ईस्टर बेटावरील भव्य मानवाकृती पुतळे
ईस्टर बेटावरील या पुतळ्यांना मोआई (Moai) असे नाव असून या पुतळ्यांच्या निर्मितीचे कारण आजही एक गूढच बनून राहिले आहे.

आपले जग हे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आश्चर्यांनी समृद्ध आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात एकाहून एक अशी आश्चर्ये पाहावयास मिळतात व ही आश्चर्ये अश्मयुगीन प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा कालावधीतील असली तरी काही आश्चर्यांचा उलगडा होणे आजही फारसे शक्य झालेले नाही.
जगातील अशा अनेक आश्चर्यांपैकी एक आश्चर्य ईस्टर या बेटावर आहे. ईस्टर हे बेट दक्षिण पूर्व पॅसिफिक महासागरातील एक बेट असून सध्या या बेटाचा समावेश चिली या दक्षिण अमेरिकेतील देशात होतो.
ईस्टर आयलंड हे बेट आकाराने लहान असून त्याचे क्षेत्रफळ १६३ चौरस किलोमीटर असून या बेटाची लोकसंख्या अदमासे ५००० च्या घरात आहे.
याच ईस्टर बेटावर काही आश्चर्यजनक गोष्टी पाहावयास मिळतात यांचा उलगडा आजही होऊ शकलेला नाही व त्या गोष्टी म्हणजे या बेटावर असलेले भव्य मानवाकृती पुतळे. हे पुतळे संख्येने एक दोन नसून तब्बल ९०० असून बेटाच्या चोहो दिशांस विखुरलेले आहेत.
या पुतळ्यांचा शोध सर्वप्रथम अठराव्या शतकातील जगाची मुशाफिरी करणाऱ्या कॅप्टन कुक याने लावला. ज्यावेळी कॅप्टन कुक याने दक्षिण प्रशांत महासागरातील अनेक बेटांचा शोध घेताना त्याच्या नजरेस हे बेट पडले आणि याचवेळी त्यास हे अद्भुत पुतळे दिसून आले.
हे पुतळे भव्य पाषाणात निर्माण करण्यात आले असून मानवी मुंडके आणि खाली हात आणि कंबरेखालचा भाग नसलेले धड अशी या पुतळ्यांची रचना असून सर्वच पुतळे एकाच पद्धतीचे आहेत. या पुतळ्यांमधील सर्वात उंच पुतळा हा दहा मीटर असून पुतळ्यांचे सरासरी वजन ८२ टन एवढे आहे.
या पुतळ्यांना मोआई (Moai) असे नाव असून या पुतळ्यांच्या निर्मितीचे कारण आजही एक गूढच बनून राहिले आहे. एखाद्या संस्कृतीची माहिती मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे तेथील लोककथा शोधणे हा असतो आणि त्याकाळातील संशोधकांनी तेथील नागरिकांकडून या पुतळ्यांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केले असता जी माहिती प्राप्त झाली ती चित्तवेधक आहे.
असे म्हणतात की फार पूर्वी म्हणजे इसवी सनाच्या दहाव्या ते तेराव्या शतकात कधीतरी या बेटावर एक प्रख्यात शिल्पकार राहत होता आणि त्यास जादूची कला सुद्धा अवगत होती. या शिल्पकाराने आपल्या दगडी अवजारांनी ही भलीमोठी शिल्पे निर्माण केली आणि आपल्या जादूच्या शक्तीने या पुतळ्यांमध्ये प्राण ओतले.
हे सर्व भव्य पुतळे म्हणजे त्या शिल्पकाराचे सैन्यच बनले होते आणि शिल्पकाराची प्रत्येक आज्ञा ते पाळत. शिल्पकाराने त्यांना चालायची आज्ञा केल्यास ते पुतळे चालू लागत मात्र जर चालता चालता यातील एखादा पुतळा खाली कोसळला तर वजनामुळे त्यास पुन्हा उठणे शक्य होत नसे. त्या शिल्पकाराने या पुतळ्यांकडे या बेटाचे रक्षण करण्याचे आणि चौफेर पहारा करण्याचे मोठे कार्य सोपवले असे म्हणतात.
ईस्टर बेटावर या पुतळ्यांची संख्या ९०० असून प्रत्येक पुतळ्यास एक नाव देण्यात आले होते. त्या शिल्पकारास त्या काळी खूप मान होता व त्याच्या मृत्यूनंतर बेटावरील जनतेने या पुतळ्यांची पूजा करणे सुरु केले. यातील काही पुतळ्यांच्या डोक्यावर टोप्या सुद्धा दिसून येतात.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या बेटावर पेरू देशाने हल्ला केला आणि येथील अनेक नागरिकांना बंदी बनवून नेले त्यामुळे या देशाची लोकसंख्या कमी झाली. पूर्वी या पुतळ्यांची पूजा होत असली तरी आधुनिक काळात मात्र हे पुतळे फक्त बेटाचे वैभव म्हणून या ठिकाणी उभे आहेत आणि जगभरातून पर्यटक हे मानवनिर्मित आश्चर्य पाहण्यास ईस्टर बेटास भेट देत असतात.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |