आमवात - एक त्रासदायक विकार
अचानक अंगदुखी, ताप, आळस, अंग जाड होणे, अपचन इत्यादी समस्या उदभवू लागल्या की आमवात हा आजार डोळ्यासमोर येतो.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
मात्र या आजारामागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते की हा आजार विरुद्ध आहार, अग्नी मंदावणे, स्निग्ध पदार्थांचे सेवन केल्याकेल्या व्यायाम करणे अथवा सेवन करून लगेच झोपणे, अति निद्रा इत्यादी चुकीच्या सवयींमुळे होण्याची शक्यता असते.
बऱ्याचदा अग्निमांद्य असताना पोटास लवकर न पचणाऱ्या जड पदार्थांचे सेवनही या आजारामागील कारण असते.
आमवातामुळे आपल्या पोटात आमांशाचा साठा होतो आणि कालांतराने तो आपल्या सांध्यांमध्ये शिरतो आणि सांधेदुखी सुरु होते. आमवाताचे एकूण प्रकार आमवायू, वात, पित्त, कफ आणि सन्निपात असे आहेत.
आमवातामध्ये वातजन्य, पित्तजन्य आणि कफजन्य अशी लक्षणे दिसू शकतात व ज्या मध्ये ही तीनही लक्षणे दिसून येतात त्यास सन्निपात असे म्हटले जाते. सन्निपात असेल तर अधिक त्रास होतो.
आमवातावर आयुर्वेदात अनेक उपचार पद्धती सांगितल्या गेल्या आहेत
आमवातावर आयुर्वेदात लघुपंचमुळं (रिंगणी, डोरली, साळवण, पिठवण, गोखरू) तसेच बृहत पंचमुळं (बाळवेल, शिवणीमुळं, टाकळा, पहाडमूळ, टेंटू) यांच्या काढ्यात तेवढ्याच प्रमाणात एरंडेल दिल्यास फरक पडतो असे नमूद आहे.
याशिवाय गुळवेल, सुंठ, देवदार, इंद्रजव, वावडिंग यांचे काढ्यात एरंडेल घालून दिल्यासही फरक पडतो असे सांगितले आहे.
मात्र आमवात होऊ न देण्यासाठी जे करावे लागेल ते करणे आपल्या हातात नक्कीच आहे वर सांगितल्याप्रमाणे विरुद्ध आहार, स्निग्ध पदार्थांचे सेवन केल्या केल्या व्यायाम करणे अथवा सेवन करून लगेच झोपणे, अति निद्रा इत्यादी चुकीच्या सवयींवर वेळीच नियंत्रण मिळवता आले तर या त्रासास सामोरे जाण्याची आवश्यकताच भासणार नाही.
अर्थात या युगातील राहणीमानामुळे काही सवयी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात मात्र भविष्यात होणाऱ्या त्रासापेक्षा या सवयी नियंत्रणात आणणे केव्हाही योग्यच नाही का?