मोती कसा तयार होतो

रत्नांच्या बाबत सर्वांना पडलेला एक मोठा प्रश्न म्हणजे ही रत्ने कुठे व कशी निर्माण होतात व अर्थात हा प्रश्न मोत्याच्या बाबतीतही असतोच त्यामुळे या लेखात आपण मोती कसा निर्माण होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

मोती कसा तयार होतो

पृथ्वीवर जी अमूल्य खनिज संपत्ती आहे त्यामध्ये रत्नांचे महत्व खूप आहे. रत्ने ही मौल्यवान खनिजसंपत्तीपैकी एक मानली जातात. सद्यस्थितीस जगात एकूण नऊ रत्ने आहेत व ती म्हणजे मोती, पोवळे, लसण्या, पुष्कराज, गोमेद, माणिक, हिरा, पाचू आणि नीलम. या रत्नांची किंमत त्यांच्या उपलब्धतेनुसार कमी जास्त होत असली तरी ही सर्व रत्ने आभूषण म्हणून प्राचीन काळापासून वापरली जात आहेत. रत्नांचे महत्व आभूषणांसहित ज्योतिषशास्त्रातही खूप असून ज्योतिषशास्त्रात जे नऊ ग्रह मुख्य आहेत त्यांचे प्रतिनिधित्व ही नऊ रत्ने करतात.

अशा या नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे मोती. मोती रत्न अनेक आभूषण अथवा दागिन्यांमध्ये वापरला जातो आणि ज्योतिषशास्त्रात यास चंद्राचे रत्न मानले गेल्याने चंद्रबल वाढवण्यासाठी अथवा संतुलित करण्यासाठी अनेक जण मोत्यास अंगठीमध्ये परिधान करतात. मोती हे एक शीतल रत्न मानले जाते त्यामुळे आरोग्यशास्त्रातही यास बरेच महत्व आहे.

रत्नांच्या बाबत सर्वांना पडलेला एक मोठा प्रश्न म्हणजे ही रत्ने कुठे व कशी निर्माण होतात व अर्थात हा प्रश्न मोत्याच्या बाबतीतही असतोच त्यामुळे या लेखात आपण मोती कसा निर्माण होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

मोती मुळात खनिज नसून तो एका प्राण्यांपासून निर्माण होती व तो प्राणी म्हणजे शिंपले. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वच शिंपल्यांपासून मोती तयार होत नसून एका विशिष्ट प्रजातीच्या शिंपल्यांपासूनच मोती तयार होतो व हे शिंपले प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील समुद्रात बहुतांशी आढळतात.

ज्या शिंपल्यांत मोती तयार होतात ते शिंपले मोत्याचे शिंपले म्हणूनच ओळखले जातात आणि यांचे वैशिट्य म्हणजे शिंपल्यांच्या आत जो जीव असतो तो खूपच मृदू व नाजूक असतो व त्यामुळे त्याचे जे आवरण म्हणजे शिंपले जर कठीण असेल तर ते त्यास टोचते आणि त्यास त्रास होतो व यावेळी तो जीव आपल्या शरीरातून एक रस बाहेर स्त्रवतो आणि आपल्या आजूबाजूस वंगणासारखा पसरवतो जेणेकरून त्यास शिंपल्याचे कवच बोचत नाही.

अर्थात हा रस म्हणजे मोत्याची जननी असला तरी फक्त या रसामुळेच मोती तयार होत नाहीत तर यासाठी काही प्रक्रिया व्हाव्या लागतात. कधीकधी समुद्रात वास्तव्य करणाऱ्या या शिंपल्यांच्या कवचात वाळू शिरते आणि त्यामुळे आतील जीवास ती टोचते आणि त्यामुळे तो जीव आपल्या शरीरातून रस काढून त्या वाळूच्या कणास व्यापू लागतो आणि या प्रक्रियेमुळे त्या कणाभोवती रसाचा एक मोठा थर तयार होतो आणि यानंतर या कणांपासून मोती तयार होतो.

ही झाली मोती तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया पण ज्यावेळी मनुष्यास मोत्यांचे महत्व समजले त्यावेळी त्यांनी कृत्रिम पद्धतीने मोती तयार करण्यास सुरुवात केली व हल्ली जशी प्राण्यांची शेती होते त्याप्रमाणे मोत्यांच्या शिंपल्यांची शेती सुद्धा सुरु झाली. कृत्रिमरीत्या मोती तयार करण्यासाठी प्रथम हे शिंपले जमा करून त्यांचे संगोपन करावे लागते आणि नंतर कृत्रिमरीत्या त्यांच्या शरीरात वाळू अथवा तत्सम पदार्थ ठेवून त्यांच्याद्वारे द्रवाचा स्त्राव निर्माण करावा लागतो आणि अशाप्रकारे या स्रावाद्वारे मोती तयार केले जात. नैसर्गिक रित्या होणाऱ्या मोत्यापेक्षा कृत्रिम रित्या मोती तयार केल्याने मोत्यांचे उद्पादन सुद्धा विपुल प्रमाणात होऊ लागले व पाहता पाहता ज्या प्रदेशात मोती तयार होतात त्या प्रदेशातील अनेकांना रोजगार प्राप्त झाला.

तर् ही होती मोती कसा तयार होती याची माहिती. आधुनिक काळात मोती तयार करण्याचे तंत्रज्ञान कित्येक पटीने पुढे गेले आहे मात्र एका प्राण्याच्या स्रावातून एक रत्न सुद्धा निर्माण होऊ शकते हा खरोखरच निसर्गाचा एक चमत्कार मानायला हवा.