रातवा पक्षी – निसर्गातील एक रहस्यमय रात्रफिरता

रातवा पक्षी हा असाच एक अत्यंत चपळ आणि दुर्मीळ रात्रफिरता पक्षी आहे. याला इंग्रजीत Nightjar किंवा Caprimulgus असे म्हणतात.

रातवा पक्षी – निसर्गातील एक रहस्यमय रात्रफिरता
रातवा पक्षी

भारतीय जंगलांमध्ये अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. त्यातील काही पक्षी दिवसा दिसतात, तर काही असेही आहेत जे रात्री सक्रिय असतात. रातवा पक्षी हा असाच एक अत्यंत चपळ आणि दुर्मीळ रात्रफिरता पक्षी आहे. याला इंग्रजीत Nightjar किंवा Caprimulgus असे म्हणतात. हा पक्षी फारसा अढळत नाही कारण तो दिवसाच्या वेळेस झाडाझुडपांमध्ये इतका एकरूप होऊन बसतो की नजरेसही येत नाही.

रातवा पक्ष्याचे स्वरूप आणि रंग

रातवा पक्षी झाडावर लटकतो तेव्हा त्याचा रंग इतका झाडासारखा भासतो की तो झाडाचाच एखादा अवयव वाटावा. याचा रंग धूसर असून नजरेंत भरू नये यासाठीच निसर्गाने त्याला अशी रचना दिली आहे. त्याचे पिसे मृदु आणि मऊ असतात जेणेकरून उडताना आवाज होत नाही – ही एक प्रकारची नैसर्गिक सुरक्षितता आहे.

त्यांची चोच पसरट, मृदू आणि अशक्त असून वरच्या ओठाच्या दोन्ही बाजूंना सुपासारखे केस असतात. हे केस उडणाऱ्या कीटकांना पकडण्यास मदत करतात. यांची पिसे जाडसर पण मऊ, आणि तोंड फार विस्तीर्ण असते, जे उडताना हवेतले कीटक सहज गिळण्यासाठी उपयुक्त ठरते.


रात्रीचे जीवन आणि शिकार पद्धत

रातवा हे पक्षी फारसे अढळण्यांत येत नाहींत, कारण कीं ते रात्रीचे फिरतात आणि दिवसात झुडपांत किंवा झाडावर लपून बसतात. सांज झाली की ते धपकत थपकत चालून किंवा उंच जागेवर बसून कर्कश आवाज करतात. या आवाजांमुळे कधी कधी जंगलात गूढपणाची भावना निर्माण होते.

रात्र पडल्यावर हे पक्षी आकाशात उडू लागतात आणि वेगवेगळ्या गतीने फेऱ्या घालतात. काहींना त्यांच्या अशा विचित्र हालचाली पाहून आश्चर्य वाटते. पण हे सर्व त्यांच्या शिकारीसाठी असते. उडताना हे पक्षी आपले तोंड विस्तीर्ण उघडून हवेत उडणारे कीटक पकडतात आणि आपले पोट भरतात.


निवास व पुनरुत्पत्ती

हे पक्षी जमिनीवर सोयीच्या ठिकाणी थोडेसे उकरून दोन अंडी घालतात आणि पिल्ले वाढवतात. त्यांचे घरटे फारसं संरक्षित नसते, परंतु त्यांच्या छुप्या रंगामुळे कोणालाही सहज दिसत नाही.

रातवा पक्ष्याचे Caprimulgus प्रजातीमध्ये अनेक उपप्रकार आहेत आणि वेगवेगळ्या खंडांमध्ये त्यांचे रंग व स्वरूप थोडेसे वेगळे असते. मात्र त्यांचा एकूण जीवनशैली, आवाज आणि शिकार पद्धती सारखीच असते.


वैज्ञानिक वर्गवारी

  • वर्ग: वृक्षारोही

  • उपवर्ग: विस्तृतचंचू

  • गोत: कापुरुष

  • जात: Caprimulgus

  • चोच: पसरट, अशक्त

  • पिसे: मृदू

  • वस्ती: सर्व देशांत

  • भोजन: रात्री कीटक पकडून


रातवा पक्षी हा निसर्गातील एक आश्चर्यकारक आणि रहस्यमय जीव आहे. त्याची रचना, आवाज, आणि वागण्याची शैली यामुळे तो इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा ठरतो. जंगलात शांततेत रात्र घालवत असताना कधी रातवा पक्ष्याचा आवाज ऐकू आला, तर समजावे की निसर्गाचे एक अनोखे रक्षणकर्ते आपल्या कामात व्यस्त आहे.