आपट्याच्या झाडाची माहिती व गुणधर्म

आपटा हा एक अरण्यवृक्ष असून याची झाडे सहसा जंगलातच पाहावयास मिळतात. आपट्याच्या झाडाची पाने ही कांचन अथवा मंदाराच्या पानांसारखी असतात मात्र आपट्याची पाने अधिक जाड व मोठी असतात.

आपट्याच्या झाडाची माहिती व गुणधर्म

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

दसऱ्याच्या सणाला आपल्याकडे सोने वाटण्याची परंपरा आहे. सोन्याचे प्रतीक म्हणून आपण ज्या झाडाची पाने वाटतो ते झाड म्हणजे आपटा. आपट्याच्या झाडास संस्कृत भाषेत अश्मन्तक असे नाव आहे.

आपटा हा एक अरण्यवृक्ष असून याची झाडे सहसा जंगलातच पाहावयास मिळतात. आपट्याच्या झाडाची पाने ही कांचन अथवा मंदाराच्या पानांसारखी असतात मात्र आपट्याची पाने अधिक जाड व मोठी असतात.

आपट्याच्या लाकडाचा उपयोग सहसा जळणासाठीच केला जातो मात्र आपट्याच्या पानांचा उपयोग हा अनेक कारणांसाठी केला जातो. दसऱ्यास सोने म्हणून आपट्याचे पान देण्याची परंपरा खूप जुनी आहे याशिवाय तंबाखूची विडी तयार करताना आपट्याचे पान वापरले जाते. 

आपटा हा तुरट, आंबट, शीतल व ग्राहक प्रकृतीचा असून वात, पित्त, कफ, मेह, दाह, तृषा, विषरोग, वांती, गंडमाला, व्रण, विषमज्वर, कंठरोग, रक्तविकार, गालगुंड व अतिसार इत्यादी विकारांवर गुणकारी आहे.

आपट्याच्या झाडास लांबट शेंगा सुद्धा येतात त्या तुरट, शीतल, ग्राहक, स्वादु, रुक्ष, गुरु, दोषद्रावक, मालरोधक, आध्मानकारक असून कफ आणि वायू यांच्यावर गुणकारी असतात. 

पूर्वी तोड्याच्या बंदुका वापरात असत तेव्हा त्यांचे तोडे तयार करण्यासाठी आपट्याच्या अंतर्सालीचा वापर केला जात असे यासाठी प्रथम या साली शिजवून मग त्या वाळवून त्यांचा कूट करून तोडे तयार केले जात असत. मजबूत व टिकाऊ असे दोर तयार करण्यासाठी सुद्धा आपट्याच्या सालीचा उपयोग केला जात असे.

आजारपणात डोके दुखत असल्यास आपट्याची पाने वाटून त्याचा लेप कपाळाला लावल्यास आराम मिळतो याशिवाय आपट्याच्या पानांचा कल्प दुधासोबत घेतल्यास सुजेवर परिणामकारक ठरतो.

वातगुल्म व शूळाचा त्रास होत असल्यास आपट्याच्या पाल्याच्या रसात मिऱ्यांची पूड व तिळाचे तेल ७ थेंब घालून दिल्यास फरक पडतो. आपट्याचे असे अनेक औषधी उपयोग आहेत म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने देऊन आपट्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.