अक्कलकाढा - माहिती व उपयोग

अक्कलकाढयास अक्कलकारा, अक्कलकाला, आक्कल, अक्कलकरो, अकलकरहा, आकळकरी, आकरकरही अशा नावांनीही ओळखले जाते.

अक्कलकाढा - माहिती व उपयोग
अक्कलकाढा - माहिती व उपयोग

अक्कलकाढयास अक्कलकारा, अक्कलकाला, आक्कल, अक्कलकरो, अकलकरहा, आकळकरी, आकरकरही अशा नावांनीही ओळखले जाते. इंग्रजीमध्ये यास  पेलेटरी रूट (pallatory root) असे नाव आहे. अक्कलकाढ्याची झाडे मुळात अतिशय लहान असतात.

यांचे उत्पादन पूर्वी सहसा बंगाल प्रांतात अथवा इजिप्त आणि अरब देशांमध्ये होत असे. भारतामध्ये सुद्धा अल्प प्रमाणात ही वनस्पती सापडत असली तरी गेल्या काही वर्षांत हीच्या औषधी गुणधर्मामुळे आपल्याकडे हिच्या उत्पादनाचे प्रमाण वाढले आहे.

अक्कलकाढ्याच्या झाडाची ओळख म्हणजे यास पिवळ्या रंगाची फुले येतात. ही फुलांची चव अक्कलकाढ्याच्या कांडीप्रमाणेच असून ती खाल्ली असता जीभेस मुंग्या येतात.

पूर्वी खोकला आला असता ही फुले विड्यात घेऊन त्यांचा धूर शरीरात घेत असत ज्याने खोकल्यास आराम पडत असे. अक्कलकाढा उष्ण, बलवर्धक व तिखट असून त्याच्या सेवनाने पडसे, वायुप्रकोप व सुजेचा त्रास दूर होतो. 

दात दुखत असल्यास अक्कलकाढा आणि कोरांटीचा पाला यांचा कूट करून दाताखाली ठेवल्यास फरक पडतो. 

मुख शुद्धीसाठी अक्कलकाढा दाढेखाली ठेवावा 

पूर्वी शेंदुराच्या विषावर अक्कलकारा व वेखंड पाण्यात उगाळून पिण्यास देत असत 

अक्कलकाला, सैंधव, आवळकंठी, चित्रक, मिरी, पिंपळी, ओवा, हरितकी आणि सुंठ एकत्र करून त्यास महाळुंग्याच्या रसासोबत मिश्रित करून अक्कलकादी चूर्ण तयार केले जात असे या चूर्णाचा वापर मंदाग्नी, खोकला, दमा, पडसे, फेफरे यांवर उपचार करण्यास केला जात असे. 

मुतखड्यावर अक्कलकादी काढा रामबाण उपाय म्हणून वापरात आणला जातो. 

अपस्माराच्या विकारावर अक्कलकाढ्याचे चूर्ण मधात दिले असता हितकारक असते. 

जिभेची व तोंडाची दुर्गंधी यावर अक्कलकाढा चावून तोंडात काही वेळ धरून ठेवल्यास खूप चांगले फायदे होतात मात्र हे करताना आलेली लाळ गळू द्यावी आणि हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळ करावा. 

जर लहान मुलांची जीभ जाड असेल अथवा त्यांना तोतरेपणा व बोबडेपणा असेल तर अक्कलकाढ्याचे फुलांचे चूर्ण मधासोबत दिल्यास उपकारक ठरते. 

शारीरिक कमजोरी, नपुंसकत्व दूर करणारी, शक्ती वर्धक आणि अन्नाचे पचन सुरळीत करणारी अक्कल काढा अतिशय उपयोगी अशी वनस्पती आहे.