बर्मुडा ट्रँगल - एक रहस्य

पृथ्वीवरील असेच एक गूढ म्हणजे बर्मुडा ट्रँगल. चार महासागरांपैकी एक असलेल्या अटलांटिक महासागरात हे गूढ आश्चर्य आहे. अटलांटिक महासागराच्या पश्चिम दिशेस एक त्रिभुज अथवा त्रिकोणी भाग आहे त्यामुळे यास बर्मुडा ट्रँगल असे म्हणतात.

बर्मुडा ट्रँगल - एक रहस्य
बर्मुडा ट्रँगल

मनुष्य विज्ञानाच्या साहाय्याने अंतराळात अनेक शोध लावण्याचा प्रयत्न करत असतो मात्र आपल्या पृथ्वीवरच अशी काही ठिकाणे आहेत ज्यांचा शोध घेणे अजून कुणालाही जमलेले नाही. जिथे शोध थांबतात तिथे निष्कर्ष सुरु होतात. 

आपली पृथ्वी हा मुळात जलग्रह कारण तिचा ७० टक्क्यांहून अधिक भाग हा पाण्याने व्यापला आहे. उरलेल्या ३० टक्के जमिनीवर भूचर प्राणी राहतात. १९६९ साली मानव पहिल्यांदा चंद्रावर पोहोचला मात्र पृथ्वीच्या सर्वाधिक खोल भागापर्यंत जाणे त्यास अजूनही शक्य झालेले नाही.

पृथ्वीवरील असेच एक गूढ म्हणजे बर्मुडा ट्रँगल. चार महासागरांपैकी एक असलेल्या अटलांटिक महासागरात हे गूढ आश्चर्य आहे. अटलांटिक महासागराच्या पश्चिम दिशेस एक त्रिभुज अथवा त्रिकोणी भाग आहे त्यामुळे यास बर्मुडा ट्रँगल असे म्हणतात.

अटलांटिक महासागरातील बर्मुडा, बहामाच्या पुढे पोर्टोरिको आणि फ्लोरिडा यांच्या दरम्यान असलेल्या या प्रदेशात गेली कित्येक वर्षे अशा काही चित्र विचित्र गोष्टी घडल्या ज्यांचे कारण शेवटपर्यंत कुणालाही समजले नाही. या परिसरातून जाणारी शेकडो जहाजे, पाणबुड्या व विमाने याच ठिकाणी अशी गुप्त झाली ज्यांचे अवशेषही कधी मिळाले नाहीत.

साधारणतः एख्यादा ठिकाणी अपघात झाला तर अपघाताचे अवशेष अर्थात विमान किंवा जहाजाचे तुकडे, काहीतरी सामान अथवा मृत शरीरे असे काहीतरी सापडते पण या ठिकाणी जसे काही कुणाच्या तरी पोटात गडप झाल्यासारखी विमाने, जहाजे व माणसे गायब होत असत.

बर्मुडा ट्रँगल वर होणाऱ्या या अपघातांविषयी अनेक तज्ज्ञांनी आपले निष्कर्ष मांडण्याचे प्रयत्न केले जे पुढील प्रमाणे होते. 

१. आपल्या पृथ्वीशिवाय इतर अनेक ग्रह अस्तित्वात आहेत ज्यांवर जीवसृष्टी अस्तित्वात असावी. पृथीवरील मानवजात आता नष्ट होण्याच्या मार्गवर असल्याने या परग्रहांवरील लोकच आपल्याकडील माणसे अगदी जहाजे व विमानांसोबत या ठिकाणाहून उचलून आपल्या ग्रहावर घेऊन जातात व तेथे संग्रहित करतात.

२. या भागात लाटांची उंची कधी कधी २०० फूट एवढी प्रचंड उंच असते कदाचित या अचानक उदभवणाऱ्या अजस्त्र लाटा या परिसरातील विमाने अथवा जहाजांवर आदळून ती समुद्रदोस्त होत असावीत. 

३. पृथ्वीवर सुमारे ७० टक्क्याहून जास्त असलेल्या व ज्याची खोली समजलेली नाही अशा महासागराच्या अंतर्भागात काही अजस्त्र प्राणी निवास करत असतील व हे प्राणीच या जहाजांना व विमानांना गिळंकृत करत असावेत.

४. या ठिकाणी पाण्याचे दोन प्रवाह एकमेकांच्या दिशेने वाहत येऊन आदळत असतील व या प्रवाहांची उष्णता वेगवेगळी असल्याने परिसरात प्रचंड चुंबकत्व असलेले भोवरे तयार होत असतील आणि चुंबकीय क्षेत्र तयार झाल्यामुळे जहाजांवरील अथवा विमानावरील यंत्रणा बिघडून दिशा चुकत असाव्यात आणि गुरुत्वाकर्षण बदलामुळे ही जहाजे अथवा विमाने एकतर समुद्रात खेचली जात असावीत अथवा आकाशात फेकली जात असावीत.

५. या परिसराच्या कचाट्यातून बचावलेल्या लोकांना येथे उडत्या तबकड्यांचे दर्शन झाले आहे. अनेक शास्त्रज्ञांना हे मानवी मनाचे भास वाटतात याशिवाय या परिसरातील अनियमित वातावरण काही भास निर्माण करू शकतात त्यामुळे अशी विचित्र दृश्ये येथे दिसून येतात असेही म्हटले जाते.

६. ब्लु होल म्हणजे समुद्रात असलेले खूप खोल खड्डे, या खड्ड्यांचा तळ ठाऊक नसतो व खूप खोल असल्याने ती निळीशार दिसतात. अशा ब्लु होल्स मध्ये समुद्राच्या भरती ओहोटीनुसार भोवरे तयार होतात जर एखादे जहाज व विमान चुकून या ब्लु होल च्या वर आले तर ते सरळ खेचले जाऊन तळाशी जाऊन पोहोचते.

बर्मुडा ट्रँगल मधील सर्वात गूढ भाग म्हणजे सर्गासो नावाचा समुद्र आहे. असे म्हणतात की या ठिकाणी पूर्वी एक अटलांटिस नावाचा एक खंड होता मात्र अचानक प्रलय येऊन तो समुद्रामध्ये गुप्त झाला. या खंडावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व झाडे होती यापैकी सर्गासम नामक वनस्पती येथे विपुल प्रमाणात मिळायची म्हणून खंडाचे नाव पडले सर्गासो. आजही या परिसरात पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती दिसून येतात ज्या खाली गुप्त झालेल्या खंडाचा भाग असाव्यात असे म्हटले जाते.

या सर्गासो परिसरात बर्मुडा ट्रँगल मध्ये बुडालेली अनेक जहाजे व विमाने आहेत. अगदी काही हजारात यांची उपस्थिती तिथे आहे कारण बर्मुडा त्रिकोणात हा जहाजे गायब होण्याचा इतिहास काही शेकडा नव्हे तर काही हजार वर्षांपासून आहे. त्यामुळे जर शोध घेतला तर कमीत कमी २००० वर्षांपूर्वीची जहाजे कशी होती हे सुद्धा समजून येईल.

तर असे आहे बर्मुडा ट्रँगल पुराण, काही चिकित्सक असे म्हणू शकतात की इतकी प्रगती आपण केली आहे तर एखादी मशीन जशी आपण परग्रहावर पाठवू शकतो तशी समुद्राच्या तळाशी पाठवून तिला लावलेल्या कॅमेऱ्यांद्वारे त्या जागेचे छायाचित्रीकरण का करू शकत नाही. पण हिच तर गंमत आहे, निसर्गाने सर्वच सोपे करून दिले तर मानवजात समुद्रतळाशीही आपली मालमत्ता खरेदी करायला मागेपुढे पाहणार नाही. समुद्रात जसजसे खाली जाऊ तसतसा पाण्याचा दबाव प्रचंड वाढतो अशावेळी कुठलीच वस्तू तिथले तग धरू शकत नाही त्यामुळे मशीन खाली गेल्यावर पाण्याच्या दाबाने तिचे लाखो तुकडे होतील हे निश्चित.

गेल्या वर्षांपासून संपूर्ण जग एका संकटास सामोरे जात आहे. अशी अनेक संकटे खरं तर पृथीच्या व आसमंताच्या आवरणात प्रचंड प्रमाणात आहेत मात्र निसर्ग कायम आपले त्यापासून रक्षण करत असतो. अर्थात आपण स्वतःहून त्या संकटाना निमंत्रण दिले तर निसर्गही काही करू शकत नाही. त्यामुळे निसर्गाप्रती आदर ठेवून मानवी प्रगती साधली तर भविष्यातही अनेक संकटाना तोंड देण्याचे बळ मानवास मिळेल नाही का?

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा