समुद्राचे पाणी खारट का असते?

विशेष म्हणजे भूमध्यरेषेपेक्षा पृथ्वीच्या ध्रुवांजवळच्या समुद्राचे पाणी हे जास्त खारट असल्याचे आढळून आले आहे याशिवाय समुद्राच्या तळापेक्षा वरील भागातील पाणी हे कमी प्रमाणात क्षारयुक्त असते.

समुद्राचे पाणी खारट का असते?
समुद्राचे पाणी खारट का असते?

पृथ्वी हा मुळात एक जलग्रह आहे कारण पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवन आहे. पृथ्वी ही सुमारे ७१ टक्के पाण्यानेच व्यापली असून पृथ्वीच्या एकूण आकाराच्या दोन तृतीयांश भाग हा पाण्यानेच व्यापला आहे. पृथ्वीवरील पाण्याचे साठे हे प्रामुख्याने समुद्र, नद्या, जलाशये इत्यादी स्वरूपांत अस्तित्वात आहेत मात्र पाण्याचा सर्वाधिक साठा हा समुद्रात असतो. मात्र समुद्रास जी मुख्य गोष्ट इतर पाण्याच्या साठ्यांपासून वेगळी करते ती म्हणजे समुद्राचे खारट पाणी.

समुद्राचे पाणी खारट असण्याचे प्रमुख कारण म्हणजे या पाण्यात असलेल्या क्षाराचे अधिक प्रमाण आहे हे आपण जाणून आहोतच मात्र समुद्रातही क्षाराचे प्रमाण हे सर्वत्र एकसारखे नसून वेगवेगळ्या प्रमाणात आहे. उदाहरणार्थ अटलांटिक महासागराचे पाणी हे भूमध्य सागराच्या पाण्याहून कमी प्रमाणात खारट आहे. पृथ्वीवरील सर्वात खारट पाण्याचा समुद्र म्हणजे मृत समुद्र हा आहे कारण अन्य कुठल्याच समुद्रात क्षार नसेल तेवढे मृत समुद्रात आहे त्यामुळे या समुद्रात जीवसृष्टी ही अस्तित्वातच नाही. मृत समुद्राचा खारटपणा तपासण्यासाठी फार पूर्वी एक प्रयोग करण्यात आला त्यामध्ये या समुद्राच्या एक ग्यालन पाण्यापासून तब्बल दोन पौंड मीठ निघाले यावरून मृत समुद्र किती खारट आहे हे आपल्या लक्षात येईल.

मृत समुद्राव्यतिरिक्त सॉल्ट सरोवर आणि युरुमानिया ही सरोवरे खारट पाण्याचे साठे म्हणून प्रसिद्ध आहेत व यांच्या खारेपणामुळे यातील पाण्यास अधिक घनत्व प्राप्त होते व त्यामुळे या पाण्यात मनुष्य आरामात तरंगू शकतो.

विशेष म्हणजे भूमध्यरेषेपेक्षा पृथ्वीच्या ध्रुवांजवळच्या समुद्राचे पाणी हे जास्त खारट असल्याचे आढळून आले आहे याशिवाय समुद्राच्या तळापेक्षा वरील भागातील पाणी हे कमी प्रमाणात क्षारयुक्त असते. समुद्राचा खारटपणा हा त्यांना मिळणाऱ्या मोठ्या नद्यांच्या मुखाजवळ तुलनेत कमी असतो.

समुद्राच्या खारट पणाविषयी आपण जाणून घेतलेच मात्र समुद्राच्या या खारटपणाचा फायदा आहे का हा प्रश्न पडल्यास त्याचे उत्तर होय असेच द्यावे लागेल. समुद्राच्या खारटपणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समुद्राचे पाणी जर गोड असते तर या पाण्याचा वापर पिण्यासाठी अथवा शेती, उद्योग इत्यादी अनेक कारणांसाठी अनिर्बंधपणे करून हे साठे सुद्धा संपवण्यास मानवजातीने मागेपुढे पहिले नसते. तसेच समुद्राचे पाणी खारट असल्याने त्याची घनता वाढते व त्यावर जहाजे तरंगणे अधिक सोपे होते. 

समुद्रात प्रवाह निर्माण होण्यासही हे क्षार कारणीभूत असतात व या प्रवाहांमुळे पाणी स्थिर न राहता सतत प्रवाही राहून ते साफ राहते कारण ज्या ठिकाणी पाणी स्थिर असते ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.

समुद्राचे पाणी खारट असण्याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे हे खारट पाणी उत्तम शोधक व मलनाशक असल्याने समुद्राच्या पाण्यात कितीही घटक रसायने सोडली तरी त्याचा अपाय होऊन पाणी खराब होत नाही. ज्यावेळी समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन आकाशात जाते त्यावेळी त्या वाफेसोबत काही प्रमाणात क्षारही जाते व ज्यावेळी ही वाफ पावसाच्या रूपात पुन्हा पृथ्वीवर पडते त्यावेळी हे क्षारयुक्त पाणी जमिनीस स्वच्छ करते आणि जमिनीत शिरून जमिनीतील क्षार सोबत घेऊन पुन्हा एकदा समुद्रास जाऊन मिळते.

मीठ हे उत्तम जंतुनाशक मानले गेले आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात जो खारा वारा वाहतो त्यायोगे हवेतील विषारी जंतू नाहीसे होतात व अनेक रोगांवरही ही हवा गुणकारी मानली गेली आहे त्यामुळे पूर्वी अंगी आजार असल्यास हवापालट करण्यासाठी समुद्र किनारी जाण्याची प्रथा होती व समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशातील हवेच्या ओलाव्यात क्षाराचे प्रमाण असल्याने आजारी माणसास लवकर आराम मिळत असे.