गुरु शिखर - अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर

अरवली पर्वतरांगेत जी प्रसिद्ध स्थळे आहेत त्यापैकी माऊंट आबू हे स्थळ अधिक प्रख्यात आहे व या माउंट अबू मध्ये अरवली पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे व या शिखरास गुरु शिखर या नावाने ओळखले जाते.

गुरु शिखर - अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतात ज्या विविध पर्वतरांगा आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध पर्वतरांग म्हणजे अरवली पर्वतरांग. अरवली पर्वतरांग ही भारताच्या राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यात पसरली असून या रांगेची सर्वोच्च उंची समुद्रसपाटीपासून १७२२ मीटर आहे. 

अरवली पर्वतरांगेत जी प्रसिद्ध स्थळे आहेत त्यापैकी माऊंट आबू हे स्थळ अधिक प्रख्यात आहे व या माउंट अबू मध्ये अरवली पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे व या शिखरास गुरु शिखर या नावाने ओळखले जाते.

माऊंट अबू हे आधुनिक नाव असले तरी या डोंगरास अबूचा पहाड असे मूळ नाव आहे. पुराणांत या पर्वताचे नाव अर्बुध असे आढळते आणि अर्बुधपुराण नावाचे पुराण सुद्धा या पर्वताच्या माहात्म्यावर रचले गेले आहे. ग्रीक साहित्यात या पहाडाचे वर्णन असून महाभारतात या पहाडाच्या उत्पत्तीची कथा वर्णित करण्यात आली आहे.

देऊळवाड्याहून अचलेश्वर येथे जाणाऱ्या रस्त्यावर उरीया नामक एक गावं आहे व या गावातून गुरुशिखराकडे जाणारा मार्ग आहे. उरीया या गावात कनखलेश्वराचे एक प्राचीन देवालय असून या मंदिरात एक शिलालेख आहे व या शिलालेखात मंदिराच्या उभारणीचा काळ सवंत १२६५ असा सांगितलं गेला आहे व मंदिराचा निर्माता म्हणून धारावर्ष याचे नाव नमूद करण्यात आले आहे.

उरिया येथून बरेच अंतर चढून गुरुशिखर गाठता येते व हा प्रवास थकवणारा असला तरी शिखरावर पोहोचल्यावर मात्र येथील आल्हाददायक वातावरणामुळे थकवा लगेच दूर होतो आणि दूरवर दिसणारा आसमंत पाहून मन प्रसन्न होते.

गुरुशिखरावर एक मंदिर असून या मंदिरात दत्त भृगु नामक तपस्वींच्या पादुका आहेत याशिवाय वैष्णव संप्रदायाचे प्रणेते रामानंद यांच्या पादुका सुद्धा या ठिकाणी आहेत. मंदिरासमोर एक घंटा असून तिच्यावर संवत १४६८ असे लिहिले आहे. 

हे स्थान अतिशय जागृत व शांत असल्याने देशभरातून अनेक साधू व साधक या ठिकाणी तपश्चर्या करण्यास येतात आणि या पहाडाच्या आसमंतातील गुहांमध्ये त्यांचे वास्तव्य असते.

गुरुशिखरावरून आसमंतातील परमारचा किल्ला, देऊळवाड्याची शिखरे, दऱ्याखोऱ्यातील गावे, अरवली रांगेतील अनेक शिखरे, मैदानी प्रदेश आणि इतर अनेक अद्भुत दृश्ये दिसून येतात. गुरुशिखर नावाप्रमाणेच अरवली पर्वतातील शिखरांचा गुरु आहे.