्या दिशेने वाहत जातो त्या प्रवाहास नदी म्हणतात. हा प्रवाह जेथे उत्पन्न होतो त्यास नदीचा उगम असे म्हणतात व ज्या ठिकाणी हा प्रवाह समुद्रास मिळतो त्यास नदीचे मुख म्हटले जाते.