महादजी शिंदे यांची छत्री - वानवडी
महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ पुण्यातील वानवडी येथे ही सुंदर समाधी बांधण्यात आली आहे जिला महादजी शिंदे यांची छत्री या नावाने ओळखले जाते.
आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
मराठेशाहीतील वीर मुसद्दी म्हणून महादजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. महादजी हे राणोजी शिंदे यांचे पुत्र. त्यांच्या आईचे नाव चिमाबाई असे होते. महादजी शिंदे यांनी आपल्या पराक्रमाने साक्षात दिल्लीच्या बादशहास सुद्धा मराठ्यांचे अंकित बनवले होते.
उत्तर भारतात आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याची शान उंचावून महादजी शिंदे १७९२ साली पुण्यास आले यावेळी पुण्यात त्यांचे अतिशय भव्य स्वागत झाले होते. याच काळात त्याना नवज्वराचा त्रास सुरु झाला व विश्रांतीसाठी ते वानवडी येथे राहिले होते मात्र या आजारपणात अनेक महिने जाऊनहीआजार काही बरा होऊ शकला नाही. या आजारपणातच अशक्तपणा येऊन १२ फेब्रुवारी १७९४ साली महादजी शिंदे यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी वानवडी येथे निधन झाले.
महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ पुण्यातील वानवडी येथे ही सुंदर समाधी बांधण्यात आली आहे जिला महादजी शिंदे यांची छत्री या नावाने ओळखले जाते. वानवडी हे पूर्वी पुण्यापासून तीन मैल अंतरावर असलेले गाव होते मात्र आता ते पुणे शहराचाच एक भाग झाले आहे.
वानवडी मध्ये बहिरोबांच्या ओढ्याच्या डाव्या बाजूस महादजी शिंदे यांची ही अभूतपूर्व छत्री उभारण्यात आली. महादजी शिंदे यांचे पुत्र दौलतराव शिंदे यांनी छत्रीचे बांधकाम १७९५ साली सुरु केले होते. यासंबंधी दौलतराव शिंदे यांनी छत्रीच्या बांधकामाच्या खर्चास एक गाव नेमून दिल्याचे पत्र उपलब्ध आहे ते पुढील प्रमाणे,
"दौलतराव शिंदे यांनी हुजूर विनंती केली की आपले तीर्थरूप कैलासवासी महादजी शिंदे यांचे छत्रीचे खर्चास एक गावं नेमून देवीला पाहिजे म्हणोन त्याज वरून मौजे उरली ता सांडस प्रा पुणे २०५० रुपये कमाल बेरजेचा मशारनिल्हेकडे छत्रीचे खर्चास करार करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली असे म्हणोन रामचंद्र नारायण यांचे नावे सनद"
१८२० साली महादजी शिंदे यांचे नातू व दौलतराव शिंदे यांचे पुत्र जनकोजी शिंदे यांनी छत्रीचे अपूर्ण राहिलेले काम हाती घेतले मात्र ते काम पूर्ण होण्यापूर्वीच १८४२ साली त्यांचे निधन झाले.
छत्रीचे सध्या दिसून येणारे बांधकाम हे श्रीमंत अलिजाबहादूर माधवराव शिंदे यांच्या काळात झाले असून आजही हे पाहण्यास दूरदूरहून लोक येत असतात. ब्रिटिशकालीन स्थापत्यशैलीचे अत्यंत उकृष्ट उदाहरण म्हणजे महादजी शिंदे यांची ही छत्री आहे.
छत्रीच्या भव्य सभागृहात नजर टाकली असता तत्कालीन वास्तुविशारदांचे कौशल्य पाहून आपण हरखून जातो. सभागृहात शिंदे घराण्यातील कर्तबगार राज्यकर्त्यांची चित्रे व छायाचित्रे आपल्याला पाहावयास मिळतात. छत्रीच्या गर्भगृहात रणधुरंधर महादजी शिंदे यांची मूर्ती असून समोर शिवलिंग आहे. पूर्वी छत्रीमध्ये झाफेनी या महादजी शिंदे यांच्या समकालीन चित्रकाराने काढलेले त्यांचे चित्र गाभाऱ्यात होते मात्र आता मूळ चित्र ग्वाल्हेर येथील शिंदे घराण्याच्या राजवाड्यात आहे.
या छत्रीचे बांधकाम एका मंदिरासारखे आहे व या बांधकामात भारतीय व ब्रिटिश वास्तुकला यांचे मिश्रण झालेले पाहावयास मिळते. महादजी शिंदे यांच्या छत्रीच्या भव्यतेचे व सुंदरतेची कल्पना शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे अशावेळी तिचे प्रत्यक्षात दर्शन घेऊन मराठेशाहीतील वीर मुसद्दी महादजी शिंदे यांच्या चरणी नतमस्तक व्हावे.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |