महाभारताचा काळ कोणता हे सांगणारा एक प्राचीन पुरावा

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाभारताच्या कालखंडाच्या शोधात महत्वाची भर घालणारा एक पुरावा एका ताम्रपटाच्या रूपात दक्षिण भारतात आढळला होता व तो पुरावा त्याकाळच्या म्हैसूर प्रांतातील एका ब्रिटिश कमिशनरला मिळाला.

महाभारताचा काळ कोणता हे सांगणारा एक प्राचीन पुरावा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतीय उपखंडातील अतिशय महत्वाचा उपन्यास म्हणजे महाभारत. महर्षी व्यासांनी हा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी लिहिला आणि हजारो वर्षे होऊनही या ग्रंथाची महानता कायम आहे कारण हा फक्त एक ग्रंथ नव्हे तर प्राचीन भारताचा इतिहास आहे व या इतिहासापासून अनेक बोध आजच्या युगातही घेतले जातात त्यामुळेच या ग्रंथावरून आजवर अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, नाटके, मालिका, चित्रपट, संगीत, लोककला निर्माण केल्या गेल्या आहेत व महाभारतातील अनेक नावे आजही भारतातील नद्या, गावे, नावे, पर्वत आदींना दिली गेली आहेत.

अशा या महाभारताचा काळ कोणता होता हा समस्त भारतीय आणि जागतिक संशोधकांच्या अभ्यासाचा विषय व या विषयावर आजवर अनेक शोध लावण्याचा प्रयत्न केला गेला व असंख्य शोधाअंती महाभारताचा कालावधी हा इसवी सन पूर्व तीन हजार वर्षे ढोबळमानाने मानला गेला आहे. याचा अर्थ आजपासून अदमासे पाच हजार वर्षांपूर्वी महाभारत घडले. प्राचीन साहित्यात महाभारत कधी घडले याविषयी विपुल प्रमाणात देण्यात आली आहे मात्र प्राचीन इतिहासाची इतर साधने म्हणजे शिलालेख अथवा ताम्रपट यांमधूनही महाभारताचा काळ शोधण्याचा प्रयत्न यापूर्वी केला गेला.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाभारताच्या कालखंडाच्या शोधात महत्वाची भर घालणारा एक पुरावा एका ताम्रपटाच्या रूपात दक्षिण भारतात आढळला होता व तो पुरावा त्याकाळच्या म्हैसूर प्रांतातील एका ब्रिटिश कमिशनरला मिळाला.

त्याकाळात ब्रिटिशांनी भारतातील इनामांची चौकशी करण्यासाठी इनाम कमिशनची स्थापना केली त्यावेळी ब्रिटिश भारतात जे विविध प्रांत होते त्यामधील विविध इनामांची चौकशी करण्याची जबाबदारी त्या त्या प्रांतातील इनाम कमिशनर कडे सोपवण्यात आली व त्यानुसार म्हैसूर प्रांतातील कमिशनरने त्या प्रांतातील इनामांची चौकशी सुरु केली.

चौकशी सुरु असताना त्यास हे इनाम कुणी व कधी व का दिले आहे याचा पुरावा म्हणून कागदपत्रे अथवा इतर दाखले दाखवावे लागत त्याचप्रकारे तेथील एका इनामदाराने कमिशनरला एक प्राचीन ताम्रपट दाखवला व या ताम्रपटात आमच्या इनामाची माहिती असल्याचे कमिशनरला सांगितले.

कमिशनरने मग त्या जुन्या ताम्रपटाचे लिप्यांतर करवून घेतले आणि त्या ताम्रपटाचा काळ कलियुगारंभाचे शके ११ एवढा जुना निघाला व या दरम्यान तो ताम्रपट ज्याच्याकडे होता त्याच्या घराण्यास सदर गाव इनाम मिळाला असल्याचे लिहिले होते. मात्र याच ताम्रपटात एक महत्वाची माहिती होती व त्यामध्ये पांडव कुळातील परीक्षित राजाचा काळ लिहिला गेला होता. परीक्षित हा अर्जुनाचा पुत्र व जनमेजयाचा वडील व या ताम्रपटात परीक्षिताचा काळ लिहिलेला असल्याने थेट महाभारताचा काळ शोधणे शक्य होणार होते.

यानंतर त्या ताम्रपटाचे वाचन करण्यात आले आणि यातून असे निष्पन्न झाले की हस्तिनापुरात परीक्षित राजाने जेव्हा यज्ञ केला त्यावेळी सूर्यग्रहण पर्वणी सुरु होती आणि दक्षिणेतून या वेळी एक ब्राह्मण हस्तिनापुरास आला होता त्यावेळी परीक्षिताने या ब्राह्मणास दक्षिण भारतातील एक गाव अग्रहार म्हणून दान केला.

या ताम्रपटात कलियुगारंभाचे अकरावे वर्ष होते व त्यानुसार आजपासून अदमासे पाच हजार शंभर (५१००) वर्षांपूर्वी परीक्षित राजा झाला आणि तो अर्जुनाचा पुत्र असल्याने महाभारत सुद्धा पाच हजार वर्षांपूर्वी घडल्याचे सिद्ध झाले.