मिठाचे फायदे व महत्व

मिठाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्यामुळे शरीरात जंतांचा उपद्रव होत नाही त्यामुळे माणूस रोगांना बळी पडत नाही.

मिठाचे फायदे व महत्व

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मीठ हा मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त व आवश्यक असा पदार्थ. अनेक चित्रपटांत "मैने आपका नमक खाया हैं" असे संवाद अथवा "नमक हलाल" "नमक हराम" "खाल्ल्या मिठास जागणे" अशा अनेक म्हणी सुद्धा आहेत. याचे कारण म्हणजे मीठ हा अन्नास फक्त चव देण्याचेच काम करत नसून मिठाशिवाय मनुष्याचे आरोग्य रक्षणच होऊ शकणार नाही. 

फार पूर्वी हॉलंड या देशात कैद्यांनां मीठ नसलेली भाकर देण्याची प्रथा होती. ऐकून तर सामान्य वाटेल मात्र कैद्यांना मीठ न मिळाल्याने त्यांना जंतुसंसर्ग होऊन काही काळातच त्यांचा मृत्यू होत असे म्हणून मिठाशिवाय अन्न म्हणजे जंतुसंसर्गास निमंत्रण हे लक्षात घेतले पाहिजे. मनुष्य दीर्घायुषी व सुदृढ होण्यासाठीही योग्य प्रमाणात मीठ अन्नात असणे गरजेचे आहे.

मिठाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्यामुळे शरीरात जंतांचा उपद्रव होत नाही त्यामुळे माणूस रोगांना बळी पडत नाही. लहान मुलांना जंत झाल्यावर पाण्यात थोडे मीठ टाकून देण्याची पद्धत आहे ज्यामुळे जंत मरून जातात. मिठाच्या या गुणधर्मामुळेच त्यास मनुष्याच्या अन्नात सर्वात वरचा दर्जा देण्यात आला आहे.

मीठ हा मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क मानला गेला आहे व मीठ हा पदार्थ कायमच करमुक्त राहिला आहे. ब्रिटिश काळात मिठावर कर लावून गोरगरिबांना संपवण्याचा कट करण्यात आला त्यावेळी संपूर्ण भारताने या अन्यायाविरोधात सत्याग्रह उभारला होता. 

अन्नाचे नीट पचन होण्यासाठी सुद्धा मीठ आवश्यक असते. माणसाला वर्षास कमीत कमी ९ किलो मिठाची आवश्यकता असते. माणूस बेशुद्ध झाला असता त्याला मीठ आणि पाणी पाजल्यास त्यास शुद्ध येते. कफ झाल्यास गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास कफ बाहेर पडून घशास अराम पडतो. उलटी काढायची असल्यासही पाण्यात मीठ दिल्यास उलटी बाहेर पडते. अतिरिक्त मद्यपानाने जो हँग ओव्हर होतो त्यासाठी गरम पाण्यात मीठ घालून थोडे थोडे प्यायल्यास शरीरातील हानिकारक द्रव्य बाहेर पडून आराम मिळतो.

पोटात दुखत असल्यास ग्लासभर पाण्यात चमचाभर मीठ घालून ते प्यायल्यास पोटदुखी कमी होते. डोळ्याला सूज आल्यास मीठ मिश्रित गरम पाण्याने ते धुवावेत म्हणजे सूज निघून जाते तसेच मीठ आणि पाणी एकत्रित करून त्याने डोळे धुतले असता केस गळती सुद्धा कमी होते असे शास्त्र सांगते. तर असे हे मीठ म्हणजे मनुष्यासाठी एक वरदानच आहे.