निकॉन डी-९० डिजीटल एस. एल. आर. कॅमेरा

काळाच्या ओघात अ‍ॅनॉलॉग तंत्रज्ञान मागे पडून त्याची जागा डिजीटल तंत्रज्ञानाने घेतली. छायाचित्रण क्षेत्रही त्यास अपवाद राहीले नाही.

निकॉन डी-९० डिजीटल एस. एल. आर. कॅमेरा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पूर्वीच्या अ‍ॅनॉलॉग कॅमेर्‍यांची जागा प्रगत सोयींनी युक्त अशा डिजीटल कॅमेर्‍यांनी घेतली आणि एवढ्यावरच न थांबता अधिकाधिक सुविधांनी उन्नत असे डिजीट्ल एस.एल.आर. कॅमेरे विकसीत केले गेले.

यात निकॉन कंपनी आघाडीवर होती. ही कंपनी फक्त कॅमेरा आणि ऑप्टीक्स याच उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत करीत असल्याने आपसूकच कॅमेर्‍यांचा दर्जा देखील अतिशय चांगला राखण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याच डिजीट्ल एस.एल.आर. श्रेणीमधील निकोन डी-९० हा १२.३ मेगापिक्सलचा पूर्णपणे व्यावसयिक उपयोगासाठी तयार करण्यात आलेला एक उत्कृष्ट सुविधांनी उन्नत असा कॅमेरा आहे. पण या सर्व सुविधांची तुम्हास गरज असेल तर हा कॅमेरा तुमच्यासाठी परिपूर्ण आहे हे नक्की!

निकोन डी-९० चा छायाचित्र दर्जा उत्तम आहे यात वाद नाही. १२.३ एम.पी.एक्स. सी.एम.ओ.एस. सेन्सर हे त्याचे एक कारण असावे.

इतर डिजीटल एस.एल.आर. कॅमेर्‍यांमध्ये अभावाने आढळणारी सुवीधा सुद्धा यात आहे ती म्हणजे मुव्ही मोड. डी-मुव्ही या नावाने ओळखल्या जाणार्‍या या सुविधेचा वापर तुम्ही मुव्ही रेकॉर्ड करण्यासाठी करु शकता.

निकॉन डी-९० हा उत्कृष्ट कॅमेरा का आहे याची आणखी काही कारणे. एका सेकंदामध्ये ४.५ छायाचित्रे इतक्या वेगाने छायाचित्रे काढण्याची क्षमता या कॅमेर्‍यात आहे.

आश्चर्य वाटले ना? कारण चार सेकंदात एक फोटोही काढणे आपल्याला मुश्कील असते यामुळे खुप चांगल्या डिटेलींगने ही छायाचित्रे आपणास काढता येतात. अर्थात नव्यानेच विकसीत झालेली सिन रेकगनायझेशन सिस्टीम, ११ पॉईंड फोकस मोड यामुळे छायाचित्रण अतिवेगाने करता येते.

तसेच यातील थ्रीडी कलर मॅट्रीक्स २ मिटरींग सुविधा दर्जेदार एक्स्पोजर मिळवून देते. याशिवाय तुम्हाला बाहेरील कुठल्याही सॉफ्टवेअरची मदत न घेता कॅमेर्‍यातच छायाचित्रे एडीट करता येतात ज्याने तुमचा वेळही बर्‍यापैकी वाचतो.

फिशआय इफेक्ट, डी-लाईटींग आणि अशीच इतर अनेक फंक्शन्स या कॅमेर्‍यात आहेत. तेव्हा जर तुम्हाला निव्वळ व्यावसायिक वापरासाठी कॅमेरा घ्यायचा असेल तर निकॉन डी-९० चा विचार करण्यास हरकत नाही.