कीटक - एक लहान मात्र उपयुक्त जीव

जीवशास्त्राच्या वैज्ञानिकांनी कीटकांचे एकूण एक लाखाहून अधिक प्रकार आहेत असे सांगितले आहे.

कीटक - एक लहान मात्र उपयुक्त जीव

आपल्या भारत अनेक प्रकारचे कीटक पाहावयास मिळतात. कीटकांस आपण किडा असेही म्हणतो. कीटक म्हटल्यावर ते सहसा उपद्रवीच असतील असे अनेकांना वाटते मात्र प्राण्यांमध्ये सुद्धा जसे उपद्रवी प्राणी आहेत तसेच कीटकांमध्येही उपद्रवी कीटक आहेतच.

जीवशास्त्राच्या वैज्ञानिकांनी कीटकांचे एकूण एक लाखाहून अधिक प्रकार आहेत असे सांगितले आहे. कीटक म्हणजे प्राण्यांमधील अत्यंत लहान आकाराचे जीव व काही कीटक तर डोळ्यांनी दिसत सुद्धा नाहीत. कीटकांमध्ये जमिनीवरील, जमिनीखालील, पाण्यातील आणि उडणारे असे विविध प्रकार आहेत. 

कीटकांच्या शरीराचे बहुतांशी तीन प्रमुख भाग असतात म्हणजे त्यांचे डोके, उर आणि पोट हे तीन भागांत विभागलेले असते. कीटकांच्या डोक्यास स्पर्श श्रुंगे असतात ज्यावरून त्यांना स्पर्शाची अथवा वस्तूची जाणीव होते. ही स्पर्शशृंगे एखाद्या टॉवर सारखी कामे करतात.

कीटकांचे डोळे म्हणजे एक आश्चर्यच असते. काही कीटकांना एकच डोळा असतो तर काहींना दोन डोळे असतात मात्र या डोळ्यांमध्ये हजारो छोटे छोटे डोळे असतात ज्यांचा वापर करून कीटकांस चोहोबांजूस पाहणे शक्य होते.

कीटकांमध्ये जे असंख्य उपयोगी प्रकार आहेत त्यामध्ये मधमाशी, रेशीम कीडा आदींचा समावेश होतो. फुलपाखरासारखा दिसणारा पतंग हा सुद्धा एक कीटक असून त्यास अतिशय सुंदर असे पंख असतात. या पंखास असंख्य खवली असतात आणि त्यावर विविध रंग असतात आणि जर आपण या पंखावर हात फिरवला तर तो रंग आपल्या हातास लागतो.

मधमाशी हा कीटक तर मनुष्यास मध आणि मेण हे अतिशय उपयुक्त पदार्थ देतो. फुलांचा रस शोषण्यासाठी कीटकांना हत्तीच्या सोंडेसारखी एक छोटी सोंड असते. 

कीटकांची श्वास  घेण्याची यंत्रणा सुद्धा चमत्कारिक असून त्यांच्या शरीरात श्वास उश्वासः करण्यासाठी अनेक नलिका असतात. अनेक कीटकांना असंख्य पाय असतात.

मधमाशी आणि रेशीम किडा यांव्यतिरिक्त जे कीटक आहेत त्यांचाही पर्यावरणाचा समतोल राखण्यास उपयोग होतो कारण अनेक प्राणी, पक्षी आणि मासे यांचे प्रमुख भक्ष्य कीटक असतात. कित्येक किडे कुजलेले पदार्थ खात असल्याने ते पदार्थ सोडून त्यांच्यापासून दुर्गंध आणि रोग निर्माण होणे टळते. तेव्हा असा हा कीटक दिसायला लहान असला तरी उपयुक्ततेच्या बाबतीत महान आहे असे म्हणावे लागेल.