उपनयन संस्कार अर्थात मुंजीचे मंगलाष्टक

उपनयन संस्कार हा हिंदू धर्मातील संस्कारातील दहावा संस्कार आहे. हा संस्कार मानवी जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. या संस्कारातच मुलाच्या जीवनात भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यात येतो.

उपनयन संस्कार अर्थात मुंजीचे मंगलाष्टक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आधीं घ्यावे पार्वतीकुमराला ॥ विद्या देतो जो स्मरे त्या नराला ॥ देवाचें जो विघ्न तोही निवारी ॥ पायादेवो वामनो ब्रह्मचारी ॥ बटो सुमुहूर्त सावधान ॥ १ ॥
पायीं वाळे पैंजणालागिं शोभा ॥ गोपीमध्ये ठेंगणा कृष्ण ऊभा ॥ ऐसा त्यातें क्रीडवीती कुमारी ॥ पायादेवो वामनो ब्रह्मचारी ॥२॥
पहा हो हा बटु शोभतो साना ॥ वाळे नूपुरे दिसे गोजिरवाणा ॥ ऐसा त्यातें क्रीडवीती कुमारी ॥ पायादेवो वामनो ब्रह्मचारी ॥३॥
अनुपम्य बटोचे सुवदन साजे ॥ नानापरीचें बहु वाद्य वाजे ॥ ऐसा त्यातें क्रीडवीती कुमारी ॥ पायादेवो वामनो ब्रह्मचारी ॥४॥
नानापरि मिळाली कुमरे बाळा ॥ नाना छंदें क्रीडती खेळखेळां ॥ ऐसा त्यातें क्रीडवीती कुमारी ॥ पायादेवो वामनो ब्रह्मचारी ॥५॥
रात्रीतें प्रहराहुनी अधिक जी ऐसी तृतीया बरी ॥ षष्ठी यामदिनाहुनी जरि तरी रात्री शुभातें करी ॥ तैसी द्वादशि अर्धरात्र उपरी वेष्टोनि राहे स्वरी ॥ ऐशा ज्या तिथि त्या प्रदोष चुकल्या कुर्यात् वटोमंगलम् ॥ ६ ॥

अथ उपनयनललितम् 
अजिनं दंडकमंडलु मेखलारुचिरपावनवामन मूर्तये ॥ मितजगत्रितयाय जितारये निगमवाक्पटवे वटवे नमः ॥१॥
ईश्वरो वननिवासतत्परः पार्वती गिरिसुतो विदधानः ॥ संसृतौ भवति विघ्नविनाशो ब्रह्मचारिबटवेवरदः स्यात् ॥ २॥
भोगिभूषितविभूषितगात्रो हस्तकल्पित सुमोदकपात्रः विघ्ननाशकरः शिवपुत्रो ब्रह्मचारिबटवे. वरदः स्यात् ॥३॥
मौजी च दंडं यज्ञोपवीतं कमंडलु सत्तिलकोपधारी ॥ स्याब्रह्मचारी शिखिवाहनोऽपिश्रियं कुमाराय शुभं ददातु ॥४॥
एक एव जगतामधुनेशः सायुधो वरकरो गणराजः॥ हस्तिराजवदनाभिराजितो ब्रह्मचारि बटवे वरदः स्यात् ॥५॥
वानरो वनचरोपि वानरो राघवस्य करुणार्पितचित्तः ॥ अंजनीजठरसंभववालो ब्रह्मचारि बटवे वरदः स्यात् ॥ ६॥
विघ्नपुंजदहनो गणपालो ह्यर्धचंद्रतिलकांकितभालः॥ पादमर्दितनिजाश्रितकालो ब्रह्मचारि बटवे वरदः स्यात् ॥ ७ ॥
अभ्रश्यामः शुभ्रयज्ञोपवीतः सत्कोपीनः पीतकृष्णाजितश्रीः ॥ छत्री दंडी पुंडरीकाय ताक्षः पायादेवो वामनो ब्रह्मचारी ॥ ८॥
रेणुकाशतहुताशनधामजामदग्न्य कुलभूषणरामः ॥ क्षत्रियांतकरणोत्तमणों ब्रह्मचारिबटवे वरदः स्यात् ॥९॥
तदेव लमं सुदिनं तदेव ॥ विद्याबलं० ॥१०॥

बटुतें गणनाथचिंतन करविजे सुमुहूर्त सावधान ॥ ब्रह्मसावित्रिचिंतन करविजे सुमुहूर्त सावधान ॥ इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन सुमु० सावधान ॥ उमामहेश्वर चिंतन सुमुहूर्त सावधान ॥ अंतःपट दृढ आसिजे सुमुहूर्त ॥ जयघंटाशब्दप्रमाण सुमु० अत्यासंधि सावधान ॥ अति सुलभ सावधान ॥ अतिसुमुहर्त सावधान ॥ अति समीप सावधान ॥ सावधान ॥ सावधान सावधान ॥ इति उपनयनललितं ॥