गांधारी - कौरवांची माता

गांधारी ही बालपणापासून रुद्रभक्त होती व तिने रुद्राची आराधना केली असता रुद्राने तीस शंभर पुत्र होती असा वर दिला होता.

गांधारी - कौरवांची माता

महाभारत या भारतीय इतिहास ग्रंथातील कौरवांची माता म्हणून गांधारी प्रसिद्ध आहे. प्राचीन भारतवर्षात गांधार नामक एक देश होता तूर्तास त्यास कंदाहार म्हणून ओळखले जाते त्या गांधार देशाचा राजा सुबल याची गांधारी ही कन्या.

गांधारी ही बालपणापासून रुद्रभक्त होती व तिने रुद्राची आराधना केली असता रुद्राने तीस शंभर पुत्र होती असा वर दिला होता. विवाहयोग्य झाल्यावर गांधारीचे लग्न कुरुवंशाचा राजा धृतराष्ट्र याच्यासोबत झाले व तिने यानंतर एक पतिनिष्ठ पतिव्रता अशी आपली ओळख निर्माण केली. पती धृतराष्ट्र अंध असल्याने त्याला जर सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेता येत नसेल तर तो आपणही का घ्यावा आणि पतीशिवाय इतर कुठल्याही पुरुषाचा चेहराही पाहणार नाही असा निश्चय तिने केला व स्वतःच्या डोळ्यांना पट्टी बांधून तिने या व्रताचे आचरण केले.

लग्नापूर्वी रुद्रदेवतेने जो वर दिला होता त्यानुसार तिला धृतराष्ट्रापासून गर्भ उत्पन्न झाला मात्र या गर्भ एका पुत्राचा नसून तब्बल शंभर पुत्रांचा होता त्यामुळे हा बाळंतकाळ पूर्ण होण्यास अनेक दिवस लागत होते याचवेळी धृतराष्ट्राचा बंधू पंडू याची पत्नी कुंती हिस युधिष्ठिर हा पुत्र प्राप्त झाल्याने गांधारीच्या चिंतेत मोठी भर पडली कारण आपला पुत्र ज्येष्ठ असावा अशी तिची इच्छा होती.

उद्वेगाने गांधारीने आपला गर्भ बाहेर काढण्याचा प्रयत्न होता मात्र गर्भातील अर्भकांची पूर्ण वाढ झाली नसल्याने हे शंभरही पुत्र मृतावस्थेत जन्मास आले आणि गांधारी शोक करू लागली. गांधारीस शोक करताना पाहून महर्षी व्यास तेथे प्रकट झाले आणि त्यांनी गांधारीस एक उपाय दिला व म्हणाले की शंभर धृतकुंभ आणून त्यामध्ये ही अर्भके ठेवून दे व ही धृतकुंभे गर्भाप्रमाणेच कार्य करून जेव्हा दिवस पूर्ण होतील तेव्हा हे सर्व पुत्र सजीव होऊन जन्म घेतील.

कालांतराने कुंभातून जे शंभर पुत्र झाले त्याचवेळी कुंतीस भीमसेन हा पुत्र झाला होता याचा अर्थ दुर्योधन व इतर कौरव हे भीमसेनाचे समवयस्क होते. गांधारीस दुःशाला नावाची एक कन्या सुद्धा असल्याचा उल्लेख महाभारतात येतो.

गांधारीच्या शंभर मुलांत दुर्योधन हा सर्वात ज्येष्ठ असून तो बालपणापासूनच पांडवांचा खूप द्वेष करीत असे. गांधारी जरी दुर्योधनावर खूप माया करीत असली तरी त्याचा पांडवद्वेष तिला पटत नसे आणि यापासून दुर्योधनास परावृत्त करण्याचा ती आटोकाट प्रयत्न करीत असे. 

काही केल्या दुर्योधनाचा पांडवांविषयी द्वेषभाव कमी न झाल्याने पुढे भारतीय युद्ध झाले व यावेळी युद्धात पांडवांची सरशी झाली आणि दुर्योधनाचे सर्व बंधू मारले गेले. आता कौरवांमध्ये फक्त दुर्योधन जिवंत असता गांधारीने आपल्या दिव्य दृष्टीने त्याचे शरीर वज्रासारखे कठीण बनवून त्याचे प्राणरक्षण करण्याचा विचार करून दुर्योधनास आपल्या भेटीस बोलावले. गांधारी यावेळी प्रथमच आपल्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी खोलणार होती आणि ज्यावेळी तिची दृष्टी तिच्या पुत्रावर पडणार होती त्यावेळी त्याच्यात वज्रासमान शक्ती येणार होती मात्र यासाठी दुर्योधनाने तिच्या समोर विना वस्त्र येणे गरजेचे होते कारण वस्त्र असल्यास ही दृष्टी त्याच्या वस्त्रांवर पडून त्याचे शरीर वज्रव्रत होऊ शकले नसते.

मातेने आज्ञा केल्यानुसार दुर्योधन गांधारीस भेटावयास निघाला त्यावेळी कृष्णाने त्याची भेट घेतली आणि दुर्योधन मातेच्या भेटीस वस्त्र न घालताच निघाला आहे हे पाहून त्यास रोकुन तू मातेस भेटण्यासाठी या अवस्थेत का जात आहेस असे विचारले. दुर्योधन म्हणाला की मातेनेच मला अशी आज्ञा केली आहे मात्र कृष्ण त्यास म्हणाला की तू पुत्र असलास तरी मातेच्या समोर अशा अवस्थेत जाणे योग्य नाही त्यामुळे तू किमान तुझ्या कमरेखालचा भाग तरी झाकून गांधारीसमोर जा. 

दुर्योधनास सुद्धा कृष्णाचा सल्ला पटला व त्याने वृक्षांच्या पानांचे वस्त्र कमरेस गुंडाळून गांधारीची भेट घेतली आणि ज्यावेळी गांधारीने आपली पट्टी खोलीत दुर्योधनावर दृष्टी टाकली त्यावेळी त्याच्या कमरेखालील भाग सोडून त्याचे बाकी सर्व शरीर वज्रमय झाले मात्र यांनतर गांधारीस कृष्णाने दुर्योधनास ही कल्पना दिली होती हे समजून तिचा खूप संताप झाला मात्र ही दिव्यदृष्टी एकदाच गांधारीस वापरता येणार असल्याने तिचा नाईलाज झाला होता.

यानंतर जेव्हा भीम व दुर्योधन यांच्यात गदायुद्ध झाले त्यावेळी दुर्योधनाच्या वज्रासमान अशा शरीरावर भीमाचे गदाप्रहार काम करीत नसताना कृष्णाने गदायुद्धाचे नियम डावलून भीमास दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करण्यास सांगितले आणि भीमाने द्रौपदी वस्रहरणावेळी दुर्योधनाच्या मांड्या फोडण्याची प्रतिज्ञा घेतली असल्याने भीमाने दुर्योधनाच्या मांड्यांवर प्रहार करून त्यास जखमी केले आणि काही दिवसांनी दुर्योधनाचाही मृत्यू झाला.

गांधारीस दुर्योधनासहित आपले सर्व पुत्र मारले गेल्याचे जेव्हा कळले त्यावेळी तिने उद्दिग्न होऊन कृष्णास शाप दिला की तुझ्या मदतीने आज माझ्या वंशाचा नाश झाला आजपासून छत्तीस वर्षांनी तुझ्या कुळाचा देखील असाच नाश होईल.  कृष्णाने देखील हे ऐकून गांधारीस वंदन केले आणि माझ्यासाठी हे इष्टच आहे असे म्हणून तिचा निरोप घेतला.

सर्व कौरव बंधू मृत्यू पावल्यावर धृतराष्ट्र आणि गांधारी एकटे पडले मात्र धर्मराज भीष्म याने दोघांनाही आपल्या राज्यात उत्तम सन्मान व वागणूक दिली मात्र भीमसेन अनेकदा आपल्या रागाच्या भारत धृतराष्ट्र आणि गांधारीस बोलून जात असे त्यामुळे अंध अशा धृतराष्ट्रास हस्तिनापुरात राहण्याची इच्छा राहिली नाही व यावेळी विदुर याने धृतराष्ट्रास वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि नंतर धृतराष्ट्र कुणासही न सांगता वानप्रस्थास निघून गेला.

धृतराष्ट्राने अरण्यगमन केल्याचे समजताच त्याच्या मागे गांधारी सुद्धा अरण्यात निघून गेली आणि तिच्या मागोमाग विदुर आणि कुंती सुद्धा वानप्रस्थास निघून गेले आणि अशा प्रकारे अरण्यात जीवन कंठीत असताना एके दिवशी धृतराष्ट्राचा मृत्यू झाला आणि यानंतर गांधारीनेही त्याच्यासहित आपले जीवितकार्य संपवले.