पुस्तक परिचय - किल्ले
महाराष्ट्रात अदमासे ३०० किल्ले असावेत, व हे किल्ले महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांची श्रध्दास्थाने बनली आहेत. परंतु दुर्गभ्रमंतीच्या छंदाच्या जनकांपैकी एक असलेले सिध्दह्स्त लेखक म्हणजे गो.नि.दांडेकर.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आपल्या आयुष्याचा बराच काळ त्यांनी या दुर्गांच्या सानिध्दयातच व्यतीत केला. इतकेच नाही तर त्यांच्या बर्याच कथा-कादंबर्यांना या दुर्गांची पार्श्वभुमी आहे. सध्दया किल्ल्यांवर वर्णनात्मक पुस्तके बरीच येत आहेत. परंतू अगदी सुरुवातीला आलेले पुस्तक म्हणजे कै.चिंतामण गोगटे यांचे महाराष्ट्रातील किल्ले! हे पुस्तक १९०५ साली २ भागांत प्रकाशीत झाले होते. त्याच्या दोन आव्रुत्त्या निघाल्या, मात्र यानंतर ते पुस्तक खुपच दुर्मीळ झाले.
अशावेळेस त्याकाळच्या उमेदीच्या तरुणांना उपयोगास पडले ते गो.नि.दांडेकर यांचे किल्ले हे पुस्तक. अतिशय समर्पक अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील २०८ किल्ल्यांची माहीती उपलब्ध करुन दिली आहे. आणी यातील सर्वच किल्ले त्यांनी स्वतः हिंडुन पाहीले आहेत. या पुस्तकामध्ये किल्ल्यांची जिल्हावार मांडणी करुन पुणे, कुलाबा (आता रायगड), सातारा, कोल्हापुर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, सांगली व औरंगाबाद या जिल्ह्यांचे दुर्गवैभव या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
याशिवाय शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणाचा सुध्दा या पुस्तकामध्ये समावेश आहे, ज्यामध्ये गडकोटांचे मह्त्व, गडांची रचना, गडांची राखण, गडावरील साहित्य व युध्याची सामुग्री व गडाची सामुग्री व गडाचा कारभार इत्यादी प्रकरणांचा उल्लेख. वरील सर्व किल्ल्यांचा नकाशा सुध्दा या पुस्तकासोबत आहे.
पुस्तकाची पहीली आर्वुत्ती सप्टेंबर १९७९ साली प्रकाशित झाली तसेच चौथी आर्वुत्ती २००५ साली प्रकाशित झाली. हे पुस्तक मुबंई तसेच पुणे येथील मजिस्टीक साहीत्य तसेच इतर दुकानांमध्ये उपलब्ध आहे.
- पुस्तकाचे नाव - किल्ले
- लेखक - गो.नि.दांडेकर
- प्रकाशक - अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन