उंबर वृक्षाची माहिती व उपयोग

उंबरास संस्कृत भाषेत उदुंबर असे नाव आहे व याचे शास्त्रीय नाव फायकस रेसीमोझा किंवा फायकस ग्लोमेरॅटा आहे. आपल्याकडे उंबराच्या झाडास औदुंबर असे म्हणायची परंपरा आहे कारण यास साक्षात दत्तप्रभूंचा निवास असलेला वृक्ष म्हणून ओळख आहे त्यामुळे सहसा वड, पिंपळ व उंबर या तीनही झाडांना पार बांधला जातो व ही झाडे गावाच्या मध्यवर्ती अथवा धार्मिक ठिकाणी पाहण्यात येतात.

उंबर वृक्षाची माहिती व उपयोग
उंबर वृक्षाची माहिती व उपयोग

भारतीय जैववैविधतेत वृक्षांस अनन्यसाधारण महत्व आहे. वृक्ष हे प्राणवायू, फळे, फुले, लाकूड, औषधे व इतर अनेक गोष्टींसाठी मानवास उपयुक्त असतात. भारतातील अनेक वृक्षांना धार्मिक महत्व देखील आहे. धार्मिक महत्व असलेल्या वृक्षांमध्ये मुख्यतः वड, पिंपळ व उंबर आदी वृक्षांचा समावेश होतो. उंबर हा वृक्ष देखील वड, पिंपळ, अंजीर इत्यादी वृक्षांच्या मोरेसी कुलातील वृक्ष आहे.

उंबरास संस्कृत भाषेत उदुंबर असे नाव आहे व याचे शास्त्रीय नाव फायकस रेसीमोझा किंवा फायकस ग्लोमेरॅटा आहे व इंग्रजीमध्ये यास क्लस्टर फीग असे नाव आहे. आपल्याकडे उंबराच्या झाडास औदुंबर असे म्हणायची परंपरा आहे कारण यास साक्षात दत्तप्रभूंचा निवास असलेला वृक्ष म्हणून ओळख आहे त्यामुळे सहसा वड, पिंपळ व उंबर या तीनही झाडांना पार बांधला जातो व ही झाडे गावाच्या मध्यवर्ती अथवा धार्मिक ठिकाणी पाहण्यात येतात.

उंबराची पाने दाट हिरवी असून मोठी असतात व आकार अंडाकृती अथवा आयताकृती असतो. झाडाचे साल पिंगट करडे, गुळगुळीत व  जाड असते.

उंबराची सावली शीतल असून मनास सौख्य देणारी असते. उंबराच्या झाडास अंजिराच्या आकाराची फळे येतात व ती पिकली की त्यांचा वापर खाण्यासाठी सुद्धा केला जातो. उंबराच्या कच्या फुलांची भाजी सुद्धा करण्यात येते. उंबराचे मध्यम कोवळे फळ गोड, शीतल, तुरट असून तृषा, पित्त, रक्तविकार व कफ यांचा नाश करते तर उंबराचे जूनफळ हे रुचिकर, तुरट, गोड, अतिथंड व कफकारक असून पित्त, रक्तदोष, प्रमेह, बेशुद्धी व दाह यांचा नाश करते.

उंबराचे लाकूड हे अतिशय चिवट प्रकारचे असून ते एवढे बळकट असते की सहजासहजी ते फुटत नाही. उंबराच्या लाकडापासून पूर्वी तक्ते तयार केले जात असत. उंबराच्या लाकडाची साल थंड, तुरट व व्रण नाशक आहे. 

पूर्वी पाण्याचा नैसर्गिक स्रोत शोधण्याकरिता ज्या ठिकाणी उंबर आहे त्याच्या बाजूस शोध घेण्यात येत असे व उंबराचे झाड जेथे असेल त्याच्या बाजूस पाण्याच्या विहिरी निर्माण केल्या जात व असेही म्हणतात की उंबराच्या झाडाच्या बाजूस असलेल्या जलस्रोतातील पाणी हे अतिशय निरोगी व पिण्यास चांगले असते.

उंबराच्या झाडाचे औषधी गुणधर्म सुद्धा बरेच असून या गुणधर्माचा वापर विविध विकारांवरही आयुर्वेदिक औषधे निर्माण करण्यासाठी करण्यात येतो.

वायूने अंग धरणे, रक्तपित्त, सर्प विष, डोळे येणे, गालफुगी, सूज, अतिसार, रक्तातिसार, मुतखडा उष्णता, उपदंश व प्रमेह, देवी अथवा गोवर, पित्तज्वर, कर्णमूळ, गंडमाळा, नाकातून रक्त पडणे अशा असंख्य विकारांवर उंबरापासून निर्माण करण्यात आलेली औषधे ही गुणकारी ठरतात म्हणून भारतीय पर्यावरण, आयुर्वेद व धर्मशास्त्र या तिन्हींच्या दृष्टीने उंबर हा वृक्ष खऱ्या अर्थाने बहुगुणी वृक्ष आहे.